पहिल्यांदाच एकटी अशी राहत होती आणि स्वातंत्र्याचा अनुभव येत होता....आपल्याला बोलायला, ओरडायला, उत्तर द्यायला कोणी नाही याचा आनंद वाटत होता...पण इथला गायकवाड का एवढा खार खाउन असतो काही कळत नव्हते...मरू दे...काय कोणाला भाव द्यायचाय...."तो" आहे ना आपल्याला protect करायला...इतके वर्ष तणावाखाली आणि मार खात घालवल्यावर आभाळ मोकळं मिळालं तर त्याचा आनंद घ्यायचा एवढेच मनात होते...
३१ डिसेंबरच्या रात्री बियर खूप झाल्यावर झोप अशी आलीच नाही...मध्यरात्री कधीतरी एकदम उलटी येईल असे वाटल्याने ती रूमच्या बाहेर आली आणि चौकातील पाण्याच्या नळाजवळ जाऊन बसली...तोंड धुतले...परत रूमवर येताना रात्रीच्या अंधारात एक मुलगी मोठी ब्याग पाठीला लाऊन येताना दिसली...लगेच डोक्यात प्रकाश पडला " हे खरे आहे तर !!"
दुसऱ्यादिवशी "तिला" जवळून पहिले आणि वाटले " अरे, हि तर नेहमीच्या बघण्यातली पोरगी...खूपच सज्जन आहे. आपलेच काहीतरी चुकत तर नसेल ना ? "
संध्याकाळी रूमवर यायला वेळ झाला. खरं तर १०-१५ मिनिटच उशीर झाला होता पण गेटवरचा गायकवाड गुर्मीत ओरडला " इतका उशीर का? वेळेवर येत येत नाही का ? चल सही कर." ती सही करताच होती तेवढ्यात तिचे लक्ष बाजूच्या कॅम्पसमधील काही नागा आणि मिझो मुलींकडे गेले...त्या त्यांच्या मित्रांबरोबर गप्पा मारीत उभ्या होत्या...तिने बाजूच्या मुलीला विचारले
" हा या पोरींना कसा काही बोलत नाही? या तर रोजच उशिरा येतात."
" काही बोललं तर या पोरी आरडाओरडा नाही का करायचा ? तुला काय वाटलं ..साध्यासुध्या आहेत का या महामाया.."
रूमवर आल्यावर काहीतरी खाल्लं...स्वयंपाक येत नव्हताच त्यामुळे काही बनवायचा प्रश्नच नव्हता...डोक्यात भुंगा सुरु झाला...काय चुकतंय? कोणाशी काही भांडण नाही...स्वतःहून ठराविक लोक सोडले तर कोणाशी बोलतही नाही...मग काय बिनसतंय? कोण आग लावतंय ? आणि का ? प्रश्नच प्रश्न आणि उत्तरं मिळण्याची शक्यता नाहीच .....ही warden तर काय उद्योग करते काही कळायला मार्ग नाही..कालच स्वतः वाचायला म्हणून दिलेलं पुस्तक कधी रूमवर येऊन मला न सांगता घेऊन गेली तर पत्ता नाही...मी किती वेळ शोधात होते...वाटलं हरवलं की काय...का सारखी चोरून माझ्या रूमवर येऊन माझं समान उचकत बसते? हिला काय माहिती नाही का काय चालू आहे आणि कोण करतेय ते? हरामखोर आहे साली ....
क्रमशः
| लेखनविषय: |
|---|
याद्या
6382
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजुन काही
"क्रमशः"
क्रमशः ???
मोठा भाग
हे नक्की काय आहे?
+१
In reply to हे नक्की काय आहे? by संदीप चित्रे
+२
In reply to +१ by सुबक ठेंगणी
घे!
In reply to +२ by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ
In reply to घे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
तेही घ्या!
In reply to हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
ती १४
बियर कशी प्याली
In reply to ती १४ by शुचि
ओह्ह .. हाऊ
In reply to बियर कशी प्याली by पंगा
कविता आहे
शरदिनी
In reply to कविता आहे by भडकमकर मास्तर
एक ओळ
काय लिहिले
सस्पेन्स + हॉरर + टेरर ..............
अगदी !! मी
In reply to सस्पेन्स + हॉरर + टेरर .............. by jaypal
हो हो कळले पादा
अंबळ गल्लत
In reply to हो हो कळले पादा by वेताळ
हाहाहा
In reply to अंबळ गल्लत by llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद.....
In reply to हाहाहा by भारद्वाज
वाचतोय.
उत्सुकता
पुढच्या भागाची प्रतिक्षा आहे
शिल्पा ताईंनी बस स्टँडवर आणलं