आपण आपल्या या संस्थळावर विविध विषयावर वेगवेगळ्या बाजूनी विचार मांडीत असतो, त्यांची देवाणघेवाण करीत असतो. अशाच प्रसंगी समाजात कित्येक चालिरीतीबाबतही मत व्यक्त करतो. "लग्न" हा असाच एक महत्वाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय. वर्षानुवर्षे "विवाह समारंभ" म्हटले, की भोजनावळ, जोरदार स्वागत समारंभ, वाद्यांचा दणदणाट असे समीकरण झाले आहे; आहेर देणे, घेणे, रुसवे फुगवे काढणे, फोटो, व्हिडिओ, आदीची रेलचेल.
यात बदल तरी काय असणार? आपणदेखील वैयक्तिक पातळीवर यातील काही प्रथांना दूर केले तरी बहुतांशी लग्नात हेच दृश्य दिसत असते. अशावेळी काहीतरी "आगळे वेगळे" घडले तर मनाला फार हर्ष होतो. विशेषत: आपल्या संस्थळावरील सदस्यांना अशा या "आदर्शवत लग्न सोहळ्याची" बातमी देणे मला फार गरजेचे वाटते.
सांगली जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे कवठेमहंकाळ !! आधुनिक काळाशी सुसंगत अशा शैक्षणिक वातावरणात येथील विद्यार्थी पदवी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाचे नाव आहे "पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय; आणि प्राचार्य आहेत डॉ. अशोक बाबर; ज्यांनी आपल्या घराला नाव दिले आहे "भाषा"....स्वत: ग्रंथप्रेमी असणारे हे प्राचार्य इतरांना तसेच विद्यार्थांना देखील "क्रमिक पुस्तकांच्या पलीकडील पुस्तके वाचा" असा संदेश देत असतात. दोन दिवसापूर्वी त्यांची कन्या "अश्विनी" हिचा विवाह श्री आनंद पवार यांच्याशी झाला. लग्न कवठेमहंकाळ येथेच होते...... आणि आपल्या "ग्रंथ आवडीला" अनुसरून प्राचार्य अशोक बाबर यांनी आपल्या मुलीच्या विवाह समारंभात परंपरा व आधुनिकता यांचा मेळ घालीत लग्न मंडपातच एक ग्रंथ प्रदर्शन भरवले आणि आलेल्या (दोन्ही घराकडील) पैपाहुणे, मित्र मंडळीना स्पीकर वरून आवाहन केले कि, "वधु अन् वराला आहेर न देता प्रत्येकाने स्वतःसाठी या प्रदर्शनातील किमान एक तरी पुस्तक विकत घ्यावे..." सगळ्यांना खरोखरीच आनंद झाला..... आणि तासाभरात दहा हजार रुपये किमतीच्या पुस्तकांची विक्री झाली. या विवाह सोहळ्यात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुलीचे मामा म्हणून लिंबू धरला होता.
विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेत पाली भाषेतील सम्यक दृष्टी बाळगणे अशा आशयाचा चरण लिहिला होता. आहेर देणे आणि घेणे "समाजास अपायकारक" असल्याची नोंद केली होती. वाजंत्री, बेंजो, झांज पथक अशा बाबींना फाटा देऊन गोमेवाडी येथील कोलारबाजा वादन करीत होता. कोणत्याही कार्यक्रमाला मंत्री उशिरा येतात, हा समज खोटा ठरवित गृहमंत्री आर. आर. पाटील मुहूर्ताच्या अगोदर वीस मिनिटे दाखल झाले. स्थानिक कार्यकारी मंडळीनी भरवलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला लोकांचा प्रतिसाद लाभला.
प्राचार्य बाबर हे आपल्या महाविद्यालयातदेखील परंपरा व आधुनिकता दिवस साजरा करतात त्यावेळीही ग्रंथ प्रदर्शनाच आयोजित केले जाते. विवाह समारंभात आहेर न घेता "ग्रंथ प्रदर्शन" आयोजित करून सुरू करण्यात आलेल्या नव्या प्रथेचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. इतकेच नव्हे तर लग्न समारंभानंतर खुद्द प्राचार्य बाबर यांनी त्यातील १२ हजार रुपये किमतीची पुस्तके खरेदी करून गावातील "शिवाजी वाचानालयाला" भेट म्हणून दिली. व्वा !!
मी आपणास विनंती करीत आहे की आपल्या संस्थळाचा उल्लेख करून प्रत्येकाने एका पोस्ट कार्डावर प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांचे या उपक्रमाबाबत मनापासून अभिनंदन करावे.... त्यांनाही या निमित्ताने कळेल की इंटरनेटवर त्यांच्या या कृतीची समाजाने नोंद घेतली आहे. त्यांचा पत्ता :
डॉ. अशोक बाबर
प्राचार्य
पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय,
मु.पो.तालुका कवठे-महांकाळ,
जिल्हा : सांगली
वाचने
6811
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुस्तक प्रेम समजू शकतो..
तसे नसेल...!!
In reply to पुस्तक प्रेम समजू शकतो.. by प्रमोद देव
खरोखरच
In reply to पुस्तक प्रेम समजू शकतो.. by प्रमोद देव
ह्म्म..
फुले,
खुलासा...!
धन्यवाद
In reply to खुलासा...! by इन्द्र्राज पवार
सुंदरी कीं सुंद्री?
सुंद्री....!!
In reply to सुंदरी कीं सुंद्री? by सुधीर काळे
तुमच्याकड
छान
In reply to तुमच्याकड by शिल्पा ब
सुंद्री....
In reply to तुमच्याकड by शिल्पा ब
सामुदायीक विवाह.....
In reply to तुमच्याकड by शिल्पा ब
वाह! उत्तम
ई-मेल....!!
चांगला उपक्रम
"पुष्पगुच्छ" ...!
In reply to चांगला उपक्रम by विकास
हं
सुंद्रीवादन......!!
मस्तच!!!
In reply to सुंद्रीवादन......!! by इन्द्र्राज पवार
धन्यवाद!
In reply to सुंद्रीवादन......!! by इन्द्र्राज पवार
श्री.
In reply to सुंद्रीवादन......!! by इन्द्र्राज पवार
श्री.भिमान्ना जाधव...!
In reply to श्री. by पाषाणभेद
धन्यु.. अशी
मान्य....पण...!
In reply to धन्यु.. अशी by डावखुरा