बाजार मांडियेला....!
''माझा मुलगा ना, आय.आय.टी. करतोय. " कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी हे वाक्य तुम्ही ऐकले असेलच. कारण बारावी विज्ञान शाखेतील मुलांपैकी निम्मी मुले आज ''आयआयटी करत आहेत.'' ''आयआयटी'' त प्रवेश मिळविण्यासाठी अभ्यास करणे याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आय अय टी करणे .
आयआयटी ,भारतातली सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्था, या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सर्वोत्कृष्टच असतो, असायचा... त्यामुळे तिथे जाण्यासाठी प्रयत्न तर सगळे करायचे. पण, त्याचा इतका बाऊ होत नव्हता. पण, साधारणतः २१ व्या शतकाच्या सुरवातीपासून सारेच बदलत गेले. माणसाच्या आणि समाजाच्या अपेक्षा वाढल्या.. 6 आकडी पगार खुणावू लागले. पण, त्यावेळी स्वत:तल्या क्षमतांची जाणीव करुन घेण्याइतपत वेळ मात्र आपण स्वतःला देऊ इछित नव्हतो. इंस्टट फूड सारखे इंस्टंट शिक्षण आणि पैसा मिळावा असे वाटु लागले . नेमका याचाच फायदा घेऊन आधी कोटा, राजस्थान येते, आणि नंतर संपूर्ण देशभरात आयआयटी क्लासेस सुरू झाले आणि यथावकाश त्यांचा बाजार झाला....
किती आहे या बाजाराची व्याप्ती? आजघडीला मला एकटयाला 50-60 आयआयटी प्रशिक्षण संस्था माहिती आहेत. ज्यांची वेगवेगळया शिक्षणविषयक मासिकात पानभर जाहिरात द्यायची क्षमता आहे. गावागावात आणि राज्याराज्यात असणारे शिलेदार वेगळेच....! अख्या भारतातुन साधारणत: 5 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसतात. आणि, त्यातले कमीत कमी 75 टक्के लोक अशा संस्थांशी निगडीत असतात. आणि, या दोन वर्षासाठी फी 60,000 ते 2 लाख अशी असते. या सगळयांचा विचार केला, तर या क्लासेसची वार्षिक उलाढाल काही हजार कोटीत नक्कीच जाते....
या बाजारमुळे होणारा परिणाम म्हणजे विद्यार्थी, त्यांचे पालक तर नागवले जातात माझ्या काही मित्रांनी कर्ज काढून ही फी भरलेली आहे. हेसुध्दा एकवेळ मान्य केले असते. जर, खर्या अर्थाने या क्लासेसमध्ये शिक्षण मिळाले असते. पण, या सर्व संस्थांनी शिक्षणाच्या मूळ तत्वालाच हरताळ फासला आहे. दहावीत मी एका क्लासला होतो. त्या क्लासमुळे मी 94 टक्के चा 96 टक्के वर तर आलोच, पण माझा 70 टक्के चा एक मित्र 80 टक्केवर आला. आणि, आजही सरांना फोन केला, तर ते आमच्या बॅचचे यश म्हणून माझ्या मित्राचे नाव घेतात. कारण, ही आपली शिक्षण पध्दती आहे. कोणताही शिक्षक आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो, केला पाहिजे ,शाळेत तर हे व्हायचेच पण अगदी कॉलेजचे शिक्षणही बहुतांशी या तत्त्वावरच आधारलेले असते. या क्लासेसमध्ये या संकल्पनेलाच हरताळ फासलेला आहे. क्लास सुरू झाल्यानंतर काही दिवसातच 100 पैकी ज्या दहा मुलांकडून यशाची अपेक्षा आहे. अशांना वेगळे करून सर्व लक्ष त्यांच्यावर केंद्रीत केले जाते. आणि, त्यांना एक-दोन सोयी देण्यासाठी उरलेल्या 90 जणांचे पैसे वापरले जातात. आणि, इथेच हा बिझनेस होतो कारण अगदी त्या दहाजणांशीही यातल्या कोणत्याही शिक्षकाचे भावनिक नाते तयार होत नाही . कारण ती दहाजण त्यांच्यासाठी फक्त प्रॉडक्ट असतात. ज्यांचे मोठेमोठे फोटो छापून त्यांना पुढच्या वर्षीचा बिझनेस मिळणार असतो. आणि म्हणूनच या क्लासेसचा फॉर्म भरतानाच आम्ही तुमचा फोटो व नाव कधीही व कुठेही वापरू शकतो. असा नियम असतो.
साहजिकच विद्यार्थी हा प्रॉडक्ट बनल्याने आणि त्याचे यश हे एक प्रॉफिट स्टेटमेंट असल्याने मग त्यांच्या यशासाठी एक पॅटर्न बनवला गेला. कोटयात बनलेला हा पॅटर्न आता देशभर पसरलेला आहे. अतिमेहनत आणि काहीसे पाठांतर यावर आधारलेला हा पॅटर्न अर्थातच बिनबुडाचा आहे. आयआयटीमध्ये गेल्यानंतर पहिल्याच वर्षी नापास होणार्या मुलांची वाढलेली संख्या आणि आम्हाला टॅलेन्ट मिळत नाही आहे अशी आयआयटी प्रोफेसर्सची ओरड हे हीच बाब अधोरेखित करते. हे टाळण्यासाठी त्यांनी काही उपाय योजले, मात्र अर्थातच ते अपुरे ठरले.
महत्वाचे म्हणजे या व्यवसायाला अनेक कंगोरे आहेत.आपण आधी त्यांच्या गिर्हाईकांबद्दल पाहु( होय त्यांच्यासाठी ते गिर्हाईकच असतात) .सहसा दक्षिणेकडील माणसे ही बुध्दीवादी असतात. आणि, त्यांना मेंदूशी खेळायला आवडते. त्यामुळे असा समाज हा या क्लासेसचा ''सॉफ्ट टार्गेट'' असतो. कारण, हे विद्यार्थी 12 वी नंतर असणार्या परिक्षांचा अभ्यास सहावीपासूनच सुरू करतात. लक्षात घ्या, एका वर्षाला साधारण 50,000 फी धरली, तर फीच रक्कम वाढतेच. पण, ''सरावाच्या जोरावर ते सहज बाजीही मारतात.'' सर्वसाधारणपणे, इतर विद्यार्थी जे 2 वर्षात शिकतात, ते हे सहा वर्षात शिकतात. त्यांचा दुसरा सॉफ्ट टार्गेट विभाग म्हणजे उत्तरेकडचा भाग. यासंदर्भात मला जी माहिती मिळाली त्यानुसार या भागात ''हुंडा'' व तत्सम पध्दतीचे प्रस्थ हे फार मोठे आहे. आणि, एखाद्यापुढे ''आयआयटी'' ही डिग्री लागली की ती रक्कम आपोआप दुप्पट होते. याचा अर्थ, या शिक्षणाचा कोणताही खर्च त्यांना करायचा नसतो. आणि, ज्ञान किती मिळाले त्यांच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे अर्थातच क्लासवाल्यांचे फावते. महाराष्ट्र व मध्य भारतात या दोन्ही Extremities नसल्या तरी माध्यम क्रांतीमुळे त्या आपल्यापर्यंत येतात, मोहवतात व आपण अलगद जाळयात अडकतो. मोठमोठे बॅनर ,आर्ट पेपर वर जाहिराती , एम बी ए झालेल्यांचे प्रोफेशनल बोलणे इ. गिर्हाइकाला भुलवणारे फंडे सोबतीला असतातच.
याशिवाय, या काळात विद्यार्थ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यामुळे त्यांना यश तर मिळत नाहीच पण त्यांचा सर्वांगीण विकासही खुंटतो. पहिली गोष्ट म्हणजे हे क्लासेसवाले कोणत्याही मुलाला आयआयटी करायला देतात. त्याची लेवल तपासणे हे त्यांना गरजेचे वाटत नाही. अर्थात २00/- घेऊन ऍप्टीटयुड टेस्ट होतात. पण, त्या फक्त पैसे काढण्यासाठी आणि बिनकामाच्या असतात. कारण त्यात कमी गुण मिळालेल्यांना ऍडमिशन देताना मी स्वत: पाहिलेले आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे फ्रँचाईजीकरण.... आजकाल या सर्व क्लासेसनी देशभर आपले जाळे विस्तारले आहे ते याच माध्यमातून.... पण त्यामुळे एखाद्या फ्रॅंचाईजी ओनरला प्रॉफिट झाला नाही की तो फ्रॅंचाईजी बंद करतो आणि मुलाना वार्यावर सोडतो. नवीन क्लास पाहिला तर पुन्हा तिथे पुर्ण फी भरायची ...म्हणजे जवळपास अशक्यच.. दुसरी गोष्ट अशी की, यातले बहुतांशी शिक्षक हे उत्तर भारतीय वा अतिदक्षिणेकडील असतात. त्यामुळे त्यांच्याशी, त्यंच्या भाषेशी आणि त्यांच्या शिकविण्याच्या पध्दतीशी विद्यार्थ्यांना समरस व्हायला वेळ लागतो. याशिवाय सीबीएसई अभ्यासक्रम जास्त उजवा ठरणे हेदेखील त्याला पोषक ठरते. या सगळयाशी मेळ साधेपर्यंत तो शिक्षकच नोकरी सोडतो. मग पुन्हा दुसरा शिक्षक पुन्हा हे सगळे चक्र.... शेवटी हा बिझनेस आहे, आणि ते पगारी कामगार ,त्यामुळे जिथे जास्त पगार तिथे ते पळतात. जेव्हा हे आपली डिग्री खोटी सांगू शकतात, तिथे बाकी सारेच शक्य आहे, नाही का?
या सर्वांमुळे मुलगा आयआयटी-जेईई पार करणे अवघड जाते . मात्र, तरीही AIEEE आणि CET या इतर परिक्षांचे मार्ग त्यांना खुले असतात. पण, अत्यंत दुर्देवाची गोष्ट अशी की, या क्लासेसच्या सांगण्यावरून मुले कॉलेजला दुय्यम लेखतात. वर्षवर्षभर कॉलेजला जात नाहीत. त्यामुळे त्यांना बेसिक नॉलेजही नसतेच नसते. अर्थात, सर्व कॉलेजसचा याला विरोध आहे. पण, सगळेच गेल्याने नाखुषीनेच त्यांनाही हे मान्य कराव लागलं आणि कॉलेज बुडवण्याला परवानगी द्यावी लागते . आणि या सगळया घोळात विद्यार्थ्यांची अवस्था ''ना घर ना घाट का'' अशी होऊन जाते.
या सगळयांचे परिणाम विद्यार्थी भोगतात . बर्याच विद्यार्थ्यांना आपण फसलोय , हे योग्यवेळी लक्षात येते. पण, त्यानंतर वाट बदलणे तितकेसे सोपे नसते.कारण आजकाल असलेली प्रचंड स्पर्धा ,आरक्षण वगैरे सारख्या गोष्टी यामुळे जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशी परिस्थिती झाल्याने तो गेलेला काळही फारच महागात पडतो. त्यामुळे, मग त्याचे भविष्य अंधारमय होते. परगावी आलेल्यांना होमसिकपणा येतो, अभ्यास एके अभ्यास केल्याने सर्वांगीण वाढ तर होत नाहीच( काही काही जण तर राज्य बदलतात .उदा . कोटा किंवा हैद्राबाद) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, त्या नवयुवकाचा आत्मविश्वासच नाहिसा होतो, बाकी सारे मिळेल तो मात्र परत मिळणे फार अवघड...
अर्थात, ''हिरा मातीतही चमकतो'' त्यामुळे जे खर्या अर्थाने अतिशय बुध्दीमान आहेत ते बहुतेकदा तरतात.पण त्यांच्याही रँकवर फरक पडतो. शेवटी 5,00,000 मुले बसली तरी आयआयटीत 10,000 जणच जाणार आहेत ना? त्यामुळे, टिकणारे कमी आणि गळणारे नेहमीच जास्त असतात. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपला खरा अनुभव सांगायला लोक घाबरतात. कचरतात, कदाचित कारण नसताना तो त्यांना त्यांचा पराभव वाटतो. आणि, त्यामुळे पुढ्च्यास ठेच आणि मागचा शहाणा असेही होत नाही आणि अगदी दरवर्षी एका एका क्लासेसमध्ये हजारे मुले प्रवेश घेतात, त्यांचा ''धंदा'' बिनदिक्कतपणे चालू राहतो.
हे सगळे पूर्णपणे थांबवता येईल की, याबद्दल मी साशंक आहे. पण, निदान हा बाजार आटोक्यात तरी आणता येईल. यासाठी, सर्व पातळयांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. कपिल सिब्बलानीम ध्ये 80 टक्के मार्कांचा निकष आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाणून पाडण्यात आला . या निर्णयामुळे निदान ही फुग 50 टक्क्यांनी कमी झाली असती. याशिवाय, यासंदर्भात महत्वाची पावले स्वत:च आयआयटी उचलु शकतात. या परीक्षासंदर्भात ते स्वतःच मार्गदर्शन करु शकतात. आयआय ई एल.एस. सारख्या परिक्षांबाबत हा मार्ग उपयुक्तरित्या चालू आहे आणि इंटरनेट सारखे माध्यम असताना बहुतांश ठिकाणी हे शक्य आहे. (नाहीतर वेगवेगळे क्लासेस, ई-पेपर, ई-क्लासेस काढून पैसे कमवत आहेतच की) आणि, यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे समाज. समाजाचा एकुणच या ''आयआयटी'' कडे ,क्लासेसकडे आणि आपल्या पाल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, तेंव्हा हे प्रश्न आपोआप सुटत जातील.निदान आपले खरे खरे अनुभव शेअर केले तरी फरक पडु शकतो. 14 तास काम करून पैसे कमवणारे यंत्र का एक उत्तम माणूस या दोन पर्यायापैकी जेंव्हा आपल्या पाल्याबद्दल माणूस या पर्यायावर प्रत्येक पालक क्लिक करेल, तेंव्हा सगळचं चांगल होईल.
शेवटी इतकेच की, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण, नजीकच भविष्य ज्या नवयुवकांच्या हातात आहे. त्यांच्या आयुष्याशी या गोष्टी निगडीत आहे. हा! गेली दोन वर्षे मी या बाजारात आहे. कोणत्या जागेवर आहे ते माहित नाही, पण आहे. या दोन वर्षाचा जेंव्हा त्रयस्थपणे विचार केला, तेंव्हा जे जाणवलं ते मांडलं आहे. या विषयात अनेक भाग/मत मतांतरे आहेत. त्यातलं मला जे जाणवलं, जे सार्वत्रिक वाटले ते मांडलं आहे. हेच खरे, असेच करा असा अट्टाहास नाहीच आहे. पण , यावर विचार व्हावा अशी इच्छा आहे. आणि, म्हणूनच पहिल्यांदा मला स्वत: ला माझ्या विचारांशी प्रामाणिक राहता यावं म्हणून माझ्या निकालाआधी हे खरडलं आहे. इतकंच........ !
विनायक पाचलग
( सदरचा लेख साप्ताहिक साधनाच्या या आठवड्याच्या अंकात प्रकाशित झालेला आहे.)
प्रतिक्रिया
विचार
आहे खरे
विनायका, बर
चांगला लेख
चांगला लेख
बाजार
आदिती ताई
मराठी शब्द
+१
सहमत आहे
सहमत
टेक्निकल शब्द....!
१०१% सहमत...
च्यायला !!
विनायका म्हणजे तु आय आयटी ला जाणार नाहीस का रे?
मी
मग ठिक आहे रे.......
बाजार
मध्यन्तरी
छान लेख
+१
आजचा
क्लिंटन
क्लासेस ची
हाहाहा...
अरे विनायका किती किती रे तु हुशार.......
अरे मिहिरा
नाही रे
>>आपल्या
अहो ९००००
मग तेच तर
एक चौकशी...
लेख छान जमला आहे...
+१
आयच्यान
हेच म्हणतो
खुप छान
चित्ताकर्षक प्रतिसाद
) ---------------------------
टारझन राव
टारझन राव
>>>१. येथे
कैच्याकै ?
>>>तुम्ही
खुपच छान
कोज्ञानेश्वर माऊली की जय !
हाहाहा...
भविष्यात
पंचगंगा...
बिनडोक प्रतिसाद
Pagination