Skip to main content

(कदाचित)

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 20/05/2010 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : - कुमार जावडेकरांची सुंदर गझल कदाचित सरेल एवढा प्रहर कदाचित..? #:S असेल बाधली भगर कदाचित..! :S पुन्हा कधीतरी समीप येता.. तुझी चळेलही नजर कदाचित. ;) समोरुनी तुझ्या निघून गेलो. (पुन्हा खोदली मी कबर कदाचित..) करेल शांत या मनास आता.. तुझ्या कुपीतली लिकर कदाचित.. तरी किती मी बजावले मनाला- नसेल खोल ती गटर कदाचित. निघेल एक एवढी लचक अन. बनेल पूर्ववत कमर कदाचित? ----- B)
लेखनविषय:

वाचने 1460
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

उडालोच रे वाचून!!!!!!! आणि इतकं सगळं होउन पण कबंर पूर्ववत होणे कठीण.. :))

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आणि प्रतिसाद न देता नुसतेच वाचुन गेलेल्यांचे आभार! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.