सावित्रिच्या लेकी ....
आज पासून पोळ्या तु कर संध्याकाळच्या आईसाहेबांच फर्मान सुटल आणि अचानक का का का ????? काहूर उठल, अर्थात पोळ्या कारण ही फार मोठी बाब नवतीच मुळी ... पण ज्या कारण साठी मला हे काम गळ्यात घ्यायला सांगण्यात येत होत ते कारण जवळपास संतापजनक होत... हो कदाचित चाणाक्ष मिपा वाल्यांनी कारण ओळखल असेलच "जावई शोध " सुरु झाला होता...
अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नवती तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का? तर मला लग्न करायचं होत...
मला एक प्रश्न पडतो ज्या आया शिक्षणाच्या बाबतीत आमच्या नोकर्यांच्या बाबतीत पुरोगामी असतात त्या लग्न ही गोष्ट निघताच १८५७ काळात का जातात? तु कुठेही कमी नाहीस असा लहानपणापासून मनावर ठसवनार्या आया या बाबतीत तु एहते कमी आहेस आणि तु सुधारायच असा कस म्हणतात?
वयाच्या २३ व्या वर्षी तडजोडीची दीक्षा देण्यात येते ती कशी साध्य होणार? उपवर मुलीनी करण्या सारख्या बर्याच गोष्टी तिचे पालक तिला कानी कपाळी ओरडून सांगत असतात ..हा त्यांचा दोष आहे की आधुनिकता आणि पारंपारिक पणा या दोन्ही दरडींवर पाय ठेवणाऱ्या आपल्या समाजाचा आहे ? उपवर मुलांना तुला लग्नानंतर या गोष्टी करायच्या आहेत हे किती मुलांचे पालक सांगतात? उलट मुलांच्या आई अगदी नाक वर करून म्हणतात आता बायको आली की घे तिच्या कडूनच सगळी काम करून... तेव्हा किती पालक विचार करतात की येणारी मुलगी ही आपल्या मुलाच्याच वयाची आहे आणि त्याच्या इतकीच शिकलेली आणि त्याच्या सारखीच कामाणारी आहे ... तिच्या कडून काम करून घे ,सांगण्या पेक्षा आता तुला तिलाही सहकार्य कराव लागेल हे का नाही शिकवत?
कोणती आई मुळाल किमान चहा करायला शिकवते? बर्याच ठिकाणी चित्र काहीश्या प्रमाणात बदलाल असाल तरी अजूनही अगदी आधुनिक आणि सुशिक्षित कुटुंबातून मुलीना तु मुलगी आहेस म्हणून हे करायचाच आहे हे ऐकवलं जात ... कितीही समानतेच्या गप्पा मारल्या तरी आयुष्याच्या या वळणावर मुलगी हे मुलगीच असते ...आता म्हणल मुलगी आहे तर मुलगीच म्हणणार ठीक आहे हे ,... पण इथे म्हणा एवढ आहे की ज्या तडजोडी मुलीला करावयाच लागतील हे सांगितले जाते तेव्हा मुलानाही आम्ही ज्या तडजोडी करतो त्याची जाणीव असायला हवी ....
कधिनवत स्वयम्पाक करनार्या मुलान्च जे कौतुक होत आजहि ..तसच अम्च्य नोकरिचहि होउ दे हि माफक अपेक्शा नहिये का?
सावित्रीच्या लेकी म्हणून आज अभिमानानी मिरवतो पण या महत्वाच्या निर्णयाच्या वेळी मात्र तड्जोडिला सिद्ध होतोच न???
स्त्री पुरुश स्पर्धक नहि पुरक आहेत हा आपल्याच पुराणात सान्गितलेला विचार अमलात कधि येणार?
वर्गीकरण
मानवी
तुम्हाला आवडेल अशी एक चर्चा
आपली तक्रार योग्य आहे!
In reply to आपली तक्रार योग्य आहे! by चतुरंग
+१
In reply to +१ by टारझन
१००% सहमत
In reply to १००% सहमत by प्रभो
>>
In reply to आपली तक्रार योग्य आहे! by चतुरंग
भागीदारीशी १००% सहमत
In reply to भागीदारीशी १००% सहमत by बेसनलाडू
+२ (लहानपणी
In reply to आपली तक्रार योग्य आहे! by चतुरंग
सहमत
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमचं
हो ना...
रंगोबांशी आणि टारोबांशी सहमत
स्कील सेट !!
>>अभियांत्र
बर्याच
प्रिय मिपा
In reply to प्रिय मिपा by झुम्बर
माझ्या