मीटींगा
कार्यालयात चालणार्या मीटींगा हा एक फार गमतीदार प्रकार आहे. अर्थात यात विविध प्रकारची ज्ञानवाटणी सत्रे (नॉलेज-शेअरींग सेशन्स), दूरध्वनी मीटींगा (कॉल्स), एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आयोजित केलेली मेंदूवात सत्रे (म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स अर्थात मेंदूला वात आणणारी सत्रे) इत्यादी देखील ग्राह्य धरता येतात.
मला नेहमीच खूप लांबलेल्या मीटींगांमध्ये सगळ्यांना येते तशी झोप येत नाही पण कंटाळलेल्या सदस्यांचे निरीक्षण करण्यात खूप मजा वाटते. अर्थात मी देखील कंटाळलो असेल तरच! परवा पल्याडच्या (ऑनसाईट) एका ग्राहकराजाच्या (क्लायंट) बड्या व्यक्तीने पुढील प्रवासाची रुपरेखा आणि त्याबद्दलची माहिती (रोडमॅप) याबद्दल एक सत्र आयोजिले होते. कुठल्यातरी संकेतस्थळावर जाऊन मग त्याचा डेस्कटॉप बघता येणार होता आणि मग मीटींग सुरु होणार होती. आता दोन तास डोक्याला शॉट बसणार, लंचटाईम हुकणार, कॅन्टीनमध्ये काहीच शिल्लक राहणार नाही, मीटींगमध्ये मस्त झोप येणार पण झोपता नाही येणार वगैरे भाव घेऊन मंडळी दालनात दाखल होण्यास सुरुवात झाली. ठरलेल्या वेळेच्या १५ मिनिटांनंतर सगळी प्रकल्पप्रजा आली. गार-गार वातानुकुलीत दालनात ३५-४० टाळकी निरीच्छेने जमली होती. आमच्या मॅनेजरने त्याचा लॅपटॉप घेऊन त्याच्याशी कुस्ती सुरु केली. युजरनेम आणि पासवर्ड टाकून टाकून तो थकला पण त्या विशिष्ट संकेतस्थळावर जाऊन डेस्कटॉप बघण्याचे भाग्य अजून लाभत नव्हते. मॅनेजरच्या चेहर्यावर आधी उत्साह होता, हळू-हळू काळजी आणि मग संताप आणि नंतर 'मरू दे' असे भाव यायला लागले. त्याने बंगलुरुच्या टीमला सांगीतले की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि निवांत झाला. बर्याच खटपटीनंतर बंगलुरुच्या एका मॅनेजरने काहीतरी युक्ती सांगीतली आणि आमचा मॅनेजरचे यशस्वी लॉगीन (लगीन नव्हे) झाले. आनंदलेल्या प्रकल्पप्रजेच्या चेहर्यावरचे हसू मावळले आणि लगेच आम्लपित्त झाल्यावर जसे भाव येतात तसे भाव घेऊन मंडळी लक्षपूर्वक ऐकू लागली.
अर्धा तास उलटला असेल आणि नेहमी होते तसेच कंटाळा नावाच्या आगंतुकाने हळूच प्रवेश केला आणि आपला अंमल दाखविण्यास सुरुवात केली. मग जांभयांचे दणक्यात आगमन झाले आणि सगळे दालन जणू झोपायची तयारी करत आहे असे वातावरण निर्माण झाले. गार-गार हवा, कंटाळवाणे सेशन, पडद्यावरचे नीट दिसावे म्हणून केलेला अंधार असे झोप येण्यास उत्कृष्ट वातावरण तयार झाल्याने एका-दोघांनी हळूच आपापल्या खुर्च्या कोपर्यात सरकवल्या. कुणी मोबाईल काढून निरोपानिरोपीत मग्न झाले तर कुणी शुन्यात नजर लावून बसले. एक-दोन लेकरे (फ्रेशर्स) वहीत सगळे टिपून घ्यायचा प्रयत्न करत होती. मॅनेजरसमोर असे केल्याने आपल्याला फायदा होईल अशी भाबडी समजूत असावी बिचार्यांची. दस्तुरखुद्द मॅनेजर एक हात हनुवटीखाली घेऊन लक्षपूर्वक ऐकत असल्याचा अभिनय करण्यात मग्न होता. नंतर त्याला त्या अभिनयाचाही कंटाळा आला मग त्याने सरळ आपला मोबाईल काढला आणि त्यात डोके खुपसले. काही सराईत आपापसात हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजत होते आणि मध्येच दबक्या आवाजात हसत होते.
"...इन द नेक्स्ट रीलिज, वुई आर प्लॅनिंग टू इनक्लुड अ लॉट ऑफ न्यू फिचर्स दॅट वुड इनॅबल द युजर्स टू युज धिस प्रॉडक्ट ऑन अॅन एनटायरली डिफरंट लेवल्...इट वुड बी ए फॅण्टास्टीक युजर एक्स्पीरियन्स...सो वुई वाँट टू लेवरेज आवर अंडरस्टँडींग ऑफ..." अशी लठ्ठ कॉर्पोरेट शब्दांचा ठासून भरणा असलेली वाक्ये तो वक्ता लीलया फेकत होता. आमचा मॅनेजर मधूनच 'अनम्युट' करून 'ओके' चे तुणतुणे वाजवत होता. बाकीची प्रजा केव्हाच नैष्ठिक निद्रेत गेली होती. शेवटी कुणाला काही प्रश्न आहेत का असे विचारल्यावर एकदम शांतता पसरली. आमच्या मॅनेजरने तत्परतेने "नो क्वेश्चनस फ्रॉम पुणे टीम" असे जाहीर करून सुटकेचा निश्वास टाकला. कुणालाच काही प्रश्न पडले नसणार हे त्याने अंतर्ज्ञानाने जाणले होते बहुधा. सगळ्यांनी 'सुटलो बुवा एकदाचे' असे मनातल्या मनात म्हणत चपळाईने बाहेरची वाट धरली.
एकदा मला आमच्या प्रोजेक्टबद्दलची एक छोटी परंतु महत्वाची माहिती हवी होती. मी संबंधित व्यक्तीला एक ईमेल पाठवून ती माहिती देण्याविषयी विनंती केली. बराच वेळ उत्तर न आल्याने मी त्या व्यक्तीला फोन केला.
तो: आय अॅम एक्स्ट्रीमली बिझी विथ द रीलीज वर्क, समीर. व्हाय डोंट यु फिक्स अ टाईम अँड सेंड अ मीटींग रिक्वेस्ट? अल्सो प्लीज कॉपी विनय (सीनियर मॅनेजर) ऑन द रिक्वेस्ट.
मी रिक्वेस्ट पाठवली आणि ठरलेल्या वेळेनुसार त्याला भेटायला गेलो.
तो: टेल मी, समीर.
मी: अॅज एक्स्प्लेन्ड इन माय ईमेल, आय नीड धिस पाथ फॉर द न्युली सपोर्टेड अप्प्लीकेशन सर्वर. आय नीड टू अपडेट द रीलीज नोट्स एकॉर्डिंगली.
तो: लेट्स गो टू अ रूम. आय विल आस्क सुनयना टू जॉईन.
आम्ही एका रूममध्ये जमतो.
तो: सुनयना, आय अंडरस्टँड धिस पाथ विल नीड टू बी चेंज्ड. कॅन यु टेल हीम द न्यू पाथ?
सुनयना: श्योर!
तो: ग्रेट! धिस सपोर्ट इज वेरी क्रुशल फॉर द न्यू क्लायंट. धिस विल हॅव अ मेजर इंपॅक्ट ऑन द सर्वर साईड काँन्फिगरेशन. अॅज यु नो, धिस विल अल्सो इंपॅक्ट द पाथ दॅट यु आर टॉकींग अबाऊट्...ब्ला...ब्ला...
मी: (मनात) हो रे बाबा, हे सगळं मला माहिती आहे; तुला तो पाथ माहित नाही ते सांग.
सुनयना: धिस इज द पाथ, समीर.
मी: थँक्स!
संध्याकाळी या हीरोने एक मोठा ईमेल विनयला पाठवला आणि त्यात मला कसा प्रॉब्लेम होता आणि त्याने तो किती आश्चर्यकारक रीतीने आणि गतीने सुनयनाच्या किरकोळ मदतीने सोडविला, त्यामुळे आपले काम किती सोपे झाले आहे वगैरे वर्णन छापून स्वतःची पाठ थोपटून घेतली. शेवटी काही प्रॉब्लेम आल्यास मला पुन्हा संपर्क करण्यात अजिबात हयगय करू नये असा धमकीवजा प्रेमळ आग्रह आणि विनंती वजा आज्ञा करून त्याने मला उपकृत करून ठेवले.
एकदा नेहमीच्या स्टेटस मीटींग मध्ये आमचा मॅनेजर (तनय) बसला होता. तो नेहमी बसलेलाच असतो. ऑनसाईट मॅनेजर (विनय) जो आमच्या मॅनेजरचा मॅनेजर आहे तो स्टेटस अपडेट घेत होता.
विनयः तनय, व्हाय धिस चेंज हॅज नॉट बीन पोर्टेड टू द न्यू रीलीज? व्हॉट शुड आय टेल द क्लायंट? धिस इज ग्रॉस नेग्लिजन्स ऑन युअर साईड.
तनयः नो विनय, आय मिन, विच चेंज आर यु टॉकिंग अबाउट?
विनयः द वन ऑन द टूल स्क्रीन. इट हॅज नॉट बीन चेंज्ड्...धिस शुड हॅव बीन कॅप्चर्ड इन द रीव्ह्यु.
तनयः नो विनय्...आय मिन येस विनय...आय विल लूक इन टू धिस इश्श्यू. व्हेन इज धिस स्क्रीन डिस्प्लेड? कॅन यु प्लीज टेल मी?
विनयः आय हॅड सेंट यु एन ईमेल अबाऊट धिस, तनय. यु डीड नॉट रीड इट ऑर व्हॉट?
तनयः येस विनय्...आय मिन्...व्हेन डीड यु सेंड धिस ईमेल, विनय?
विनयः लास्ट मॉर्निंग..चेक.
तनयः ओके, विनय. आय विल चेक.
थोडा वेळ अजून झापाझापी झाल्यावर आणि एक-दोन गोष्टींवर चर्चा झाल्यावर विनयने मोर्चा पुन्हा तनयकडे वळवला.
विनयः डीड यु गेट द ईमेल, तनय?
तनयः विच ईमेल, विनय?
विनयः ओह गॉड, अबाऊट द चेंज इन द स्क्रीन!!!!!!!
तनयः ओह दॅट वन! नो विनय, आय थॉट आय वुड चेक इट ऑफलाईन आफ्टर द कॉल...
विनयः नो, चेक इट नॉऊ.
तनयः श्योर, विनय.
थोडा वेळ झटापट केल्यावर तनय रडकुंडीला आला...
तनयः विनय, आय हॅड फॉरवर्डेड इट टू प्रणय्...आय विल कॉल हीम.
विनयः डीड यु चेक व्हॉट ही डीड अबाऊट इट?
तनयः अबाऊट व्हॉट, विनय? अबाऊट द चेंज?
विनयः लेट्स डिस्कस इट आफ्टर धिस कॉल, तनय. (बघतोच तुला, थांब!!!)
तनयः श्योर, विनय!
रीसीव्हर ठेऊन तनय आम्हाला म्हणाला:
तनयः क्या मुसीबत हैं यार...कौनसा ईमेल...कौनसा चेंज...भाड में जाने दो...चलो चाय पीने चलते हैं!!!!!
--समीर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ!!!
कंपणी-कंपण
हा हा हा!
धन्यवाद टारझन
तुमची कुठली?
पुण्यात
हेहेहे )
मस्त
meeting is an event where
मस्त
हाहाहा
व्वाव! -- इंट
मस्त.........
लेख फक्कड
अरेरे... तनय
हो!
हॅ हॅ हॅ!!
हाण्ण तिच्यायला!!!!
हाहाहा!!!
बरे झाले
मजा आली..
हाहाहा !!
घासकडवीसाहेब,
लै भारी रे!!
मस्त!!
झकास
हा हा हा
अशा रटाळ मीटिंगाना रसाळ बनवायचा एक मार्ग...
आउटकम ऑफ अ मीटिंग
बरोबर!
असं असतंय
मिनिट्स