पण आत्मानंदाची धुंदी / व्यसन त्याहून स्ट्राँग आहे म्हणतात.
खरं आहे! व्यसनच ते. आणि ही आत्मानंदची भुतं एकदा मानेवर बसली की उतरता उतरत नाहीत. त्यापेक्षा रात्री झोपताना मारलेले ब्लॅक डॉगचे दोन पेग निदान सकाळी उतरतात तरी आणि माणूस पुन्हा दिवसभर पुन्हा आपल्या पोटापाण्याच्या उद्योगाला लागतो! :)
तात्या.
तात्यासाहेब,
श्री .धनंजय यांनी ज्या "भज गोविन्दम "चा उल्लेख लेखाच्या प्रारंभी केला आही त्यातील एक कडवे असे :
********************************************
नारी स्तनद्वयनाभिप्रदेशम|
दृष्ट्वा मा गा मोहावेशम |
एतन्मांसवसादि विकारम |
मनसि विचिन्तय वारंवारं |
भज गोविन्दम भज गोविन्दम | गोविन्दम भज मूढमते |
*****************************************
(आठवले तसे लिहिले आहे.एखादी चूक संभवते.)
................................................................................
(सर्वसाधारण) अर्थ : स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय.(त्यात मोह पडण्यासारखे काय आहे? इट इज जस्ट अ मॉडिफिकेशन ऑफ फ्लेश & फॅट ) असा विचार मनात आण. पुनःपुन्हा हाच विचार कर.
.(त्यात मोह पडण्यासारखे काय आहे? इट इज जस्ट अ मॉडिफिकेशन ऑफ फ्लेश & फॅट ) असा विचार मनात आण. पुनःपुन्हा हाच विचार कर.
अरे वा रे वा! म्हणे यात मोहात पडण्यासारखे काय आहे! बोंबला तिच्यायला.... :)
सध्या संत तात्याबा महाराज हा फोटो निरखून पाहण्यात रममाण झाले आहेत! :)
आपला,
(सामान्य माणूस!) तात्या.
--
आमच्या सारखे सामान्यजन आहेत म्हणूनच शंकराचार्यांसारख्या मंडळींची चलती आहे! :)
इतके मोठे तपस्वी शंकराचार्य म्हणताहेत -
"स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय "
पण खरे सांगू का ! च्यायला हेच आमचे ते वीक प्वॊइंट आहे. संसारी माणूस आहे, पण ट्च्च भरलेल्या स्त्रीकडे वळून वळून पाहण्याचा मोहसुद्धा आम्हाला टाळता येत नाही. तसेच स्त्रीयांना म्हणे एक नजर असते, पुरुषाची नजर काय बोलते ते समजण्याची. त्यामुळे अनेकदा आमची नजर पकडल्या जाते , मैत्रीणींचे बोलणे खाल्ले आहेत. आमची नजर चेह-यावरुन मानेकडे घरंगळायला लागली की, उजवा हात गळ्याकडे नेतांना मैत्रीणीचे काय, हे ! असे नजरेतले भाव आम्हीही टीपले आहेत. :)
शंकराचार्यांना ठाण्याच्या संगीत डान्सबारला नेला असता ना ! ( सर्व खर्च आम्ही केला असता) नाही सौदंर्याचा श्लोक बदलला असता तर नावाचा प्रा.डॊ. नाही ! :)
जगात जे जे सुंदर आहे त्याच्याकडे टक लावून पाहणारा !
प्रा.डॊ.दिलीप बिरुटे
एक आचार्य श्री. फ्रँक बरोन म्हणजे श्री. रेमंड बरोन यांचे पिताश्री (आधिक माहीतीसाठी) यांचे एक वचन आहे. स्त्री व पुरूष दोघांना लागू आहे. बघा पटतय का?
"It does not matter where you get your hunger from as long as you eat at home."
----------------------------------------------------------------------------------------
जगात जे जे सुंदर आहे त्याचा असा आस्वाद घ्या की त्या सुंदरतेला पण वाटले पाहीजे की ह्याच रसिकासाठी हे सौंर्दय आहे.
लग्नातून पळालेले , लग्नच न केलेले , अर्धवट संसार सोडलेले , बायकोला घेउन वनवासात गेलेले , बायकोला सोडुन वनवासात गेलेले ..... असल्या आदर्शांनीच या देशाची सांसारिक स्थिती बाद करुन ठेवली आहे.
....
स्तनात चरबी असते ... तसा मेंदुही चरबीचाच असतो. त्याचे काय करणार ?
ज्याने निसर्गाचे अनेक नियम शोधून काढले असा महान भौतिक शास्त्रज्ञ आर्किडीज याने "संप्राप्ते सन्निहिते काले " काय केले ते थोडक्यात पुढील प्रमाणे. श्री. धनंजय यांनी या चर्चेचा प्रारंभ करताना जो मुद्दा उपस्थित केला होता त्यावर यामुळे किंचित का होईना, प्रकाश पडू शकेल असे वाटते.
..संदर्भ : द वर्ल्ड ऑफ मॅथेमॅटिक्स : सं.जेम्स न्यूमन : व्हॉल्युम वन :(पेज;१८५)
(आर्किमिडीज डाईड यॅट द एज ऑफ ७५ ऍट द टाइम ऑफ फॉल ऑफ सिरॅक्यूज २१२ बी.सी.)
....आर्किमिडीज वॉज अलोन एझॅमिनिंग अ डायग्रॅम, हॅविंग फिक्स्ड हिज माइंड & आईज ऑन द ऑब्जेक्ट ऑफ हिज इन्क्वायरी. अ रोमन सोल्जर केम अपॉन हिम विथ ड्रॉन स्वोर्ड इंटेंडिंग टु किल हिम. आर्किमिडीज बिसॉट & एन्ट्रीटेड ( विनवणी केली) हिम टु वेट अ लिटल व्हाइल ,सो दॅट ही (आर्कि.) माइट नॉट लीव्ह द प्रॉब्लेम अनफिनिश्ड. द सोल्जर डिड नॉट अंडरस्टँड & स्ल्यू (तलवारीने ठार मारले ) हिम.....
आपला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा आर्किमिडीज एक भौतिक प्रश्नावर प्रकर्षाने विचार करत होता. मृत्युनंतर काय हा प्रश्न त्याला शिवला नाही. " गोविन्द !गोविन्द !! " जपाचा प्रश्नच नव्हता.
आपला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा आर्किमिडीज एक भौतिक प्रश्नावर प्रकर्षाने विचार करत होता.
माफ करा, पण हे सर्व असबंद्ध वाटले.
तसे काय भगतसिंग हा फाशी जाईपर्यंत कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचत होता. चाफेकर बंधू गीता हातात घेऊन फासावर चढले. पण त्यांचा आणि आर्कीमिडीझचा जसा काही संबंध लागत नाही, तसाच आक्रिमिडीज आणि शंकराचार्यांचा लागत नाही. एकाची आवड भौतीक होती म्हणून त्याने त्याला कवटाळले तर दुसर्याची पारमार्थीक/तत्वज्ञानाची म्हणून त्यांनी त्याला कवटाळले. शिवाय सहज यांच्या चर्चेतील माझ्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे :
शंकराचार्य आपल्या शिष्याबरोबर काशीमधे हिंडत असताना त्यांना एक संस्कृतचा म्हातारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून कर्मठपणे केवळ व्याकरणाची घोकमपट्टी करवून घेताना दिसला. ते पाहून त्यांना सुचलेले हे काव्य आहे. त्याला स्त्रोत्र वगैरे म्हणून कोणी त्याच्या सारखे वागण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. कदाचीत पाचव्या वर्षीच पारमार्थीक ओढ लागलेल्या या व्यक्तीस संस्कॄत कधी कोणी शिकवले होते का ते माहीत नाही पण अवगत चांगलेच होते हे नक्की. त्या अनुभवावरून आणि पिंड कवीचा असल्यामुळे ते लिहीले गेले असावे. एम एस सुब्बालक्ष्मीमुळे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना ते आवडले असावे.
जेंव्हा आपल्याकडे तत्वज्ञान जागृत होते (शंकाराचार्यांच्या आधी) तेंव्हापण वैज्ञानीक प्रगती होती. ती नंतर निद्रीस्त झाली ह्याचा शंकराचार्यांना दोष देऊन समस्त भारतीय तामसी वृत्तीला त्यातून मुक्त करणे हे योग्य वाटत नाही... त्यात आर्कीमिडीज ने अमुक केले आणि शंकराचारर्यांनी तमुक म्हणजे एक घोडा म्हणून दुसरा गाढव म्हणण्यातला प्रकार झाला, असे वाटले. एखाद्या डॉक्टरचे ज्ञान आपण एखाद्या अभियंताशी अथवा अर्थशास्त्रज्ञाशी अथवा कुशल व्यवस्थापकाशी लावावे का? आणि या सर्वांचा भौतीक प्रगतीसाठी फायदा होऊ शकतो तसा लेखक/कवी/विचारवंताचा होत नाही म्हणून त्यांना कमी लेखाल का?
>> एकाची आवड भौतीक होती म्हणून त्याने त्याला कवटाळले तर दुसर्याची पारमार्थीक/तत्वज्ञानाची म्हणून त्यांनी त्याला कवटाळले.
पटले.
एखादा दारूडा शेवटच्या दिवशी देखील दारु पितानाच मरेल.
("स्वातंत्र्य"शब्दाची ची व्याख्या माहीत नाही पण) स्वतंत्र मन / मेंदू असल्याने प्रत्येक मनुष्य कुठल्याही गोष्टीचा आपापल्यापरीने अर्थ लावतो व जे योग्य वाटेल तेच करतो.
आता मात्र सगळाच ऍज युज्वल शब्दोछल वाटायला लागला आहे.
इथे आद्यशंकराचार्यांच्या विचारांचा तसेच अर्किमिडीजच्या विचारांचा लोकांवर काय परिणाम झाला असावा ते पहायचे आहे.
आचार्यांनी जरी वेदान्त तत्त्वज्ञानच मांडले असले तरी त्यांनी मायावादाचे अगदी सोप्या परिणामकारक शब्दांत,तर्कशुद्ध पद्धतीने आणि प्रभावी पणे प्रतिपादन केले. "ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या | जीवो ब्रह्मैव नापरः |" ही वचने बहुधा त्यांचीच असावी. "असार जीवित केवळ माया " हा विचार शंकराचार्यांच्या काळी पसरला नसला तरी नंतर कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या माध्यमातून तो जनसामान्यांं पर्यंत पोचला. आपल्या अध्यात्म तत्त्वज्ञानावर शंकराचार्यांचा फार मोठा प्रभाव आहे. किंबहुना अद्वैत तत्त्वज्ञान आणि मायावाद यांचे प्रवर्तक तेच मानले जातात.लोकांनाही मायावाद रुचला. कारण त्यामुळे काम करणे आणि जबाबदारी घेणे या गोष्टी टाळता आल्या. हे जग आभासात्मक असल्याने त्यात सुधारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. "अगा जे घडलेचि नाही, त्याची वर्ता पुससी काई?" असे सामान्यजनही म्हणू लागले.जे काही करायचे ते मोक्षासाठी.कारण अंतिम सत्य म्हणजे परब्रह्म.त्याच्याशी एकरूपता हेच जीवनाचे इतिकर्तव्य. या विचारामुळे लोकांनी भौतिक जगाकडे पाठ फिरवली.त्यासंबंधीचा विचारच सोडला. आणि कल्पनिक पारलौकिकाच्या मागे लागले. त्यामुळे आपली भौतिक प्रगती खुंटली.
.."संप्राप्ते सन्निहते काले " आर्किमिडीज ने जे केले त्याचा परिणाम लोकांवर काय झाला असावा ते उघडच आहे. रोमन सैनिकाने जरी त्याला मारले असले तरी ग्रीकां प्रमाणे रोमनांवरही आर्किमिडीजच्या विचारांचा प्रभाव पडला असणार. म्हणून संपूर्ण युरोपभर वैज्ञानिक प्रगती झपाट्याने झाली. हा दृष्टीकोनांतील भेदांचा परिणाम आहे.
हे सगळे वाचुन मला एकाच वेळी आपण सन्यस्त, उपभोगवादी ,शास्त्रज्ञ , हतबुद्ध बुद्ध , ग्रीक , आर्किमीडीज ला दरबारत बोलावायला गेलेला दरबारी ,जगाकडे पाठ फिरवलेला हिप्पी , स्वतःला पाहणारा प्रेक्षक , स्वतःला ऐकणारा श्रावक ,याज्ञवल्क्यांचा शिष्य , राजा भोजा कडे गेलेला गंगु तेली , स्वतःची पाठ खाजवायला काहीच न मिळालेला विश्व चिंतक ,अर्जुनाचा पाञ्चजन्य , कंसाच्या दरबारातला कुवलयपीड हत्ती , नचिकेत यमलोकात गेला असता त्याच्या ऐवजी विट्टी दांडुच्याटीम मध्ये घेतला गेलेला भिडु , हरिस्चन्द्राला विकत घेणार्या डोम्बाचे हातावर पाणी टाकणारा हरकाम्या , टिळक किती सुपारी खातात याची गायकवाड वाड्याबाहेर चर्चा करणारा पुणेकरज्येष्ठ नागरीक , बेलबागेत प्रवचनत वाती वळायला चांगली जागा मिळावी म्हणुन लवकर गेलेल्या आजीबाई आहोत असे वाटत आहे.....अवस्था थोडीशी प्रद्युम्नासारखी उन्मनी , स्थितप्रज्ञा सारखी आणि निव्रुत्ती वेतनात नुकताच अरीयर जाहीर करुनही न मिळालेला म्युनसीपल हापिसर अशी एकसमयाच्छेदेकरुन झालेली आहे
काही जुने जाणते लोक याला सोमवल्ली किंवा सोमप्रिया मुळे आलेली अवस्था असे म्हणतात
यावर उतारा आम्ही ( बघा बघा भाषा सुद्धा कशी बदलत चाल्येय) शोधत आहोत.
तोपर्यंत उतार्याच्या शोधात.........याच अवस्थेत असलेला विजुभाऊ
"स्वतःची पाठ खाजवायला काहीच न मिळालेला विश्व चिंतक"
काही लोक जानव्यानेसुद्धा पाठ खाजवतात.आमचे एक शेजारी असे करायचे...चाळीतले सगळे जण त्याना "खाजानवे" म्हाणायचे.
आठवुन ह ह पु वा
विज्ञान आदि गोष्टींचा पाठ्पुरावा करायला, व्यासंग करायला, माणसाचा धर्म शाबूत हवा. त्यावरच जर अतिक्रमण होत असेल, मनसिक गुलामगिरीचं जोखड घातलं जात असेल तर कुठलं विज्ञान आणि कुठलं व्याकरण? पदोपदी हिंदू धर्मावर अन्य धर्मीय अतिक्रमण करतात तेव्हा आदि शंकराचार्यांसारख्या तेजस्वी विभूतीचा अवतार ही अतिशय आवश्यक बाब होऊन बसते.
त्यांनी हिंदू धर्म टिकवला म्हणून आहे तेवढी तरी प्रगती होऊ शकली. शंकराचार्यांच्या "भज गोविंदम" मुळे वैज्ञानिक दृष्टीला खीळ बसली नसून, मूलभूत गोष्टी - धर्म यंच रक्षण झालं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
विज्ञान, व्याकरण, धर्म आदि गोष्टींचा पाठ्पुरावा करायला, व्यासंग करायला, माणसाचे स्वातंत्र्य शाबूत हवे. त्यावरच जर अतिक्रमण होत असेल, मनसिक गुलामगिरीचं जोखड घातलं जात असेल तर कुठलं विज्ञान आणि कुठलं व्याकरण आणि कुठला धर्म?
असे वाक्य असते तर समजले असते, आणि सहमत असतो. परंतु ज्या प्रकारे वाक्य लिहिलेले आहे, त्यावरून प्रतिक्रियेचा पुढचा भाग समजला नाही.
धर्मांतर केलेल्या स्वतंत्र लोकांची प्रगती होते, आणि धर्म कायम राखलेल्या स्वतंत्र लोकांचीही प्रगती होते. अस्वतंत्र असल्यास धर्मांतरितांचीही अधोगती होते, आणि धर्माधिष्ठितांचीही. अर्थात येथे मोठाच प्रश्न पडतो "प्रगती म्हणजे काय?" शुचि यांच्या मते "प्रगती"चा अर्थ काय वाटतो? आणि शंकराचार्यांनी कुठल्या परधर्माविरुद्ध हिंदू धर्माचे रक्षण केले? त्यांचे बहुतेक वादविवाद हिंदूधर्मातील अन्य पंथांशीच होते. (आणि आजकाल काही लोक म्हणतात की बौद्ध धर्मही हिंदू धर्माचाच एक पंथ आहे - विशेष करून आक्रमण करून आलेला धर्म नाही.) यावेगळ्या कुठल्या धर्मापासून हिंदूधर्माला शंकराचार्यांनी वाचवलेले शिचि यांना ठाऊक आहे काय?
शंकराचार्यांच्या काळाच्या आधी शक-हूण वगैरे जे लोक भारतावर चालून आले, ते इथे राहिल्यास वैदिक/बौद्धच झाले. (मिलिंद, कनिष्क वगैरे)
शंकराचार्यांच्या काळानंतर आलेले आक्रमक सम्राट मात्र हिंदू/बौद्ध झाले नाहीत, भारतातील काही लोकांना मात्र धर्मांतरित केले. मग शंकराचार्यांच्या शिकवणीने धर्मांतर वाचवले नाही, तर उलट वाढवलेच!
मी जे वाचलं त्यावरून -
Shri Adi Shankaracharya or the first Shankara with his remarkable reinterpretations of Hindu scriptures, especially on Upanishads or Vedanta, had a profound influence on the growth of Hinduism at a time when chaos, superstition and bigotry was rampant. Shankara advocated the greatness of the Vedas and was the most famous Advaita philosopher who restored the Vedic Dharma and Advaita Vedanta to its pristine purity and glory.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
वरील इंग्रजी परिच्छेदाचा परचक्र, परधर्मीयांचे आक्रमण, वगैरे मुद्द्यांशी संबंध कळला नाही.
had a profound influence on ... Hinduism
याबाबत सहमत. कदाचित growth शब्द समजलेला नाही, पण "कालक्रमण" या अर्थी चालेल.
पण chaos (अंदाधुंद), superstition (अंधश्रद्धा) and bigotry (पंथीय दु:स्वास) शंकराचार्यानंतर कमी झाली ती कुठली? काही उदाहरणे देता येतील का?
शंकराचार्यांच्या आधी नेमकी कुठली अंदाधुंद होती, जी त्यांच्या शिकवणीनंतर नव्हती? आधी कोणती अंधश्रद्धा होती, जी त्यांच्यानंतर नव्हती? आधी कोणता पंथीय दु:स्वास होता जो त्यांच्यानंतर नव्हता?
परधर्मीयांच आक्रमण माझी चूक झाली. ( I read between the lines)
उदाहरणं मला तरी माहीत नाहीत.
पण एक वाचलं की अनेक परस्परांत भांडणारी राज्य होती. शंकराचार्यांनी ४ मठ स्थापन केले ज्यानी मनोबळ तसच ऐक्य वाढीस लागलं असावं.
While Shankaracharya criticized Buddhism in its decayed form, he assimilated many tenets of Buddhism cleverly, like that of nirvana (void). It was Shankaracharya who was responsible to absorb Buddha into Hinduism and recognize Buddha as an avatar (incarnation) of God !
बुद्धीझम ही हिंदुत्वाची शाखा म्हणून प्रस्थापित करण्यातही त्यांचा हात दिसतो.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
अगदी १९४७ पर्यंत भारत कुठल्याही क्षेत्रांत मागे नव्हता. कोलकाता विद्यापीठ सारख्या विद्यापीठातून रमनना नोबेल भेटले होते. १९४० साली प्रायवेट कंपन्या विमाने बनवत होत्या इत्यादी इत्यादी. पारतंत्र्य जरी असले आणि हिंदू धर्म संकुचित जरी वाटला तर आंबेडकर सारखा गुणी मुलगा १००% निर्धन असून सुद्धा कसा तरी इंग्लंड अमेरिकेत जावून शिकला होता.
भारताची गरिबी आणि अधोगती हि १९४७ सालापासून जास्त वेगाने सुरु झाली. सर्व जग अत्याधुंक होत असताना आमचे मूर्ख लोक मात्र चरखा धारी आणि खादी धारी ब्रिटीश एजंट लोकांच्या नादाला लागली होती. गांधी नेहरू स्वतःला स्वातंत्र्य सैनिक म्हणत असोत पण प्रत्यक्षांत त्यांची लढाई गोर्या साहेबा कडून सत्तेची दोरी आपल्या हातात घेण्याची लढाई होती. देशातीन बहुतेक कायदे ब्रिटीश लोकांनी आम्हा लोकांना खितपत आणि असहाय्य बनवण्या साठी केले होते तेच चालू आहेत. ह्यातून नवीन ते काय येणार ?
व्ययैक्तिक स्वातंत्र्य हे समाजाच्या प्रगतीचे मूळ कारण आहे. जेंव्हा प्रत्येक माणसाला आपले आयुष्य स्वताच्या विचारांनी जगण्याचे स्वातंत्र्य असते तेंव्हा १०० माणसात एखादा माणूस एक नवीन दिशा दाखवतो. पण आपले कायदेच असे आहेत कि व्यक्ती स्वातंत्र्य हे आम्हाला शिवी घातल्या सारखे वाटते. सर्व शिक्षण व्यवस्था सरकारी ताब्यांत असल्याने एकाच प्रकारचे गाढव ह्या व्यवस्थेतून बाहेर येतात.
बघा बरं, एवढं झालं तरीही भागवतसाहेब म्हणतात की व्यक्तीहित बाजुला ठेवून आधी राष्ट्रहित बघितले पाहिजे. ते चर्खा-धारी-खादी-एजंट आणि ह्या लोकांच्या बोलण्यात काहीच फरक नाही. आता काय करावे बरे?
प्रतिक्रिया
मादक आव्हानत्मक स्त्री
खरं आहे! :)
मादक स्त्री
अरे वा रे वा!
यनावाला साहेब !
ह्या बाबतीत
सहमत
संप्राप्ते सन्निहिते काले....
संबंध लागला नाही...
पटले
जगन्मिथ्या
तोपर्यंत उतार्याच्या शोधात
काही लोक जानव्यानेसुद्धा पाठ खाजवतात
विज्ञान
स्वातंत्र्य शाबूत हवे
मी जे
खरे आहे, पण परचक्राशी संबंध?
परधर्मीया
अत्यंत दर्जेदार चर्चा एकाहुन एक प्रतिसाद
अगदी १९४७ पर्यंत भारत
बघा बरं, एवढं झालं तरीही
साहना जी
सहमत
प्रतिसाद आवडला. यावरून माझ्या