Skip to main content

मिसळपाव वरील प्रमाण भाषा/ व्याकरण ह्या विषयी तुमचे मत काय?

लेखक कोलबेर यांनी शनिवार, 19/04/2008 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1318
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

माझे विस्तृत मत असे : ललित लेखनात कोणी काहीही वापरावे. घरची बोली घरगुती जिव्हाळ्यासाठी वापरावी. वातावरण-निर्मितीसाठी हिंदी-मराठी मिश्रण, किंवा इंग्रजी-हिंदी मराठी मिश्रण वापरावे.

दूरदूरच्या मराठी लोकांशी "आपण सगळे एका मराठी परिवारातले" हे ध्वनित करण्यासाठी आपण सर्वांनी शाळेत शिकलेली बोली वापरावी.

परिस्थिती काय? त्यानुसार शाळेत शिकलेली बोली वापरावी, किंवा घरगुती वापरावी. हा "हो/नाही" उत्तर असलेला तुटक प्रश्न नाही.

माझ्या मते "प्रमाण" म्हणजे काय? : भाषा चारचौघांना (खरेतर लाखो लोकांना) कळणारी ती "प्रमाण"
"चारचौघे" म्हणजे "लाखो" कसे? सर्व मराठीभाषक म्हणजे "चारचौघे" - फक्त आपल्या कुटुंबातले किंवा कॉलेजकंपूतले लोक नव्हेत. त्या सर्वांना समजणारी बोली ती प्रमाणबोली. साधारणपणे शाळेत शिकल्यामुळे बहुतेक लोकांना ही बोली समजते. नाहीतर थोरल्या मंगेशकरांनी गोव्यात कशी शिकली असती? फक्त आपल्या कंपूतली बोली तीच वापरली तर गडबड होईल. माझ्या भोवतीचे चारचौघे गोळा करून मी गोव्याची कोकणी मिसळपावावर वापरू लागीन, किंवा नागपुरी हिंदी. पूर्ण कोकणी-हिंदी-कन्नड-धेडगुजरी-मिश्रित लेख दिसू लागले तर वाचकांना मिसळपाव कठिण जाईल.


In reply to by धनंजय

हे सर्वांना पटले तर किती बरे होईल! तात्या व इतर खाश्यांना न आवडणार्‍या एका विषयावरची चर्चा बंदच होऊन जाईल.


ज्यांना प्रमाण भाषा वापरावी वाटते - त्यांनी ती तशी वापरावी.
ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषा वापरावी वाटते - त्यांनी ती तशी वापरावी अशी दुसर्‍यांना विनंती कराविशी वाटत असेल तर करावी; अन्यथा दूर्लक्ष करावे.
ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषा न वापरावी वाटते - त्यांनी ती तशी न वापरावी अशी दुसर्‍यांना विनंती कराविशी वाटत असेल तर करावी; अन्यथा दूर्लक्ष करावे.
ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषेबद्दल चर्चा करू नये असे वाटते - त्यांनी तसे मत मांडावेसे वाटल्यास मांडावे.
ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषेबद्दल चर्चा करावी असे वाटते - त्यांनी तसे मत मांडावेसे वाटल्यास मांडावे.
ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषेबद्दल सल्ला देऊ नये / आग्रह करू नये असे वाटते - त्यांनी तसे मत मांडावेसे वाटल्यास मांडावे.
ज्यांना दुसर्‍यांनीसुद्धा प्रमाण भाषेबद्दल सल्ला द्यावा / आग्रह करावा असे वाटते - त्यांनी तसे मत मांडावेसे वाटल्यास मांडावे.
ज्यांना जे प्रतिसाद उडवावे वाटतात, ते त्यांच्या अधिकारात असेल तर त्यांनी ते तसे उडवावे.
ज्यांच्या अधिकारात प्रतिसाद / लेख उडवणे असेल, त्यांनी उडवलेले वा ठेवलेले असतील आणि त्याच्याशी कोणी सहमत असेल किंवा नसेल तर त्यांनी त्यांचे आपापले मत व्यक्त करावेसे वाटल्यास ते तसे करावे.
ज्यांना वाटत असेल अमुक एक भाषा प्रमाण भाषा आहे आणि दुसरी नाही त्यांना ते त्यांचे मत मांडावे वाटल्यास त्यांनी ते तसे मांडावे.
ज्यांना वाटत असेल की कोणतिही भाषा प्रमाण नाही आणि त्यांना तसे मत मांडावे वाटल्यास त्यांनी तसे मांडावे.

...............असे मला वाटते.

व्यंकट


In reply to by व्यंकट

हा हा हा!

व्यंकूची शिकवणी आवडली.. :)

तात्या.


In reply to by विसोबा खेचर

मस्त रिमार्क.
तात्या तुम्ही काय पूर्णवेळ अटेंड केलीत की काय? मी तर प्रेझेंटी होताच लगेच दप्तर उचलून पळाले.

द. मां.च्या मात्र सर्व शिकवण्या अटेंड करणारी,
ऐ. राय., रोल नं २१


ठराविक शब्दांसाठी व्याकरण पाळावे. इतर वेळी संदेश, अर्थ समजने महत्वाचे !


२२तास पुर्वीचे लेखन का दिसत आहे?