पोलिस ठेषणाची पायरी
आज आंद्याची खरड आली , विषय होता भारतातला भ्रष्टाचार ,ह्या देशाचं काय होणार किंवा तत्सम काही .
त्यावर माझं मत की इकडे काही ** फरक पडणार नाही , आपापला स्वार्थ बघा .. हिरव्या देशात चला ,
योगायोगाने अजुऩ कोणी हेच विचार वेगळ्या शब्दांत कोणी मांडले .. आणि यात्रींच्या मते मला नविन मित्र सापडले :)
यात्रींना एक किस्सा सांगता सांगता तो एक काथ्याकुटाच्या लांबीचा झाला म्हणुन प्रसिद्ध करतोय :)
हाहाहा ... खरंय की लेका ... त्याची कळकळ समजण्यासारखी नाही का ?
साला एकदा आमची जुणी बाईक चोरीला गेली ...जसं कळलं तसं सक्काळी ७ ला रिपोर्ट लिहायला पोलिस स्टेशन मधे गेलो तर ,
५-६ हवालदारांचा ताफा ,टेबलावर पाय , कोणी विड्या फुंकतोय , कोणाच्या शर्टची बटणे लागलेली नाहीत , मारक्या रेड्याची 'पेटंट' गुर्मी ... ही तर बाय डिफॉल्ट ! कंप्लेंट नोंदणीसाठी विचारपुस केली असता ,
"बाईक कधी चोरी झाली ? " ,
"रात्री... नक्की तास-मिनीटं सांगु शकत नाही " ,
"ओके .. आठ ला आमची शिफ्ट संपते .. शिंदे येतील त्यांच्याकडे तक्रार नोंदवा "
शिंदे सुमारे ९ वाजता उगवले ... तोवर हे भोसडीचे गप्पा हाणत बसले .. ... वाट पाहुन पाहुन राग परमोच्च बिंदु ला पोचला होता. शिंदे रमतगमत आले..
५'७" उंची , ढेरी भली मोठी , ही देखील डिफॉल्ट , वर्दीतली फक्त पँट घातलेली , शर्ट साधाच , त्याच्याही दोन गुंड्या उघड्या ! आल्या आल्या त्यांना कोणीतरी तिरकस बोलला , त्यावरुन ह्यांची स्टेशणात काय किंमत आहे ह्याचा लगेच अंदाज आला ... शिंद्यांकडे
"कंप्लेंट नोंदवायचीये .. बाईक गेल्याची "
"का ? तुमच्या गाड्या तुम्हाला संभाळता येत नाहीत का ? च्यायला रोज आलं की हिच कटकट "
"तुमचं काम काय आहे ? चोरांचा बंदोबस्त करता येत नाही का ? आणि जॉबची कटकट वाटते तर जॉब बदला ना !!१ " (पेशन्स संपल्यामुळे आता चिडलोच होतो)
"कधी झाली चोरी ?"
"रात्री"
"मग माझ्याकडे का रिपोर्ट नोंदवताय ? मी सकाळच्या शिफ्ट मधे आहे ... रात्री जे होते त्यांच्याकडे जा "
"आम्हाला काय टेनिस चा चेंडु समजताय का ? त्यांनी तुमच्याकडे आणि तुम्ही त्यांच्याकडे पाठवताय ! पगार कसला घेता ? "
तोवर त्याचा आवाज वाढला ... अगदी सातव्या तालात ... "आवाज खाली करून बोला .. "
"हॅहॅहॅ .. दहा लोकं घ्या कोणतीही ... आणि विचारा कोणाचा आवज जास्त आहे .. अर्थात तुम्ही कितीही "केकटलात" ह्याची आम्हाला काही हरकत नाही, तक्रार नोंदवा म्हणजे झालं ... "
बरीच वादावादी फक्त तक्रार नोंदवण्यावरून झाल्यावर मी इन्स्पेक्टरशी बोलून तक्रार नोंदवून घेतली.
१ महिन्याने आम्हालाच बाईक सापडली. ती आता कोर्टातुन सोडवुन घेताना जिथे रिपोर्ट केलं तिथे पुन्हा ठेवणं गरजेचं असतं , मग कोर्ट कचेरी करून गाडी सोडवायची असते.
शिंदे , " हा वकिलाचा पत्ता घ्या , यांना भेटा , कागदं जमा करा आणि मग बाईक घेऊन जा "
"ह्म्म्म .. प्रमिला शिंदे .. कोण ह्या ? आपल्याच कोणीतरी दिसतात , माझ्या ओळखीचा वकिल आहे .. त्याच्या कडुन करून घेतो "
शिंद्यांचा चेहरा लाल झाला . त्यानंतर मला बाईक ताब्यात भेटायला ३ महिने लागले. बाईकचा डिस्क ब्रेक चोरीला गेला होता, मिटर पळवलं होतं , आणि बरंच सामान गायब होतं ... ही चोरी चक्क पोलिस स्टेशन मधे झाली होती .
जाता जाता शिंद्यांना टोमणा मारला ,
"रोड वरचं भिकारी बरं राव .. हाड म्हंटलं तर पुन्हा भिक मागायला येत नाही ... त्याचे तर खायचे वांधे असतात ... काही लोक तर इतके भिकारी की भिकार्यांचा अपमाण व्हावा "
शिंदेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती ... माझी त्याच्या मुस्काटात द्यायची इच्छा झाली होती .. पण वर्दीकडे पाहुन गप्प बसलो .
एखादी सुपर पॉवर नको , पण पोलीस माज करत असतील तर त्यांना योग्य ती शिक्षा द्यायची जर कायदेशिर परवानगी मिळाती तर बराच मनस्ताप कमी होईल !
(पोलिसांतही अपवाद असु शकतील , सगळीकडेच असतात , राजकारण सोडुन :) )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
टारझन-जी, म
आपण २०
आपण २०
तरी लय
आपण
ह्याला
डेरिंगबद्दल अभिनंदन टार्या पण
हॅ हॅ हॅ ...
लय डेरिंग
>>>>>>>काही
"अपवाद"
बंधुराज टारश्री झन भाउ
माझी पण
किस्सा..
१२वीत
माझापण एक किस्सा!
हा किस्सा वाचून तर
एव्हढ्याश
पाचेक
गुन्हा
+ १ हा हा हा!
हम्म
टारझनभाऊ,
झकास!
झक्कास...
एखादी सुपर