हे जीवन सुंदर आहे!!!!!
अशीच एक वसंतातली पहाट ... खिडकीतून येणारी थंड, मंद, सुखद वार्याची झुळुक गात्रास हलकेच स्पर्श करून जात होती..थोड्याच वेळात तमाचा पडदा सरला अन त्या झुळुकेने जाग आली.... सर्वांग खूपच हलके वाटू लागल्रे..अचानक अंथरूणाचा तिटकारा उत्पन्न झाला... उठ्ले.. शांत गॅलरीत उभारले.. खाली रस्ताही शांत .. वेळ पहाटे ५ वाजले असतील कदाचित... तुरळ्क व्यायामप्रेमी रस्ता कापत होते...
एका द्रुष्टिक्षेपात नजर स्थिरावली ती गॅलरीतल्या नुकत्याच लावलेल्या गुलाबाच्या रोपावर.. परवापर्यंत अगदी छोटीशी घट्ट मिटलेली कळी उमलण्याच्या प्रयत्नात होती..कालच जणू तिला जाणीव झाली की आता आपल्याला मोठे व्हायचे..फुलायचे..आणि एकाच दिवसात बळ एकवटून तिचा उमलण्याचा प्रयत्न माझ्या नजरेने टिपला होता... वाटलं काय सुंदर जीवन आहे हे!!!
मनात आले की मोठे होण्याची प्रक्रीया सुरू... माणसाचंही तसचं असतं तरं.. जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत घट्ट कळी बनून सुप्तावस्थेत पडायचे...आणि आयुष्यात कोणीतरी येण्याची चाहूल लागताच उमलायला सुरूवात करायची ... व्वा!!! ख्ररचं खूप मज्जा आली असती जर असे असतम तरं..
वस्तुतः ती कळी उमलण्याची प्रक्रिया कधी सुरू झाली हि फारचम सूक्ष्म असल्याने जाणवली नसेल मला... म्हणूनच उगाचचं गुलाबाची कळी स्वछंदी, मनस्वी वाटली..तिला सुद्धा शेवटी काळाचे बंधन आहेच की!! एका ठराविक काळानंतर तिलाही सक्तीने मोठे व्हावं लागत असेल कदाचित..कारण कळीच्या रुपात जगायला तिला आवडलं नसतं का??
कळीचं फूल होणं ही खचितच आनंददायी घटना आहे..पण मोठे झाल्यावर पूर्ण फुलल्यावर एका विशिष्ट कालानंतर त्या पाकळ्यांना गळावं लागतं हे विसरून कसे बरे चालेलं??
माणसाचं ही तसचं आहे... उगाचचं "बालपणं देगा देवा" म्हणत नाहीत!!! एकापाठोपाठ येणार्या अटळ बदलांना सामोरे जावे लागणारे असल्याने कदाचित बाल्यावस्था सोडुच नये असे वाटते ...किंवा वार्धक्याच्या भीतीने कदाचित????
पण मधला तारूण्याचा काळ विसरून कसे चालेल?? पूर्णावस्थेचा .. जगण्याचा... कमावण्याचा आणि मग शेवटी गमावण्याचा... तारूण्यातच नवनिर्मितिची आस असते... अनेक प्रकारची उन्नती.... वैचारिक, सामाजिक...
याच काळात असतात खूप स्वप्नं.. आशा आणि आनंदच आनंद!!!
या सगळ्याला काळाच्या पट्ट्याने बांधून घातले आहे हे लक्षात येते ते वार्धक्यात.. मागे वळून पहाताना वाटतं बालपणचं सुखात गेले.. मायेच्या छायेखाली .. बिनधास्त!! तारूण्यातही मस्ती लुटली.. आणि आता अटळ वार्धक्यालाही सामोरे जावे लागणारं...
मला वाटतं वार्धक्य या शब्दाला उगाचच निराशेची किनार आहे.. ख्ररं पाहिले तरं उत्तम विचारांची बैठक, जगण्याचा आनंद लुटण्याची कला.. कोणालाही न दुखावण्याचा स्वभाव असेल तर कशाला घाबरावे या वार्ध्यक्याला?? केवळ शरीर थकले म्हणून?? छे छे!!! हा तर खास स्वतःसाठी राखून ठेवलेला काळं.. जे काही करायचं, शिकायचं, जगायचं राहिलं ते करण्याचा, शिकण्याचा, जगण्याचा!! मधे अधे कुरबूर चालणारच की!! पण ती ही आनंदाने झेलेली कि मग काहिच अवघड
नाहिये... हो खरचं आयुष्यात पूर्ण न करता आलेल्या साथीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात.. एकामेकाला वेळ द्यावा..आणि शेवटी टपोर्या फूलाला जसे गळावं लागतं तसेच आपणही एक दिवस गळून जावे... यात दु:खाचा लवलेश ही नसावा.. कारण यात काही करायचे राहिले या पर्यालालाच फाटा दिलेला असावा...
एवढ्या विचारांच्या वादळात ती कळी क्षणाक्षणानं मोठी होताना जाणवली अन कणाकणानं मला आयुष्याचं तत्त्वज्ञान उलगडून गेली .... खरचं हे जीवन सुंदर आहे! हे जीवन सुंदर आहे!!!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अप्रतिम! -- इ
खरच खुप सुंदर
कसं क्काय सुचतं...
मन शांत
जोपर्यंत
सुंदर, खुप
फारच
+१ खरंच
अप्रतिम
वाह
केवळ अप्रतिम
आवडेश.
असेच
तुझा लेख म्हणजे दुर्दम्य आशेचा कवडसा ...
मस्तच!! --