आपण सुट्ट्या मिळाल्या की बॅगा भरून गावाला पळतो; नाहीतर केसरी टुर्स किंवा सचिन ट्रॅव्हल्सबरोबर कुठेतरी फिरून येतो. त्यामुळे आपलं बरचसं भारत दर्शन झालेलं असतं.
आपण सर्व कुठेतरी जाऊन आला आहात. त्यामुळे आपले अनुभव मिपाच्या सदस्यांबरोबर 'शेअर' करून बघा. मग बघाच, संपूर्ण भारत-दर्शन मिपावर घडेल की नाही ते.
माझे अनुभव
तसा मी ब-याच ठिकाणी जाऊन आलो आहे. पण मसूरी बद्दलच्या काही ताज्या आठवणी आहेत, त्या शेअर करतोय,
मसूरीला केसरीच्या संगतीत गेलो होतो. तशी आमच्याबरोबर आलेली जवळ जवळ सर्व प्रवासीमंडळी जरा जास्त 'प्रौढ' होती. तरी तिथल्या थंडगार वातावरणात मन रमून गेलं.
घाटांवरून केसरीची बस निघाली, की मला मळमळतं. पण मग मसूरीतल्या वातावरणातील निसर्गसौंदर्य बघण्यात हरपून गेलो, ज्यामुळे मला बसमध्ये मळमळणं बंद झालं.
आम्ही ज्या हॉटेलात थांबलो होतो तिथे सतत लोडशेडिंग होत होतं. हीटर मोडला होता. झोपण्यासाठी रजया चांगल्या जाड्या होत्या म्हणून हायसं वाटलं. पण त्यासुध्दा गारढोण पडल्या होत्या.
आम्ही केम्प्टी धबधब्यावर गेलो होतो. तिथे फोटो काढले, चहा प्यायलो, पाण्यात पाय बुडविले, व खूप मजा केली.
केम्प्टी फॉल्सचे एक वैशिट्य असे सांगितले गेले, की ह्या धबधब्याच्या उगमस्थानाचा अजूनपर्यंत काही पत्ता नाही. त्या धबधब्यावरचे पाणी कुठुन येते हेच कळत नाही.
आमचा कॉरबेट पार्कमधील हॉटेलमध्ये (ती जागा जेथे कालह्या हिंदी चित्रपटाचे शूटिंग केले गेले)वन नाईट स्टे होता. सकाळी लवकर उठून तिथल्या वाहत्या नदीवर पाणी प्यायला आलेल्या लांडोरांना बघितलं, वाघांना बघितलं, आणि तिथेच कायमचं वास्तव्य असावं अशी कल्पना मनात आली.
आम्ही योग्य वेळेत मुंबईत परतलो. कारण त्यानंतर थोड्याच कालावधीत उत्तर भारतात थंडीची जबरदस्त लाट आली आणि आम्ही गोठवणा-या थंडीपासून बचावलो.
वाचने
9579
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा!
मी ऐन पावसाळ्यात शिवथरघळ केली आहे!
In reply to वा वा! by ऋषिकेश
शिवथर घळ
In reply to मी ऐन पावसाळ्यात शिवथरघळ केली आहे! by चतुरंग
जरूर करा......
In reply to वा वा! by ऋषिकेश
दक्षीण भारत
In reply to जरूर करा...... by सुधीर कांदळकर
विजयनगरला
In reply to दक्षीण भारत by sahil ashok
मी..
मार्लेश्वर
In reply to मी.. by प्राजु
डिसेंबर
In reply to मी.. by प्राजु
हो.. पण जपून
देवाचिये दारी.......
एक सुचना
भारतात..
जबरदस्त
पायाला
गेपरनाथ, कोटा, राजस्थान
प्रतिसाद - १ : कर्नाटक
हा प्रतिसाद नाही
In reply to प्रतिसाद - १ : कर्नाटक by छोटा डॉन
अगदी!
In reply to हा प्रतिसाद नाही by संदीप चित्रे