फुन्सुक फडके
कालच्या म.टा. मधे "फडकेंचा फुन्सुक" हा एक छोटासा लेख आला आहे. लेख दिनेश कानजी पण (त्यांच्या शेवटच्या वाक्यावरून) अरूणाचल प्रदेशातीलच दिसत आहेत. त्यातील काही वाक्ये (लेख कृपया तेथेच वाचा)
फुन्सुक हे नाव असू शकतं हे ' थ्री इडियट्स'मुळे कळलं. पण पडद्यावर न दिसलेला एक मातृभक्त फुन्सुकही आहे. मुंबईतल्या मराठी घरात तो मोठा झाला. सध्या अरुणाचलात असूनही महाराष्ट्रातल्या आईचं ऋण तो अद्याप विसरलेला नाही. ... इथली काही मुलं तुम्ही मुंबईत घेऊन जा. त्यांना तिथे शिकवा, शहाणंसुरतं करा, असा सल्ला लाला यांनी दिला. मुंबईतून आलेल्या आचार्य आणि परांजपेंना ही कल्पना मनापासून आवडली. त्यांनी अरुणाचलातली १७ मुलं निवडली...फुन्सुकच्या आई-वडिलांची समजूत काढून ते त्याला मुंबईत घेऊन आले. त्यावेळी त्याचं वय होतं अवघं पाच वर्षं. १९६७ ते १९८५ या काळात हा मुलगा सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या घरी लहानाचा मोठा झाला आणि अरुणाचलात परतला. सध्या तो तावांगमध्ये जॉइण्ट डायरेक्टर को-ऑपरेटिव्ह या सरकारी पदावर काम करतो... ...नुकतेच श्रीधर फडके अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. याच काळात त्यांची आई आजारी पडली. दौरा रद्द करणं अशक्य होतं. फुन्सुकला हे कळलं आणि पंधरा दिवस सुट्टी टाकून त्याने थेट मुंबई गाठली. या काळात त्याने आईची सेवा केली. तिला बरं वाटल्यावरच तो परत गेला.आपण बर्याचदा सध्याच्या भ्रष्टाचाराबद्दल, आधीच्या (नेतृत्वाच्या) चुकांबद्दल, सामान्य माणसाच्या (सामाजीक) निष्क्रीयतेबद्दल बोलत असतो, लिहीत असतो, तावातावाने चर्चा देखील करत असतो. पण ज्यांना काहीतरी करायचे असतात ते विविधांगाने कामे करत असतात. त्याची फळे कधी मिळतील कशी मिळतील आणि कुणाला, याचा विचार न करता...
प्रतिक्रिया
वा
+१
आणि विशेष म्हणजे
व्वा! क्या
दीपक
अरे वा!
स्मरण कै. भैय्याजी काणे यांचे....
छान माहिती!