✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आणखी बुडीत खाते ('त्या' बुडीत खात्यांशी संबंध नाही)

न
नितिन थत्ते यांनी
Wed, 05/12/2010 - 21:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18716 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

इथूनपुढे

शिल्पा ब
गुरुवार, 05/13/2010 - 23:08 नवीन
इथूनपुढे नीट भाडं घेत चला...नाहीतर दंड म्हणून अजून २ रु. जास्त घेईन पुढच्यावेळेस .... जागरूक (ग्राहक (आणि नाहक) पंचायतिवाली ) नागरिक शिल्पा *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना बेरके

कॉलेजात

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/13/2010 - 14:56 नवीन
कॉलेजात शिकत असताना घरी दोघेजण आले. तेव्हा घरात मी व लहान भाऊ असे दोघेच होतो. आल्यावर त्यातील एकाने ओळख दिली कि अमुक तमु़क ठिकाणी राहणार्या तुमच्या आत्यांच्या अपार्टमेंटमध्येच माझे नातेवाईक राहतात. मी भोळेपणाने त्यांना या या म्हणालो व उपचाराप्रमाणे पाणी घेणार का म्हणुन विचारले.त्यांनी हो म्हटले.पाणी घेऊन हॉलमध्ये आलो तर एकजण खुर्चीवर आणि एकजण जमिनीवर बसला होता. जमीनीवर बसलेला मला म्हणाला कपडे दाखवायचे होते.आणि त्याने तेथेच कपड्यांचा बाजार मांडला. त्यांना धडपणे जा ही म्हणता येईना.(भोळसटपणाने मी त्यांना काका काका संबोधायल सुरवात केली होती. काका आता तुम्ही जा असे म्हणणे मला प्रशस्त वाटेना). मला म्हणाला कि एखादे कापड घ्या पैसे नंतर दिले तरी चालतील. त्यांच्यातील दुसरा तसा आडदांडच होता.मला उगाच भीती कि काही उलटेसुलटे झाले तर हा मारायलाही कमी करायचा नाही. शेवटी चारशे रुपयाला बहीणीसाठी ड्रेस मटेरियल घेतले. मग त्यांची चौकशी चालु झाली.बहीण कुठे राहते.गावात अजुन कोण कोण नातेवाईक आहेत का.? पण ह्या प्रश्नांना धडपणे उत्तर न देता तुटकच उत्तरे दिली व त्यांची बोळवण केली.(कधीतरी वडिलांनी असे किस्से सांगितले होते.एकाकडुन पत्ता घ्यायचा.त्याच्याकडे जायचे.आपला संदर्भ द्यायचा आणि गंडवायचे.) बहीणीला ते ड्रेस मटेरियल बरे वाटले.भले ह्या व्यवहारात तसे नुकसान काही झालेही नसेल पण इच्छा नसताना नको असलेली गोष्ट माझ्या मूर्खपणामुळे कुणी माझ्या गळ्यात मारुन गेला आणि शक्य असतानाही मी ते टाळु शकलो नाही हा विचार अजुनही माझे डोके खातो. साले ते दोघे आता कधी कधी तर माझ्या डोक्यात शिरतात. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

मला इथे

भारद्वाज
गुरुवार, 05/13/2010 - 16:56 नवीन
मला इथे सी.बी.डी.मधे सुद्धा आला होता असा अनुभव. पहिल्यांदा झाली फसगत. अशावेळी आपण अनुभवातून शहाणे होतो पण आपल्यासोबत असणारे स्वानुभवातूनच शहाणे होणे पसंद का करतात ते कळत नाही. मागच्या वर्षी आम्ही मित्र गोव्याला गेलो होतो. क्रूझवरून धमाल करून पणजी बस स्टँडला रात्री ८-८.३० च्या सुमारास पोहोचलो. आझाद भवनला जाण्यासाठी बस पकडायची होती. तर वाटेत नाटकी कुटुंबकबीला येउन धडकला. तेच रडगाणे. मित्रलोक विरघळले. मित्रांना परोपरीने समजावूनसुद्धा शेवटी त्यांनी १०० रु. दिलेच त्यांना.
  • Log in or register to post comments

अय्या

शिल्पा ब
गुरुवार, 05/13/2010 - 23:12 नवीन
अय्या सी.बी.डी. त कुठे तुम्ही ? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज

खरडवहीत लिहिले आहे

भारद्वाज
Fri, 05/14/2010 - 10:37 नवीन
या धाग्यात अवांतर चर्चा नको म्हणून तुमच्या खरडवहीत लिहिले आहे. -जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

असाच एक अनुभव..

योगी९००
गुरुवार, 05/13/2010 - 17:00 नवीन
लहानपणी कोल्हापुरला असताना असेच दोन सरदारजी आले होते..घराच्या बाहेर special nameplates करून देतो म्हणून आगाऊ रु.१०० घेतले आणि गेले ते गेले..त्यांनी सांगितले होते की चंदिगड का लुधियाना वरून nameplates येतील. फक्त आम्हालाच नाही तर पुर्ण बिल्डिंगला (सर्व मिळून साधारण ८ घरे)चुना लावून गेले. सगळेजण नंतर त्याची आठवण काढून फार हसायचे.. गंमत म्हणजे एकाच वेळी सगळे hypnotize झाल्यासारखे फसले. बाकी hypnotisam ने फसलेले दोन मोठे अनुभव (ते पण नात्यातले) मला माहीत आहेत. ते परत कधीतरी सांगतो..!!! खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

असे प्रसंग

विकास
गुरुवार, 05/13/2010 - 22:59 नवीन
असे काही प्रसंग आठवले अथवा इतरांकडून वाचले की मनातल्या मनात मी खालील ओळी म्हणू लागतो: काली घटा छाय मोरा जिया तरसाय ऐसेमे कोई कही मिल जाय बोलो किसा का क्या जाय, रे क्या जाय, रे काय जाय... :-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

कॉलेजात

टिउ
गुरुवार, 05/13/2010 - 23:46 नवीन
कॉलेजात शिकत असतांना (किंवा नसतांना)ची गोष्ट आहे. एकदा मी आणि माझा एक मित्र कट्टयावर गप्पा मारत बसलो होतो. तर एक माणूस तिथे येउन उभा राहीला. २५-२६ वय असेल. फाटलेले कपडे, दाढी वाढलेली, हातापायाला खरचटलेलं होतं. येउन बराच वेळ नुसता उभा होता. मग आम्हीच विचारलं काय झालं. तर म्हणाला साहेब मी ट्रक वर क्लिनर म्हणुन काम करतो. परवा ड्रायव्हरशी भांडण झालं आणि त्यानी ट्रक मधुन ढकलुन दिलं. खिशात पैसे पण नाही, दोन दिवसापासुन काही खाल्लं नाही, अंग दुखतंय वगैरे वगैरे... मी विचारलं की दोन दिवसापसुन कसली वाट बघत होता तर म्हणाला कुणाकडुन पैसे मागायची लाज वाटत होती, पण आता सहन होत नाहीये...बसभाड्यापुरते पैसे द्या! आता कॉलेजला असतांना कुठ्नं खिशात पैसे असणार. तरी दोघांकडे मिळुन ६५ की काय रुपये मिळाले ते त्याला दिले. पत्ता मागत होता, घरी गेल्यावर पैसे पाठवतो म्हणाला. पण आम्ही काही पत्ता दिला नाही... खरं बोलत होता की खोटं माहीत नाही, आणि आता कळणारही नाही. पण गरजु व्यक्तीला मदत केल्याचं समाधान मिळालं होतं. आताही बरं वाटलं आठवुन...
  • Log in or register to post comments

उत्तम

बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/14/2010 - 15:53 नवीन
उत्तम अनुभव कथन. आणि मुख्य म्हणजे अगदी प्रामाणिक कथन. त्याबद्दल कौतुक वाटते. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा