अनवट
अनवट
भरलेल्या डोळ्यांसमोर सार अस्प्सष्ट ....पण तरीही श्रवण इंद्रिये तशीच तल्लख!! बाजूला तसे कधीही विशेष भावना प्रधान न होणारे माझे धनी ...हाताच्या ओंजळीत हनुवटी ठेवून स्तब्ध ..डोळ्यात भारलेले भाव. थोड स्पष्ट दिसाव म्हणून मी डोळे मिटते आणि माझ्या गालावर अश्रू ओघळले. मला हळूच ढोसलत Loree माझ्या हातात टिशू खुपसते ...ओशाळवान हसत मी थोडे डोळे कोरडे केले....तोवर समोर जुगल बंदी संपून परत सारे जण समेवर पोहोचले होते...' अलफत उन बिन इन बिन नुखता पाठ पढाया ......' अरे आत्ताच तर "हला s s s रिया s s मथुरा s में बाज्या s s ढोल..असं कृष्ण जन्म आळवला जात होता आणि विस्तारा पाठोपाठ जुगलबंदी न कर्णेन्द्रीये भारावून गेली होती ..सारंगीन अंतर्बाह्य थरारून सोडलं होत ...काळीज पिळवटून निघावेत तसे ते सूर अन लागोपाठ समेवर पोहोचताच "बुलेशाह" चा अलफत इन बिन......."
हे श्रवणेन्द्रीयानना मिळणार स्वर्ग सुख कमी वाटलं म्हणून की काय डोळ्यासमोर आत्ता पर्यंत स्टेज म्हणून आपण जे काही कल्पित आलो त्याला सुरुंग लावत अख्खा 'हवामहाल' उभा होता!!
परवा सकाळी चुकून टी.व्ही. लावला...सकाळच्या धावपळीत टी. व्ही. लावण म्हणजे एव्हरेस्ट वर चढताना भांगडा करणं झाल..पण कसा कुणास ठाऊक लावला....सकाळच्या मुलाखतीत दोन भारतीय चेहरे दिसले, मग तशीच कामाकड दुर्लक्ष करत थोडे कान टवकारले...जे केस वाढलेले गृहस्त बोलत होते ते होते केरळाचे Roysten Abel ...आणि त्यांच्या बाजूला फारसा संभाषणात सहभाग नसलेला थोडासा ग्रामीण ढंगाचा एक इसम!. मुलाखत कार कुठल्या तरी seduction बद्दल बोलत होते आणि Roysten तेव्हढ्याच हिरीरीन माहिती देत होते मग मुलाखत कार या इसमाकडे वळून म्हणाला....can you please play that for me? what do you call it again..? " करताल" क्षणभर ही उसंत ना लावता हा थोडासा ग्रामीण ढंगाचा इसम बोलला....आणि पुढच्या क्षणी त्याचे हात ठेका धरल्यासारखे नाचू लागले.. हातातल्या दोन लाकडी पट्ट्या एकमेकावर चिपळी सारख्या वाजवत त्यान एक तोडा सादर केला..काम गेली खड्ड्यात..बाहेर पडायला होणारा वेळ तसाच नजरे आड करत मी टी. व्ही. ला चिकटले..मधेच त्यांनी कार्यक्रमाची झलक दाखवली अन मी संपले...मी.पां. च्या भाषेत फुटले , खपले ...कार्यक्रमाचे नाव...."The Manganiyar Seduction"
कधी नाही ते धन्याच्या पाठी भून भून लावली " काही देऊ नकोस पण हा कार्यक्रम दे ..
तर परिणामी आम्ही दोघ Esplanade मध्ये !!
पडदा वर जाण्या पूर्वी हळुवार आलापी सुरु झाली.. अगदी आपण पूर्वी आकाश वाणी वर ऐकायचो तशी...आं आ आ ....असं... अन पडदा वर गेला . स्टेज वर ९ झरोक्यांच्या चार मजली स्ट्रक्चरन श्वास अडकला!! . दिग्दर्शक म्हणाले होते की राजस्थान च्या स्त्रिया या झरोख्या तून सारे कार्यक्रम पहायच्या , पण त्या झरोक्यात उभ्या; त्या स्वत:च एक प्रेक्षणिय गोष्ट होऊन जायच्या. अन हीच संकल्पना मनाशी धरत हे असं स्टेज उभारलं गेल.
हे झाल नमनाच घडा भर तेल!! अहो कार्यक्रम सुरु झाला अन सार भोवतालाच विसरलं... एका एका झरोख्यात एक कलाकार !! त्याचे सादरीकरण सुरु झाल की त्या झारोख्याचे लाईट लागत. तर सुरवातीच्या त्या आलापीचा स्त्रोत होता "दिलरुबा" आता एक गोष्ट झाली... मला वाद्यं बघून आणि ऐकून (वाजवायचो पण आम्ही!! पण मास्तर खवळायचे त्या वाजवण्यावर) माहिती आहेत पण ही सारी नाव आणि कलाकारही राजस्थानचे..(त्यामुळे नाव वेगळी)... कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय... वां घराण्याशी बांधील नसलेले... फिरस्ते...नाव....मंगनियार ....त्यांची वाद्ये ..त्यांची गायकी अन...त्यांचा वेश ..काहीही न बदलता तस्सच्या तस्स "अनवट" राखून Roysten न हा कार्यक्रम उभारलाय. अन या कार्यक्रमच यश या अनवट बांधणी मूळेच आहे.
दिलरुबा च्या पाठोपाठ भारदस्त आवाजात बुलेशाह च्या चार विस्तृत बंदिशी एक एक करत चार कलाकार म्हणतात, हा सारा वेळ फक्त दिलरूबाची साथ अन एक कडाक्याची थाप देत मृदंग उतरतो. नऊ प्रकारची वाद्ये..सारी त्या वाळवंटातली सुमधुर.. प्रत्येक कलाकाराला पुरा वाव ...एक जण सादर करीत असताना बाकीचांच्या न कळत येणारी मान हलवून दाद !! अप्रतिम संगीत! सत्तर मिनिट कशी संपतात हे समजत ही नाही. मन असं भिकारी होऊन जात आणि काही ऐकायला मिळेल का या आशेन!
हे लोक राजस्थानच्या सीमेवरचे..सुफी मुस्लीम...फिरस्ते ...पण यांचे देव मात्र हिंदू..अन त्या मूळे कृष्ण जन्म गाऊन संपला की कोठलाही भेद मनी न बाळगता ते बुले शाह ची बंदिश मिसळतात . ढोल वादक तर भान हरपून टाकेल असा ढोल वाजवतात. प्रत्येक गायक स्वत:च गायन सादर करतो पण कुठेही कंटाळवाण असं वाटत नाही !! प्रत्येक वाद्याची स्वत:ची अशी ओळख दाखवत हा कार्यक्रम पुढ सरकतो....सहा दिलरुबा चार मृदंग..दोन सारंग्या..दोन एक तार् या सारखी दिसणारी पण दोन तारी वाद्य..दोन पुंग्या..होय !! अतिशय सुरेल...तोंडात घालून वाजवलेल एक टणत्कारी वाद्य,,,,तीन ढोल..(पोटात पडसाद उठतात ) दोन बासूरया.. पण वाजवतो एकटाच. अन एकाचं वेळी !!! जवळ जवळ बारा गायक (त्यातली दोन मिसरूड न फुटलेली पोर ... इतकी तयारी न गात होती की बस) हरकती घेत, ताना मारत; पण कुठलाही कट्टर पणा नाही. शास्त्रीय संगीत गाणारे, गाताना जे वेदनादायक चेहरा करतात; त्या साऱ्या हरकती घेताना अतिशय प्रसन्न चेहरे..... अन हा सारा वेळ हातात त्या "करताल " घेऊन देह भान हरपून नाचणारा "देवो खान "!!
कुठे सी.डी. मिळाली तर किंमत न पाहता घ्या. कोणाला लाइव्ह मिळाला तर हा अनुभव सोडू नका...
माझ्या बाजूला बसलेली seattle ची स्वत: C A T S मध्ये काम करणारी Lorie तितकीच भारावलेली. टिश्यू देवून...बाहेर पडल्यावर .. हे काय..ते काय...
कार्यक्रमाच्या शेवटी दिग्दर्शक येऊन चार शब्द बोलून गेले...४६ खान घेऊन इम्मिग्रेशन... सोप नाही असं मिश्कील पणे बोलून...आता शेवटी एक ..कृष्ण भजन ऐका असं सांगून गेले..
हा शेवटचा अनुभव अतिशय भारावून टाकतो...अवीट ...सारे कलाकार..अगदी वादक सुद्धा ...एक ही वाद्य न वाजवता अतिशय भावपूर्वक हे शेवटच भजन सादर करतात...आणि उरल सुरलं...seduction ....पूर्ण होत.
इथे पहा
वर्गीकरण
वाह!!!!
सिडक्शन
In reply to सिडक्शन by मिसळभोक्ता
मिभो कशाला
In reply to सिडक्शन by मिसळभोक्ता
आणि वर वॉव
अप्रतिम!
अनवट
मस्त!!!!!! -
उ त्त म!! --
भन्नाट आहे प्रकार
In reply to भन्नाट आहे प्रकार by संदीप चित्रे
आई ग!!
अनवट
वा...सुंदर.