गंधमय अस्तित्त्वाचा शोध.......
होती एक जमीन.... खडकाळ, भेगाळलेली, ओसाड आणि नापीक.....
अतिशय निरपेक्ष ..... जणू स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव नसलेली.... काळाच्या ओघात गोठलेल्या भावनांची आणि त्यामुळे या भावनाविश्वाशी दूर दूर जाऊ पहाणारी.......
तिच्या मनात एकच सलं होता..... आपण नापीक... निरूपयोगी.... आणि म्हणूनच की काय सारं जगं आपल्याला वाळीत टाकल्यासारखं दुर्लक्ष करतं....
तिला सतत एकच भीती असायची... ती सतत बदलणार्या ॠतूंची.... कधी रखरखणार्या ऊन्हाची......तर कधी झोंबणार्या वार्याची .... कधी हुलकावणी देणार्या अन न बरसणार्या ढगांची......
असचं आयुष्य होतं तिचं .. एकाकी... निरस.. रू़क्ष...
पण काळाचा महिमा खरचं अजब असतो.... याचं प्रत्यंतर तिला तेव्हा आलं जेव्हा एके दिवशी अचानक भर दुपारी वैशाखात हळूच काही ढगांची चाहूल लागली..... ती पुन्हा घाबरली कारण अशा न बरसणार्या ढगांची थट्टा आता तिला सहन करणं तिला शक्य नव्ह्तं..... पण तिच्या हातात काहीच नव्ह्त हे ही तितकच सत्य........
वातावरण अचानकच बदललं ..... भर दुपारी संध्याकाळ झाली.... एका गच्च भरलेल्या ढगानं रखरखणार्या ऊन्हाला जणू निष्प्रभ केलं.... काही खासचं होतं त्या ढगात्......खरतरं खूप ह्ट्टी आणि स्वच्छंदी होता तो घनं........वार्यालाही न जुमानणारा....बरसणार नाही अशाच हेतूनं आलेला..... पण एका क्षणात काय झालं कोणास ठाऊक.....
बहूतेक त्या रूक्ष , ओसाड जमिनीकडे पाहून त्या मदमस्त ढगाला माया की कीव आली असावी अन काही समजण्याच्या आतच तो बरसू लागला.....रणरणत्या ऊन्हानं तापलेल्या जमिनीवर काही शिंतोडे पडताच वातावरण चदरवळ्लं.....रू़क्ष ,भेगाळ्लेल्या जमिनीतल्या खाचा काही क्षणातचं त्या ढगाच्या स्नेहानं भरल्या अन मृदगंधानं आसमंत दरवळू लागला...
यात सगळ्यात जास्त सुखावली ती धरा कारण आपल्यातल्या दडलेल्या मृदगंधाची जाणीव तिलाही पहिल्यांदाच होत होती....अन बरसणार्या ढगाला सगळ्चं अनाकलनीय वाटत होतं.... कारण त्याचा विचार काही निराळाचं होता......
हे सगळं चैतन्याचं नाटक काही क्षण असच चालू राहिलं पण इतक्यात सूर्यनारायण पुन्हा तापले....
ह्या सगळ्या नाटयात धरा फक्त सुखावतचं गेली कारण काही क्षणापुरतं का होईना पण स्वतःच्या गंधमय अस्तित्त्वाची जाणीव तिला झाली....
अजूनही हीच धरा रोज तापते.... रणरणते.... पुन्हा त्याच बरसणार्या मेघाची वाट पहात...... बरसण्याची आस धरून......
वर्गीकरण
_/\_
In reply to _/\_ by धमाल मुलगा
+१
In reply to _/\_ by धमाल मुलगा
जॉक -------------------
सांजसखे,
व्वा!! एका
.............................
<< रू़क्ष
मृद्गंध!!
खूप छान
In reply to खूप छान by रेवती
जॉक -------------------
लक्षवेधी
वा..
सुंदर
सुंदर
क्या बात् है
काय नाय
In reply to काय नाय by प्रभो
(विषय दिलेला नाही)