स्त्रीची आजची प्रतिमा - २
आजच्या स्त्रीची प्रतिमा - या मालेची सुरूवात झाली तेव्हा कल्पना अशी होती की स्त्रीचं भोगवस्तू हे एकांगी चित्र आहे, व तेच बघत बसण्याऐवजी (आधुनिक व ऐतिहासिक) स्त्रीच्या रूपाचे व कर्तृत्वाचे विविध पैलू बघता यावेत. काय लिहावं असा प्रश्न होता. पण आपल्यापासून दूर असलेल्या जवळपास काल्पनिक वाटणाऱ्या कर्तबगार स्त्रियांऐवजी आपल्या रोज संपर्कात येणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, करीअरसाठी धडपडणाऱ्या मैत्रिणींविषयी लिहावंसं वाटलं. शेवटी आजच्या स्त्रीची प्रतिमा काय आहे हे आजच्याच परिस्थितीत बघायला नको का?
खाली एक काल्पनिक चर्चा दिली आहे. तसं पाहिलं तर काहीच काल्पनिक नसतं, असल्या विषयांवर आपण कधी ना कधी बोलतोच. बोलत असलो, नसलो तरी प्रतिसादांतून अधिक खोलवर चर्चा व्हावी ही इच्छा.
(स्थळ: एक कॅफे. पाच-सहा मित्रमैत्रिणी रविवारी दुपारी गप्पा मारायला जमलेले आहेत. बहुतेक सगळे तिशीच्या आतले)
पक्या - मन्या, मग चाललंय सध्या? कामबीम एकदम जोरात का?
मन्या - अरे काम चाललंय... पण एकंदरीत इकडे काही खरं नाही असं वाटतंय.
पक्या - कारे?
मन्या - काही नाही रे. आमचा बॉस हरामखोर आहे. तुला सिमीविषयी सांगितलं होतं ना..
पक्या - (हातांनी उभ्या लाटा काढून) तीच ना...
इंद्राणी - ए....
मन्या - हो तीच. तर आमचा बॉस जरा तिच्याशी लगट करून असतो.
पक्या - तू पण करायला जायचास ना...
मन्या - हो, पण माझे इरादे नेक होते. (सगळे हसतात) जोक्स अपार्ट, माझं लग्न झालेलं नाहीये. त्याला दोन पोरं आहेत.
देवी - वा वा वा, नेक इरादे म्हणे.
मन्या - नाही गं हे खूप लोकांचं बघितलंय म्हणून माझं फ्रस्ट्रेशन आहे. प्रोजेक्टमधल्या पोरींशी.. युनो... आता आमचा सीनियर मॅनेजर, परवा शीला सांगत होती, तिच्यावर लाईन टाकून बघत होता.
पक्या - मग त्यात काय एवढंसं? सगळीकडेच चालतं हे.
मन्या - नाय रे. पण आमच्या इकडे जरा जास्तच आहे असं वाटतं. आणि काही पोरी रिस्पॉंड करतात सुद्धा. आता आमच्यासारख्या लोकांनी असल्या गोष्टींशी कसं कॉंपीट करायचं? ग्रुपमधले इतर, इव्हन चांगल्या पोरीसुद्धा मग डिसकरेज होतात. हे असले बॉस डोक्यात जातात. पण बोलणार काय? आपली करिअर त्यांच्या हातात असते.
पक्या - दुर्लक्ष करायचं अरे.
मन्या - तुला बोलायला ठीक आहे. जाऊदेत, आत्ता फार डिटेलमध्ये शिरत नाही.
इंद्राणी - आम्ही आहोत म्हणून लाजू नकोस, सांग थोड्या चमचमीत गोष्टी
बंड्या - नाही गं, आमच्या इथे पण हे चालतं. मला एक बया माहीत आहे, आमच्या ग्रुपमधली नाही... पण... एनीवे. तिला कोडिंगमधलं ओ की ठो कळत नाही. पण सीनियर बॉसबरोबर 'सलोख्याचे' संबंध ठेवल्यामुळे ती वर्षाभरात इंटर्नपासून टीम लीडर झाली. आणि मग अर्थात बॉस कंपनी सोडून गेल्यानंतर हिलाही रिझाईन करण्याची पाळी आली. 'दुसरी' काही स्किल्स तर नव्हतीच...पण बॉस होता तोपर्यंत काही करता येत नव्हतं. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.
मन्या - मग आपल्यासारख्यांच काय होणार? सगळे भो*&^** वर चढून बसले आहेत.
बंड्या - अरे म्यानेजर कसले घेऊन बसला आहेस? मी भर पार्टीत आमच्या सीईओला घाणेरडे चाळे करताना बघितलाय. ती ही आहे ना.. जाऊदेत फार बोलत नाही.
देवी - आमच्या समोर नाही का? तुमच्या स्पेशल स्टॅग पार्टीसाठी राखीव वाटतं?
बंड्या - हा हा हा...
पक्या - वेल. आरोप करणारे कधीकधी उगाच आरोप करतात. बाकी मन्याच्या बाबतीत, असेलही. असो. पण बाकी सुंदर मुलीचं प्रमोशन तिच्या बुदधीमुळे झालं तर काय उपयोग?
देवी - म्हणजे?
पक्या - मला म्हणायचंय की मग तिच्या सौंदर्याचा काय उपयोग?
इंद्राणी - काय? हा काय प्रश्न झाला?
पक्या - नाही, ते विधान आहे.
देवी - ओ, भाऊ, काय बोलताय नक्की?
इंद्राणी - अगं जाऊदेत गं. कॉफी चढलीय त्याला बहुतेक...
पक्या - च्यायला, आता काही स्पष्ट बोलण्याचीच सोय राहिली नाही. मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटणार नाही..
देवी - नाहीच पटत...
पक्या - पण खरं आहे ते. असंच असतं. जग कसं चालतं हे तुम्हाला स्वीकारायचं नसेल तर तसं म्हणा.
इंद्राणी - काहीतरी बोलू नकोस पक्या. आता कोणी आपल्या टॅलेंटच्या जोरावर वरती चढली तर? तिलासुद्धा तू 'सुंदर म्हणून चढली' असंच लेबल लावणार का?
मन्या - नाही पण पक्या म्हणतो ते अगदीच चूक नाही. मीच स्वत: पोरींना अप्रेजलच्या दिवशी जरा जास्तच प्रदर्शन करणारे कपडे घालून आलेलं बघितलंय. नुसतं तेवढंच नाही, तर त्यांनी ते मान्यही केलंय.
देवी - वा वा तुम्ही सूतावरून स्वर्ग गाठताय...
इंद्राणी - हे पुरुष असलेच शेवटी... डोंट टेक इट पर्सनली, बरं का..
पक्या - पर्सनली कशाला घेऊ? मी जे बघतो ते सांगतो. मी काही असलं करत नाही. पण तू म्हणतेस त्यात कर्तबगार आणि सुंदर स्त्री गृहीत धरलेली आहे.
इंद्राणी - पण जेव्हा सौंदर्य आणि कर्तबगारी एकत्र येते तेव्हा काय? तुम्ही कर्तबगारी मोजणार ती एखादी स्त्री किती पुढे गेली यावरून, आणि ती पुढे गेली म्हणजे म्हणायचं, हॅं, सुंदर म्हणून पुढे गेली, नक्कीच तिच्या बॉसवर 'चांगलं' इंप्रेशन मारलं असणार...
पक्या - मी तसं कुठे म्हटलंय...
देवी - म्हणायला कशाला लागतंय? हे जग शेवटी पुरुषांचं आहे, हेच खरं नाही का? इंदू म्हणते ते बरोबरच आहे. स्त्री पुढे गेली की तिच्यावर घाणेरडे शिक्के बसतात. याला पुरुषी मनोवृत्ती नाही म्हणायचं तर काय? आणि असलं गलिच्छ गॉसिपिंग कोण करतं? ज्यांना ती हवीशी वाटते, पण आपल्याला ती भीक घालणार नाही ही खात्री असते तेच ना? मग उगाच सगळ्या सुंदर स्त्रियांबद्दल असं कसं म्हणवतं? त्यांच्या मनाची, बुद्धीची काहीच पर्वा नाही का?
मन्या - देवी, हे जरा जास्तच झालं हं. आम्ही काय बोलतोय, आणि तू कुठे गेलीस. ते नुसतं अहंकार सुखावणं किंवा सुंदर आणि बुद्धीमान पोरगी पटवणं एवढंच नसतं...
बंड्या - नाही पण माझासुद्धा पक्यासारखाच अनुभव आहे. पण तो म्हणतो ते जरा जास्तच जनरल वाटतं. अरे, सगळ्याच मुलींना तसं म्हणणं बरोबर नाही.
पक्या - वा वा वा... हे चोराच्या उलट्या बोंबा नाही का? पुढे गेलेली प्रत्येक सुंदर स्त्री त्या अर्थाने कर्तबगारच असणार, नाही का? बाकी देवीने जे पटवणं, नाही पटली तर गॉसिपिंग करणं वगैरे म्हटलं त्याबाबतीत मला काही अनुभव नाही. तेव्हा मी काही बोलत नाही. पुन्हा जनरलायझेशनविषयी आणखी काय बोलू? मला जसं दिसतं तसं मी सरळ बोलतो एवढंच. ते कोणाला का लागावं?
इंद्राणी - पण बुद्धीमत्तेवर पुढे गेली तर सौंदर्याचा काय उपयोग, हे खोचकच आहे.
देवी - तेच म्हणत्ये मी. ते उघड उघड पुरुषकेंद्रित मनोवृत्तीचं प्रतीक आहे. शेवटी हा खेळ असतो, आणि काही जणी त्या खेळतात हे मान्य आहे. पण म्हणून सगळ्याच तशा हे म्हणणं किती बरोबर? आता तुझ्या बहिणीविषयी असं कोणी म्हटलं तर तू ते मान्य करशील का?
मन्या - नाही गं. सर्वच सुंदर मुली तसल्याच असतात असं नव्हतं म्हणायचं. पण सगळ्यांनाच हा चॉईस असतो, कुणी सोपा मार्ग निवडतं तर कुणी सरळमार्ग. बर्याचदा समर्थन पण दिसून येतं या सगळ्याचं...
_______
असो... चर्चा विस्कळीत झाली थोडीशी, आणि वाद संपला नाही. पण मुद्दा स्पष्ट आहे. काही अधिकारी पुरुष आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आपल्या रिपोर्ट असलेल्या मुलींबरोबर लफडी करतात. काही स्त्रिया आपल्या सौंदर्याचा फायदा घेतात, व आपली 'तरक्की' करून घेतात. पण सरसकट तीच प्रतिमा होणं रास्त आहे का? काही स्त्रियांना सुंदर नसल्यामुळे आपापल्या कार्यक्षेत्रात नकार मिळत असेल का? आणि अनेक स्त्रिया फक्त बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर पुढे जात असतील त्यांची प्रतिमाही अशी गढूळलेलीच असते का?
या प्रश्नाची दुसरी बाजूही या चर्चेत आली नाही. ती म्हणजे, जर एखाद्या पुरुषाला आपल्या पुरुष बॉसचं मन जिंकायचं असेल तर त्याच्याबरोबर दारू पिणं, मॅच बघणं, पत्ते कुटणं अशा रास्त, समाजमान्य, ज्यांना लैंगिकतेचा वास येणार नाही अशा शतकांपासून चालत आलेल्या गोष्टी करण्याला भरपूर वाव आहे. स्त्रियांना तसे मार्ग नाहीत. व्यापक दृष्ट्या बघितलं तर हा काही या काळातलाच प्रश्न आहे असं वाटत नाही. आजूबाजूची परिस्थिती, तीत असलेली शक्तीस्थानं आज एक आहेत काल वेगळी होती. आज बॉसला लाडकं होणं महत्त्वाचं आहे, कदाचित गेल्या जमान्यात नवऱ्याला, सासूला खुष ठेवणं हे महत्त्वाचं असेल. खोटंच गोडगोड बोलणं, पुढे पुढे करणं, मस्का लावणं या गोष्टी कालातीत आहेत. तसाच पाताळयंत्रीपणा व संधीसाधूपणाही. व तो काही बायकांचाच मक्ता नाही. याचा अर्थ सर्वच तसे आतल्या गाठीचे असतात असं नाही. मॅनेजर पुरुष व रिपोर्ट स्त्री हे समीकरण आलं की त्याला लैंगिकतेची बाजू येते इतकंच.
स्त्रियांचा कार्यक्षेत्रात शिरकाव तसा अलिकडचाच आहे. त्यामुळे स्टॅटिस्टिकली बघितलं तरी बॉस पुरुष असण्याचीच शक्यता जास्त असते. ज्या स्त्रियांना छचोर मार्ग पत्करायचे नसतात, त्यांनाही केवळ मैत्रीचे संबंध ठेवले तरी बदनाम होण्याची भीती असते. पुरुषप्रधान व्यवस्था व तीतून निर्माण होणारा दृष्टीकोन काही अंशी या प्रतिमेमागे आहे. शेवटी प्रतिमा ही सौंदर्याप्रमाणे बघणाऱ्याच्या डोळ्यात अधिक असते. तेव्हा आजच्या स्त्रीची प्रतिमा कशी घडते? या प्रश्नाचा विचार करताना दिसणारं चित्र व त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन या दोन्हीला महत्त्व द्यावं असं वाटतं. स्त्रियांनी घराबाहेर पडून निव्वळ अर्थार्जनच नव्हे तर करियरही सुरू केल्यावर ही पुरूषप्रधान व्यवस्था आता सर्व घटकांना न्याय्य ठरू शकते का? का दुष्टचक्रासारखी ही प्रतिमा व पुरुषप्रधानता एकमेकांना पूरक ठरतात?
वाचने
17647
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
उत्तम
In reply to उत्तम by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत. (भोचक)
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to +२ by मराठमोळा
बॉसला
In reply to बॉसला by मेघना भुस्कुटे
+१
उत्तम
In reply to उत्तम by Nile
मला वाटतं
आता
In reply to आता by मेघना भुस्कुटे
अवघड
HardCore professionalism Helps !
एक कला
In reply to एक कला by ऋषिकेश
बॉसला खुष
In reply to एक कला by ऋषिकेश
हमममम्म्म
In reply to हमममम्म्म by मराठमोळा
कोणतंही मत
In reply to कोणतंही मत by मेघना भुस्कुटे
>>कोणतंही
In reply to >>कोणतंही by मराठमोळा
उत्तम
In reply to हमममम्म्म by मराठमोळा
चूक पटली
In reply to चूक पटली by ऋषिकेश
>>भारतीय
In reply to >>भारतीय by मराठमोळा
होय
In reply to होय by ऋषिकेश
ठाम
In reply to चूक पटली by ऋषिकेश
भारतीय कायद्याच्या मर्यादेत ...
In reply to भारतीय कायद्याच्या मर्यादेत ... by वाहीदा
:|
In reply to एक कला by ऋषिकेश
हम्म!
In reply to एक कला by ऋषिकेश
बॉसला खुष
In reply to बॉसला खुष by भोचक
एक उदा.
In reply to एक उदा. by ऋषिकेश
खुप फरक
In reply to खुप फरक by Nile
थोडक्यात काय...
In reply to थोडक्यात काय... by प्रमोद देव
=))
In reply to थोडक्यात काय... by प्रमोद देव
देव साहेब, काय चाल्लंय !
In reply to देव साहेब, काय चाल्लंय ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या
In reply to खुप फरक by Nile
तसं नाही...
In reply to तसं नाही... by राजेश घासकडवी
चर्चेच्या
चांगली
छान चर्चा ...
बाई आणि बाटली...
In reply to बाई आणि बाटली... by प्रमोद देव
थोडक्यात
In reply to थोडक्यात by Dhananjay Borgaonkar
+११
एक किस्सा
In reply to एक किस्सा by प्रियाली
प्रियाली, क
In reply to एक किस्सा by प्रियाली
भारी !
In reply to एक किस्सा by प्रियाली
लै भारी किस्सा...!
तुमचा जो
दोन गोष्टी
In reply to दोन गोष्टी by नितिन थत्ते
नव्हे नव्हे
In reply to नव्हे नव्हे by प्रियाली
आपण जर
त्या
अरे वा !
Injustice is natural !
मी स्वत: एक
In reply to मी स्वत: एक by बद्दु
खर आहे
चर्चा चांगली आहे