Skip to main content

व्यभिचार- पाप आणि पुण्य???

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 23/05/2010 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
मनीषा एक कॉलेज तरुणी अचानक एकाच्या तरुणाच्या मोहजालात फसली. अखेर तिला गर्भपात करून घ्यावा लागला. अन् दुसऱ्याच कोणाशीतरी तिचे लग्न लावून देण्यात आले! त्यानंतरही पूर्वीचा आशिक तिला भेटतो, तीही त्याची वाट पाहते.. हे कुणाच्याही लक्षात न येत चालूच आहे... चीन्तोपंतांच्या चिंता सोसून वैतागलेली राधाबाई तिच्याच ऑफिसातील हर्शल बरोबर फिरत असते. तो तिला हसवतो, खेळवतो. ती खुश आहे... तोही! ही नमुनेदाखलची उदाहरणे सत्यकथा आहेत.(नावे बदलली आहेत.) नवरा बाहेरख्याली झाला त्याचे कारण घरातच कुठेतरी सापडते. घरच्या व्यक्ती त्याची ख्याली खुशाली ओळखीत नाहीत म्हटल्यावर तो बाहेर डोकावणार हे ठरलेलेच... मर्दानगी गाजवण्यासाठीही काही महाभाग बाहेर हुंदडतात. एकूण काय तर लैंगिक भूक भागली तरच इतर भूका सुचतात, जाणवतात. जीवनात अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजांबरोबरच मैथुन सुद्धा अत्यावश्यक असते. मनोलैगिंक व्यापारामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व आहे. व्यभिचार हाही एक आचारच! परंतु तो समाजमान्य नाही इतकेच. सध्या अनेक नामांकित व्यक्ती (नेते/अभिनेते/बुवाबाबाही) कपडे बदलावेत तसे आपले जोडीदार बदलत असतात. पूर्वीही अनेक राजे/बादशहा बहुपत्नीत्व स्वीकारीत. काहींची कारकीर्द ‘अंगवस्त्र’ राखल्यानेच गाजली. ही झाली मोठ्यांची प्रकरणे. जनसामान्यांच्या तर चोरून चोरून कितीतरी भानगडी होत असतात. त्या ना नवऱ्याला समजतात ना बायकोला. घरचे तर या प्रकरणापासून अलिप्त असतात किंवा खुशाल डोळेझाक करतात. लग्नबंधन असा घट्ट धागा आहे की तुटता तुटत नाही किंवा त्याची गाठ सुटता सुटत नाही. समाज काय म्हणेल अशी भीती कायम घर करून राहते.म्हणून असे संबंध अंधारातच राहतात. लिव्ह इन रिलेशनशिप सारखी संकल्पना त्यामुळेच भाव खाऊन जाते. नको ती बंधने अन् नको तो सामाजिक जाच असा विचार करून पुढील पिढी जर खुलेआम एकत्र राहू लागली तर ते उद्याच्या समाजाला स्वीकारावेच लागेल. जिथे नैतिकताच नाही तिथे अनैतिकतेचा प्रश्न येईलच कसा? शरीर उपभोगण्याचा हा साधासोपा मार्ग उद्याची पिढी निवडणार नाही कशावरून? तेव्हा मग व्यभिचाराचा अर्थ कोण कोणाला पटवून देणार हा खरा सामाजिक प्रश्न असेल. मुळात पाप-पुण्याच्या गोष्टी ही मानण्या न मानण्याची संकल्पना असल्याने किंवा तिला शास्त्रीय आधार नसल्याने किती महत्त्व द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुख्यत्वे ही संकल्पना धार्मिकतेशी जास्त करून जोडली जात असते. त्यामुळे पापभिरू लोकच तिचा डंका पिटताना दिसतात. बरेचसे लोक धार्मिकतेच्या नावाखाली ‘पापे’ करतांना (बुवाबाजी) रंगेहात सापडतात. परंतु उपरोक्त उदाहरणे लक्षात घेता व्यभिचार किंवा बाहेरख्यालीपणा हा काही आपल्या घरापासून फार दूर राहिलेला नसल्याचे दिसून येते. आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत सुखाचा शिडकावा शोधणे, समाधानाचा आसरा पाहणे हा काही पापाचा नमुना ठरू शकत नाही. शरीराला आवश्यक असलेलं ते भोजन आहे. याला पाश्चात्य धोरण म्हणा किंवा लंपटपणा म्हणा आजच्या धावपळीच्या युगातील तो एक सुख समाधान प्राप्त करण्याचा मार्ग बनू पाहतो आहे.. इ. इ. हे पचनी पडायला जरा अवघड वाटत असेल परंतु यात अल्पसे का होईना तथ्य आहे हे नक्की...

वाचने 27082
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

In reply to by अविनाशकुलकर्णी

व्वा !! बायक्युरियस दिसता साहेब =))

In reply to by टारझन

:lol:

जी गोष्ट आत्यंतिक भावनिक जवळीकीची, शारीरिक अभिव्यक्ती असते, तिला केवळ शारीरिक गरज समजणे चूकीचे आहे. ============ माउ

बे. ला. शी सहमत. ईस्टेटी साठी तुम्ही दत्तक विधी करु शकता!! विवाह हा समाजाच्या नैतिक मुल्यांवर आधारित शरिर संबंधांसाठी प्रस्थापित केला गेला आहे. एक वेगळा द्रुष्टीकोण....९८ माणस धडधाकट आहेत. उरलेली दोन अपंग्....काय करता तुम्ही? अपंगांसाठी सोय्...पण हेच अपंगत्व जर ९८ विवाहात नाही म्हणुन उरलेले दोन विवाह तसेच फरफटावयाचे...??? इथे व्यभिचार (कुणी फोड करेल का या शब्दाची? ) हा चान्स मारु लोकांसाठी मी चर्चीत नाही आहे. घरात सर्व सुख असेल तर बाहेर जाणारी व्यक्ती कायमच दोषी असेल पण कारण मिमांसा न करता जर फक्त ...व्वाईट्टच ....या द्रुष्टी न तुम्ही पहात असाल तर .. ते न्याय्य नाही. विवाहाला फक्त शारिरिक सुख म्हणुन न बघता...म्हणनारे ...शारिरिक सुखाशिवाय विवाह बंधनात आहेत अस म्हणायच का? वर मनिषा न जे म्हंटलय ते १००% खर आहे. त्या परिस्थीतीला सामोरे जावे लागणार्‍या व्यक्तीला हा निकष लागु पडतो जिथे तीचा कस लागतो. साधारणतः सर्व साधारण व्यक्ती समाजाचे कायदे कानुन उल्लंघुन नविन काही करताना दिसत नाही पण अचानक आपण ज्याला काल पर्वा पर्यंत एक चांगली व्यक्ती म्हणुन ओळखत असतो तिलातिची ही बाजु समोर आल्यावर ,कलुषीत नजरेने पहाण्या आधी किंवा तेव्हढ्या एका निकषावर मुल्य मापन करण्या आधी.....आम्ही फक्त त्यांच्या कडे बघायचा द्रुष्टी कोण बदलायचा यत्न करतो आहोत. नाही तरी कुठल्याच समाजात हा विषय उघड उघड बोलला जात नाही. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

In reply to by स्पंदना

विवाह हा समाजाच्या नैतिक मुल्यांवर आधारित शरिर संबंधांसाठी प्रस्थापित केला गेला आहे. करेक्ट...! अमर्यादित व स्वैर वर्तन सामाजिक हिताला घातक ठरते. म्हणून सामाजात काही मूल्ये, नीती तत्त्व, सामाजिक नियमने आदिंची व्यवस्था सामाजिक संस्था करीत असतात. विवाहसंस्थेंच्या उद्देशापैकी व्यक्तीच्या अफाट कामवासनेवर नियंत्रण ठेवण्याचाही उद्देश असावा. स्त्री-पुरुषांच्या वैषयिक संबंधावर नियंत्रण ही समाजाच्या दृष्टीने आवश्यक बाब होती. आणि म्हणूनच विवाह म्हणजे 'वैषयिक संबंध' प्रस्थापित करण्याचा समाजमान्य मार्ग म्हटल्या जातो. बाकी, चर्चा चांगली चालू आहे. लगे रहो. -दिलीप बिरुटे

चर्चेत सर्वाँनीच(पुरुष/स्त्रियांनी) हिरीरीने सहभाग घेऊन या गहन विषयावर मुद्देसुद विवेचन केले त्याबद्दल आभार!

एक मुलगी .... जन्मापासूनच आर्थिक सुबत्ता असूनही विक्षिप्त वादळामुळे अनेक सामान्य सुखानही पारखी झालेली . शाळे पासूनच घराच्या बंदिवासा मुले जवळचे कोणीही मित्रं मैत्रीण नाही . सतत सावटाखाली जगल्यामुळे कोणाशी बोलण्याचा आत्म विश्वास नसलेली . कोलेज मध्ये घाबरून राहणारी पण आईच्या मजबूत पाठींब्या मुले योग्य ते शिक्षण घेतल्यावर नोकरीच्या रूपाने नवीन पंख लाभलेली ती. नंतर मात्र ४० -५० लोका समोर हि आत्मविश्वासा ने बोलू शकणारी उत्तरो उतार प्रगतीच करत जाणारी ती . तिच्या सकारात्मक दृष्टी कोनाने तिच्या मित्र परिवार ची मोठी होत जाणारी जाणारी यादी. "छु लो सितारो को अब दूर नाही ही मंझील " गाण्याचा शब्द शब्द जीवनात जगणारी ती . आता तिला गरज वाटू लागते आपल्या विचाराशी जुळणार्या , मनावर लहान पणापासून झालेल्या असंख्य जखमा वर मायेची फुंकर घाला णार्या साथीदाराची . तिला वाटते ओढ स्व कष्टाने प्रतिकूल परिस्थितही ठामपणे उभे राहिलेल्या पायांना कधी थकले तर कोणाच्या तरी प्रेमळ बाहुमाध्य विश्वासाने विसावण्याची. बाकी काही अपेक्षा हि नसते पोकळ डाम डौलाची किंवा विलासाची ... त्यातला भंपक पणा अमुभावाला असतो जन्मा पासूनच पण तसे कोणी मिळ न्याआधीच आई च्या इच्छे नुसार केलेलं लग्न ... नवीन नात.... एक जीवनाला किनारा मिळवून देणारा जीवनसाथी ... ती हरखून जाते आता पर्यंत साठ वून ठेवलेले सगळे प्रेम या व्यक्ती वर उधळून टाकण्याची तिने तयारी केलेली . पण कोणाचा तरी आधार शोधात असलेली ती आपणच त्याचा आधार बनते . अरे हा पण माझ्या सारखा च ! चला याचे हि आयुष्य आपल्या सारखे घडवू या ... ती जीव तोडून प्रयत्न करत राहते . पण तो काहीशा अंतर राखून दूर राहतो . निसर्ग नियमाने दोघे शरीराने एकत्र येतात २ वर्षांनी मुलगी हि होते पण मनाने ते दुरावत जातात . लोकार्थाने ते उत्तम वैवाहिक जीवना जगात असतात तो हि आपल्या जगामध्ये आनंदी असतो. त्याला गरज असेल तेव्हा "बायको" मिळत असते ती च्या मानसिक परिस्थितीची त्याचे काही देणे घेणे नसते ती एकटी पडत जाते . लग्ना आधी जेवढी एकटी असते त्यापक्षा किती तरी पटीने जास्त . मुलगी मोठी होत असते. परिस्थिती च्या उलट सुलट थपडा नि बेजार झालेली ती ३ वर्षांनी पुन्हा भानावर येते . पुन्हा सुरु होतो परीस्थीतीवर मात करण्याचा संघर्ष . पण यावेळी असते मुलीलाही घडवण्याची जिद्द . पुन्हा एकदा नोकरीच्या रूपाने नशीब अजमाव याचा प्रयत्न . ... कलायटस ... पैसे ...बँक अकौंट मध्ये भर ..... ती स्वत:ला बुडवून घेते मग मन गुंतवण्यासाठी बाहेर पिकनिक ... फिरणे ... अशाच फिरण्या मधून कधी तरी जन्माला आलेली निखळ मैत्री ... त्याच्या नजरेतून वेळो वेळी झळकणारी आत्मीयता ... तिने न सांगता जीवाच्या आकांताने केलेली मदत ... तिच्या बाळाची त्याच्या नजरेतून सतत व्यक्त होणारी काळजी ... तिची लहान सहान टेन्शन्स हि मोठ्या जबाब दारी ने दूर करण्याची त्याने केलेली प्रयत्नांची पराका ष्ठा . तो हि तसाच .... परिस्थिती नुसार आत मधून दगड होत गेलेला .. पण माणूस कीचा झरा जिवंत ठेवणारा पण "खरा खुरा" माणूस . 15 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात "शरीरिक सुख आणि मुले जन्माला घालणे " एवढेच असलेले नाते .....रोज रात्री "नकोसे संबंध" डिमांड करणारी त्याची बायको आणि आता त्यांची स्वत च्या वैवाहिक आयुष्यात हि ना होवू शकलेली मानसिक जवळीक . त्याने तिने एक मेकांकडे मोकळे केलेलं मन. आणि अशाच एका अलगद क्षणी खांद्यावर डोक ठेवून मन मुक्त रडताना एकमेकांचे होवून गेलेले ते दोन जीव ... या नात्याला तुम्ही काय म्हणाल ?? रानफुल

In reply to by वैदेहीजी

उत्तरः व्यभिचार (अपुर्‍या माहिती आणि व्याख्येनुसार) तुमची मैत्रिण असल्याने तिची बाजू कळली. "त्या" च्या बाजूचे काय ? तिची आणि त्या उतारवयातील माणसाची मैत्री निखळ वाटत नाही. [ त्याला ती हवी होती, नवर्‍याला अगोदरच मिळालेली होती. Of course दोघांच्या वागण्यात फरक असणार ;) ] पहिल प्रेम, स्वप्नातला जोडीदार वगैरे गोष्टी चित्रपट, कथा कादंबर्‍यातून सतत मारा केल्याने हव्याहव्याशा वाटतात. वास्तव जग वेगळे असते.

हि कुठल्या चित्रपटाची कथा आहे? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by Dipankar

हि आमच्या ट्रेन मधल्या ग्रुप मधिल मैत्रीणिच्या आयुष्यात घडलेली खरीखुरी घटना आहे रानफुल