..मैफिल..
लेखनविषय:
काव्यरस
पसरता सभोवती, धुंद केतकी हवा..
रान पेटले असे,मेघ तु मला हवा..
शिंपिता नभातले चांदणे तनावरी..
घुमु लागला मनी,पारव्यांचा थवा..
सप्तरंगी नाहता,मधाळ स्मित चुंबिता..
मनी दाटला असा,अवीट एक गोडवा..
तु मला लपेटता, श्वास उष्ण गुंफता..
मनामध्ये पसरला..धुंद कुंद गारवा..
रात्र थांबली जणु,रात्र लांबली जणु..
खेळ प्रीतीचा असा बहरला नवानवा..
मैफिलित ह्या तुझ्या तनिमनिमी गुंतले..
झंकारले मनातुनि ,बोल हेच वाहवा..
ऐक रे सख्या अता,निवांत शांत स्तब्धता..
तृप्त रोग भोगला,पुरे जाहली दवा..
अजाणता असा कसा पाय हा घसरला..
करु नकोस रे सख्या..कधी कुठे ..शू...गवगवा.
- योगेश जोशी.
वाचने
1419
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
शेवटची ओळ वगळता मैफिल छान जमली आहे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
In reply to शेवटची ओळ by मीनल
खरेतर कवितेचे शेवटचे कडवे अगोदर सुचले होते.
त्यावरुन मी कवितेला "व्यभिचार" हे नाव देणार होतो.
पण मग बाकीची कडवी सुचत गेली.
नैतिक असो वा अनैतिक असो.. शृंगार हा श्रुंगारच असतो आणि त्याभावनेनेच शेवटचे कडवे तसेच ठेवले आहे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मीनल!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
शिंपिता नभातले चांदणे तनावरी..
घुमु लागला मनी,पारव्यांचा थवा.
क्या बात है ! ! सुरेख कविता ! ! !
छान लिहिलेस. आवडले.
रात्र थांबली जणु,रात्र लांबली जणु..
खेळ प्रीतीचा असा बहरला नवानवा..
ह्या ओळी वैशिष्ट्यपूर्ण! खूप सुंदर!!
शृंगार वर्णितांना तोल सांभाळणे खूप महत्त्वाचे. ते छान सांभाळलेस.
पण व्यभिचारच जाणवायला हवा असा अट्टाहास असल्यासारखे शेवटचे कडवे झाले आहे. वास्तविक बाकीची संपूर्ण रचना सहज आणि कुणाही लग्न झालेल्या युगुलास साजेशी आहे! :)
राघव
शेवटची ओळ