शांततेचं कार्टं चालु आहे ...
मित्रांनो, तुम्हाला 'शिवाजी पार्क' किंवा 'शिवतिर्थ' हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर काय येते ?
"माझ्या तमाम हिंदु/मराठी बंधु-भगिनीं आणि मातांना माझा नमस्कार" अशी साद घालुन आपल्या तडाखेबंद भाषणाची व बर्याच वेळ त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणर्या बाळासाहेब ठाकरे व आता राज ठाकरे ह्यांच्या लाखोंच्या सभा ....
भाजप-सेनेचे महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आल्यावर त्यांनी लोकांसमोर साजरा केलेला "ऐतिहासिक शपथविधी' समारंभ ...
आपल्या मिश्किल शैलीत बोलता बोलता विरोधकांना तोंडावर पाडणार्या शरद पवार ह्यांच्या लाखा-लाखांच्या सभा ....
शिवसेना आणि मनसे सारख्या पक्षांच्या स्थापनेच्या सभा ...
'संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या' वेळेला आचार्य अत्रे, प्रबोधनकार आणि इतर इतर नेत्यांच्या जंगी सभा ...
पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर शिवाजी पार्कावर 'विजयसभा' घेणारे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण ...
शिवसेनेचा गेली ४० वर्षाहुन अधिक चालु असलेला 'ऐतिहासिक दसरा मेळावा' ....
ह्या आणि अशा इतर असंख्य घटनांची साक्ष आहे हे 'शिवाजी पार्कचे मैदान' आणि त्यावरील मातीचा प्रत्येक कण !
पण आता हे सगळे इथेच थांबणार आहे ...
तिथल्या परिसरात राहणार्या काही 'शांतताप्रिय नागरिकांच्या' अर्जावर सुनावणी म्हणुन काल कोर्टाने शिवाजी पार्क मैदान हा "सायलेन्स झोन" म्हणुन घोषीत केला.
आत इथुन पुढे तिथे एकही सभा होणार नाही कारण नव्या आदेशानुसार मैदानात 'शांततेचा भंग होऊ नये' म्हणुन लाऊडस्पिकर लावण्यास बंदी असेल व त्याविना सभा घेण्याचा विचारही मुर्खपणाचा ठरेल !
शिवाजी पार्क आता एका 'मुर्खपणाच्या शांततेत सुखाने नांदु' लागेल ह्याबाबत आमच्या मनात अजिबात किंतु नाही.
'शांतताप्रिय व आपल्या हक्कांची जाणीव असणार्या' आजच्या काळातल्या जागरुक नागरिकांचे अभिनंदन !
तुम्ही शांतता आणलीत पण लोकशाहीच्या आणि आजच्या काळात अत्यावश्यक असणार्या एका 'भाषणरुपी तेजाचा' गळा घोटलात त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन !
हक्क आणि त्यांच्या अंमलबजावणीचा अंध अट्टाहास ह्यातला फरक न समजणार्या व आपले हक्क बजावताना किमान तारतम्य विसरणार्या शांतताप्रिय नागरिकांचे पुन्हा एकदा अभिनंदन ...
शांतता आम्हाला आवडतेच, पण हे 'शांततेचं कार्टं' पार आमच्या ऐतिहासिक राजकीय संस्कॄतीच्या मुळावरच उठलं हे मान्य करायला हवच !
जे झाले ते योग्य नाही, न्यायालयात सर्वांनाच 'न्याय मिळतोच' असे नाही हे पटले ...
मित्रांनो, ही अशी घातक मनोवॄत्ती कुठेतरी रोखायला हवी.
हक्क हक्क हक्क म्हणुन अशा एकेक गोष्टी हिरावुन घेतल्या तर येणार्या नव्या पिढ्यांना आम्ही कशाचा वारसा देणार ?
( ता.क. : हापिसात भयंकर काम असतानाही राहवत नाही म्हणुन ह्या ४ ओळी खरडल्या. ह्यावर सविस्तर भाष्य करणारा लेख ह्याच ठिकाणी काही वेळात टाकेन. तुर्तास चर्चा चालु व्हावी म्हणुन आमच्यातर्फे ही ४ अक्षरे, मला मिपाकरांचे मत जाणुन घ्यायला आवडेल : ) )
अवांतर :
लेखासाठी मला काही छायाचित्रांची आवश्यकता आहेत. नवे / जुने नेते शिवाजी पार्कवर प्रचंड जनसमुदायाला संबोधित करतानाची छायाचित्रे हवी आहेत. मी आत्ता हुडकायचा प्रयत्न केला पण कामाच्या गडबडीत हवे ते मिळत नसल्याने ह लेख म्हणुन असा 'तात्पुरता' लिहला आहे.
कुणाकडे अशी छायाचित्रे असतील तर कॄपया इथे द्यावीत, मला त्याच्या मदतीने एक सडेतोड लेख लिहणे सोपे जाईल !
धन्यवाद !!!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
संपुर्ण सहमती!
छोटा डॉन,
मुर्खपणा.........कोर्टाचा...
'शिवाजी पार्क'
संस्कृतीचं कार्टं काय कमी आहे का?
- गणेशोत्सवात गल्लोगल्ली चालणारा ठणठणाट
- अनंत चतुर्दशीची मिरवणूक
- नवरात्रीतले गरबे
- पहाटेची बांग
- १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे, वर्षभरात अनेकदा येणार्या शिवजयंत्या
- गल्लीबोळातल्या कुणाचीही लग्नकार्यं
- कुठल्याही राजकीय नेत्यांच्या सभा
- खुल्या मैदानांत चालणारे सांगीतिक जलसे
- अगदी ट्रॅफिक जॅममध्ये ठो ठो वाजणारे भोंगे
अशा निमित्तांनी चाललेल्या धांगडधिंग्याविषयी थोडी तक्रार केली की लगेच आम्हाला आमच्या महान संस्कृतीविषयी उठसूठ कोणी न कोणी धडे देऊ लागतं. त्यामुळे आम्ही असंही म्हणू इच्छितो: आम्हाला आमची संस्कृती आवडतेच, पण हे 'संस्कृतीचं कार्टं' पार आमच्या मानसिक, शारिरीक आरोग्याच्या मुळावरच उठलं आहे, हे मान्य करायला हवंच! - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||सहमत
इतर
+१
अगदी
१००%
क्षणभर म्हणु, केलं मान्य...
काय हरकत आहे?
हरकत आहे ...
डॉन राव हे
उलटे फोटो
+१
डान्राव
@ डान्या
अरे देवा माझ्या
मूलभूत अधिकार
शिवाय १०
समजले नाही ...
आवाज
वैयक्तिक रोख!
सुवर्णमध्य काढता आला असता.
किती सभा
वर
हॅ हॅ हॅ
>>अश्या
हा हा हा
>>'जंगलक्रम'