हॉटेलमध्ये उपलब्ध असणारया शेव, चिवडा आदी खाद्यपदार्थाँची भेसळ म्हणजेच मिसळ. ही खातांना झणकेबाज 'शांपल' ची मागणी दणकेबाज खवय्यांकडून झाली की एक पाव दोन तुकडे झालेच म्हणून समजा! त्यातही मिसाळांची मिसळ पुढ्यात असेल तर विचारायलाच नको. वाढता वाढता कधी पोतंभर पाव अनेकांच्या उदरांत शिरून पावन होतात हे मिसाळांच्या पिसाळांनाही कळत नसायचे. पिसाळ महाशय मिसाळांचे सख्खे मेहुणे असले तरी दोघांची दुःखे वेगळीच असणार हे उघड आहे! कारण पिसाळ महोदय मिसाळांकडे वाढपी, आचारी, घरगडी अशा स्वरुपाचे हरकाम करणारे हरगडी होते. ते मेहुणे असले तरी पाहुणे म्हणून कधी जगलेच नाहीत.तशी संधी मिळालीच नाही किँवा दिली गेली नाही म्हणा हवं तर!
मिसाळांना आपल्या हॉटेलची खासियत असलेली 'पुणेरी मिसळ' अटकेपार फडकावयाची होती, म्हणूनच त्यांनी पिसाळांना लग्नानंतर सासरीच ठेऊन घेतले. खरेतर पिसाळांचा हात धरू शकणारा कुणीही मिसळकार पुण्यनगरीत आढळणार नाही हे मिसाळांना चांगलेच उमजले होते. आपल्या बहिणीचा हात त्यांच्या हाती देऊन मिसाळांनी फार मोठा मुत्सद्दीपणा दाखवला होता. पिसाळांचे नऊ दिवस संपले अन् मिसाळांचे सुरू झाले. अल्पावधितच पुणेरी मिसळ भलतीच लोकप्रिय झाली...
योग्य मिश्रणाची प्रमाणबद्ध सरमिसळ झाली की तिथे कुसळ कुणाला दिसणार? उसळीसाठी जिथे मुसळाचं काम नाही तसंच कुसळासाठी -म्हणजे अल्प वेतनासाठी- मिसळ का बनवायची, पळू पळू का वाढायची? असा प्रश्न अन् गंड पिसाळांना सतावू लागला. गंडाला कंड सुटला की बंड होणार हे ठरलेले. आपल्या जिवावर मिसाळ मिसळ विकतात, तेव्हा आपणच पुणेरी मिसळचा धंदा का सुरू करू नये असं पिसाळांना वाटू लागलं. मग त्यांनी जलद हालचाली करून आपला वेगळ्या चुलीचा निर्णय जाहीर केला...
एका ठिकाणी, एकाच मशागतीखाली वाढलेली वेल दुसरीकडे उपटून लावायची ठरविल्यास कशी येईल? तसेच झाले. आपले माहेर सोडून बाहेर पडायला सौ.पिसाळांनी नकार दिला! ते ऐकून पिसाळ कधी नव्हे इतके पिसाळले. परंतु तोंडात दोन मुठी शेवचिवडा घेण्यापलिकडे त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते.
नाही म्हटलं तरी सान्निध्यात येऊन सौ.ना पिसाळांचा गुण नाही पण वाण लाभला होताच. त्यादेखील योग्य प्रमाणात 'भेसळ' कशी करायची हे शिकल्या होत्या. त्यांना मिसाळांचे वैभव त्यागून जायचे नव्हतेच. सरतेशेवटी नाइलाजास्तव पिसाळ मजकूर आपला बाडबिस्तारा गुंडाळून चालते झाले...
अशा प्रकारे पुणेरी मिसळ मनाने कोसळलेल्या पिसाळांसोबत हद्दपार झाली असून सध्या आपण जी मोठ्या चवीने खातो ती आहे फक्त भेसळ.. फक्त भेसळ!
'ओरिजनल' मिसळ कुठे मिळेल का?
वाचन संख्या
6762
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखन ढिसाळ
ळ ळ ळ ळ
ह.ह.पु.वा.
=))
In reply to ह.ह.पु.वा. by अन्या दातार
पुण्यात
In reply to =)) by टारझन
म्हणजे
In reply to पुण्यात by अन्या दातार
अरे
In reply to म्हणजे by टारझन
अन्याशी सहमत...
In reply to पुण्यात by अन्या दातार
छायाचित्र कसे डकवावे?
In reply to अन्याशी सहमत... by मदनबाण
+१०००
In reply to पुण्यात by अन्या दातार
यत्ता
ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे
ओरिगिनल
In reply to ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे by विनायक पाचलग
अरे वा!
In reply to ओरिगिनल by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>
In reply to अरे वा! by पंगा
छ्या, या
In reply to >> by मेघवेडा
माहीत आहे.
In reply to छ्या, या by ३_१४ विक्षिप्त अदिती
कार्टे,
In reply to छ्या, या by ३_१४ विक्षिप्त अदिती
मेल्या, मी
In reply to कार्टे, by मेघवेडा
का नाही???
In reply to मेल्या, मी by ३_१४ विक्षिप्त अदिती
वरचे काही
In reply to का नाही??? by पंगा
मेव्याशी सहमत!
In reply to वरचे काही by मेघवेडा
हम्म्म्म....
In reply to मेव्याशी सहमत! by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोद्या तुझा फोन नंबर दे.
In reply to ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे by विनायक पाचलग
हलवायाच्या घरावर...?
In reply to ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे by विनायक पाचलग
त्यांनी समजा
In reply to हलवायाच्या घरावर...? by पंगा
त्यापेक्षा...
In reply to त्यांनी समजा by विनायक पाचलग
ओरिगिनल
In reply to ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे by विनायक पाचलग
आलोच
In reply to ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे by विनायक पाचलग
नको नको
In reply to ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे by विनायक पाचलग
डॉक्टरसाह
कोल्हापूर
बेडेकर
In reply to कोल्हापूर by Pain
योग आला
In reply to बेडेकर by मदनबाण
सहमत.
In reply to योग आला by रामपुरी
१+
In reply to सहमत. by llपुण्याचे पेशवेll