Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आनंदयात्री on Sat, 04/24/2010 - 23:04
प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ? तासनतास चालणारी भेट पण काही क्षणातच भुर्र झालीये असे वाटावे. कसली ती ओढ, काय तो वेडेपणा !! तासांमागुन तास, सकाळ नंतर दुपार अन शेवटी संध्याकाळ येतेच. सातच्या आत घरातला नियम वाकवुन नउच्या आत घरात झालेला. मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'. अनेक न सुटणार्‍या प्रश्नांवरचा उहापोह, खरेदीची प्लॅनिंग, आईबापांबरोबरची व्युहरचना आणी भारंभार स्वप्नांच्या ओझ्याखाली दबलेला दिवस कातरवेळेबरोबर दिनवाणा होत जातो. दुचाकीही जराशी संथ आणी मिठीही तशीच .. सैलसर. तिला शेवटी उतरायचे असतेच, दिशा-रस्ता आणी सोबत ठरवुन थोडेच होते. रस्ता वळतो दिशा बदलते आणि सोबत संपते. शाश्वत आणि चिरंतन एकटेपणाला कवेत घेउन खुराड्यात शिरायचे. ---------------------------------------------------------------------------------------- सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ? ---------------------------------------------------------------------------------------- उद्या उठुन लचके तोडणार्‍या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ? ---------------------------------------------------------------------------------------- तिच्या डोळ्यातली स्वप्नं, तिचा आनंद आणि तिच्या बेमालुम झाकलेल्या जखमा. वेड्या कविता, रेहमानची गाणी आणि निलाजरे घड्याळ. भरुन आलेले आभाळ, हलकासा मृदगंध आणि कर्कश्य डोअरबेल. वळणारा रस्ता, बदललेली दिशा आणि संपलेली सोबत. ---------------------------------------------------------------------------------------- (लेखन इतरत्र पुर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
  • 8303 views
  • काहीबाही.. (२)
  • काहीबाही.. (३)

Book traversal links for काहीबाही..

  • काहीबाही.. (२) ›

प्रतिक्रिया

Submitted by विसोबा खेचर on Sat, 04/24/2010 - 23:34

Permalink

उद्या उठुन

उद्या उठुन लचके तोडणार्‍या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे.
हा हा हा! हे बाकी क्लासच! :)
भरुन आलेले आभाळ, हलकासा मृदगंध आणि कर्कश्य डोअरबेल. वळणारा रस्ता, बदललेली दिशा आणि संपलेली सोबत.
बाकी काय बोलू आंद्या.. तुझी असली ही छोटेखानी मुक्तकं मला नेहमीच फार आवडत आलेली आहेत.. वाचतावाचताच मनात घर करून राहतात.. जियो...! तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 04/25/2010 - 00:03

Permalink

तासनतास

तासनतास चालणारी भेट पण काही क्षणातच भुर्र झालीये असे वाटावे. कसली ती ओढ, काय तो वेडेपणा !! तासांमागुन तास, सकाळ नंतर दुपार अन शेवटी संध्याकाळ येतेच. सातच्या आत घरातला नियम वाकवुन नउच्या आत घरात झालेला. मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'.
आंद्या भावा ... तिन वर्ष मागं घेऊन गेलास रे :( :) क्लासिग सेंटिमेंटल !! -(अंमळ हळवा) हवाईयात्री
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sun, 04/25/2010 - 13:07

Permalink

अभी ना जाओ...

हम दोनोच्या गाण्याची आठवण झाली. नंतर आणखी गाणी आठवतच गेली. शेवटचं आठवलं ते चल बैठे चर्च के पिछे. त्याच्या पुढच्या वर्षात बैल बडवला गेला आणि ....
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sun, 04/25/2010 - 13:29

Permalink

छान छान

छान छान छान. काहीबाही छान लिहीलं आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Sun, 04/25/2010 - 14:46

Permalink

छान.

लिखाण आवडले !
  • Log in or register to post comments
Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on Sun, 04/25/2010 - 14:51

Permalink

मस्त...

प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ? :X 8> "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Sun, 04/25/2010 - 14:54

Permalink

मस्तं

आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sun, 04/25/2010 - 16:31

Permalink

मस्तच!!

मस्तच!!
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sun, 04/25/2010 - 17:27

Permalink

खुपच भावुक करता तुम्ही.

शब्द अन शब्द खरा आहे. =(( वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by अनिवासि on Sun, 04/25/2010 - 17:42

Permalink

Really enjoyed this little

Really enjoyed this little piece and some of the comments. I am new to this site. Am still learning to type in Marathi and having trouble with some letters. Once I master the craft- will write in Marathi. In the meantime-- this piece took me bal some 50-55 years! thanks for the memories! anivasi
  • Log in or register to post comments

Submitted by सुबक ठेंगणी on Sun, 04/25/2010 - 18:02

Permalink

कितीक हळवे कितीक सुंदर!

सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?
नाही. माझ्यामते एका सुखातून पुढचं निर्माण करत जायचं. बस! छान 'आनंदयात्री' सिग्नेचर मनोगत! आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Sun, 04/25/2010 - 18:10

Permalink

सुख संपते

सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ? :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sun, 04/25/2010 - 18:43

In reply to सुख संपते by मस्त कलंदर

Permalink

चुचु

#o चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Sun, 04/25/2010 - 21:39

Permalink

झकास रे

झकास रे आंद्या!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Sun, 04/25/2010 - 22:59

Permalink

हट साला....

हा आनंदयात्री मोठा अजब माणुस आहे. खरडवहीमध्ये, खरडफळ्यावर मोठा दंगामस्ती-विनोद करुन हसवतो आणि ज्या गोष्टीला लेखही म्हणता येणार नाही अशी लांबी असलेल्या पाच-पंधरा ओळी लिहुन टचकन डोळ्यातुन पाणी काढतो. :( लेख म्हणावा तर एव्हढास्सा....पण हातभर लांब लिहिलेल्यापेक्षा बेक्कार भिडतो. साला, ह्या माणसाला 'दर्द' ह्या भावनेची नस अचूक सापडते. आमच्यासारखा दगडालाही आतुन हलवण्याची ताकद असणारी ही लेखणी थांबवु नका पंत..... लिहिते रहा! तुमची ही स्फुटं वाचुन आमच्यासारख्या पाषाणहृदयींना 'आपणही माणुसच आहोत की' ही जाणिव होते हेच तुमच्या लेखनाचं यश! जियो आंद्या...जियो!
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Sun, 04/25/2010 - 23:36

In reply to हट साला.... by धमाल मुलगा

Permalink

खरडवहीमध्

खरडवहीमध्ये, खरडफळ्यावर मोठा दंगामस्ती-विनोद करुन हसवतो आणि ज्या गोष्टीला लेखही म्हणता येणार नाही अशी लांबी असलेल्या पाच-पंधरा ओळी लिहुन टचकन डोळ्यातुन पाणी काढतो. खरं आहे भाऊ. कधी कधी तर याला काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Mon, 04/26/2010 - 11:26

In reply to हट साला.... by धमाल मुलगा

Permalink

हा

हा आनंदयात्री मोठा अजब माणुस आहे. हे असे हळवे करणारे लिखाण आंद्यानेच करावे... डोळ्यातुन पाणी काढतो... बाकी ते सुख वापरणे वाक्य क्लासच निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 04/26/2010 - 00:09

Permalink

>>प्रेयसी

>>प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ? >> सुधारणा - प्रेम ही चीज हे रसायनच मोठं अद्भुत आहे ... कमाल आहे. लेख मस्तच ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Mon, 04/26/2010 - 08:01

Permalink

मस्त आहे,

मस्त आहे, आवडला लेख!
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Mon, 04/26/2010 - 08:19

Permalink

नशेबाज लेखन

कधीकधी अफूच्या गोळीने येणारी हवीहवीशी नशा वाटावेसे लेखन. आवडले. (व्यसनी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Mon, 04/26/2010 - 15:35

Permalink

आंद्या,

आंद्या, लेका तु लिहितोस कमी आणी विचार जास्त करायला लावतोस, तुझा लेख म्हंटल कि वाचला तरी त्रास आणी न वाचला तरी :-D. --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 04/26/2010 - 15:42

In reply to आंद्या, by टुकुल

Permalink

+१

खरंय. च्यायला, हा माणूस लिहायला बसताना नक्की काय खाऊन बसतो ते पहायला हवं एकदा :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 04/26/2010 - 15:50

In reply to +१ by धमाल मुलगा

Permalink

+२

मी वाचलाच नाही. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by रानी १३ on Mon, 04/26/2010 - 16:09

Permalink

सही!!!!!!!

मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'. शब्द अन शब्द भिड्तो मनाला!!!!! मस्त लेख!
  • Log in or register to post comments

Submitted by अश्वत्थामा on Mon, 04/26/2010 - 16:11

Permalink

उद्या उठुन

उद्या उठुन लचके तोडणार्‍या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ?. वाह! -अश्वत्थामा
  • Log in or register to post comments

Submitted by जोश्या on Tue, 04/27/2010 - 19:06

Permalink

खलास

अप्रतिम मला ७ वर्शापुर्विचे अम्चे दिवस अथ्वले पन सुदैवने आम्च्या दिशा ,रस्ता अनि सन्गत बदललि नहि
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com