सा S S प!!!
होळी विशेषांक -हास्यगाऽऽरवा यात मी लिहिलेल्या अजगर या लेखात `जर-तर` ची गोष्ट होती. कल्पनाविलास करून हसवण्याचा प्रयत्न केला होता.
पण आताचे लेखन हे प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे. ---
इथे अमेरिकेत स्प्रिंग सिझन सुरू झाल्यावर निसर्गातील चैतन्य जणू आमच्यातही उफाळून आले. आमची बागही हरवीगार करण्याची इच्छा झाली.
मागच्याच आठवड्यात नर्सरीत जाऊन छान फुलांची २ मोठी झाडे आणली. टोमॅटो, बारीक मिरची आणि काकडीची इवली इवली रोपे आणली. त्यासाठी ज्यात रोगप्रतिकारक औषधे, फर्टीलाझर्स आहेत अशी महागाईची माती आणली. बागकामासाठी लागणारी आयुध आणि अवजारे आणली आणि गेल्या विक एंड्ला सकाळापासून मी आणि माझे यजमान बागकामाला लागलो.
दुपारपर्यंत खड्डे खणून मोठी झाडे, छोटी रोपटी लावून झाली. दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा कामाला लागलो.
आमच्या फ्रंट यार्ड मधले लॉन वाढतच नव्ह्ते कारण मधेच एक मोठे मेपलचे झाड आहे. थंडीच्या दिवसात काटकुळ्या काड्या झालेल्या या झाडाला आता बहर आला आहे, फुलं- पानांनी झाड डवरले आहे. पण त्याची सावली लॉनवर पडून ते गवत मात्र मृतवत दिसत होते. म्हणून मेपल ट्रीच्या फांद्या कापणे आवश्यक होते. इलेक्टीक सॉने माझे यजमान मोठाल्या फांद्या कापत होते आणि हेल्परचे म्हणजे माझे काम होते की त्या फांद्या घरामागच्या खड्ड्यात टाकून देणे हे होते. आमच्या घरामागे ओढ्यासारखा लांबच लांब खड्डा आहे. बरीच झाडे आहेत त्यात.
आमच्या घरातूनही छान दिसते तिथले खूप हिरवेगार दृश्य. हरत-हेचे सुंदर गाणारे पक्षी, काळी हरणे, झुपकेदार खारी, गबदूल बेवारस मांजरी, छोटुले ससे हे त्या सौंदर्यात नेहमी भर घालत असतात. त्यापलिकडे असलेले सॉकर फिल्ड आणि गोल्फ क्लबचा जरासाही त्रास या निसर्गाला होत नाही. कारण एकच.. तो ओढ्यासारखा लांबच लांब खड्डा!
त्यात आजूबाजूला असलेल्या झाडाच्या फांद्या, पाने, फुले सतत पडत असतात. ( फक्त निसर्ग करतो तोच कचरा. उरले सुरले अन्न,कागद, कचरा,प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे कुणीही तिथे टाकत नाही.)
माझं काम होत की त्या कापलेल्या मेपल झाडाच्या फांद्या त्या खड्ड्यात टाकणे.
आमच्या घराच्या उजवीकडून बॅकयार्डला जाण्यासाठी जिना आहे. त्या पलिकडे तो खड्डा. मी एकेक करून त्या मोठाल्या फांद्या जिन्यावरून खाली नेऊन त्या खड्ड्यात फेकत होते.
वर येताना घराच्या भिंतीलगत काळसर लांब साप मला दिसला.
मी घाबरून यजमानांना बोलावले.
"चल ग! साप?इथे कुठे?" असं म्हणत ते तिथे आले आणि "हो ग हो. सापच तो. मारूया त्याला. काठी आण जा जाडीशी गॅरेज मधून" म्हणून मला सांगितले.
मी "कुठची काठी, काय काठी" करत घरात पळाले आणि बाहेर येताना कॅमेरा घेऊन आले. सापाचा दूरूनच फोटो काढला.
साप निश्चल दिसला. म्हणून जराशी धिटावले होते. तेव्हा यजमानांच्या हातात माती उचलायचा फावडा होता. तो त्यांनी त्याच्या जवळ नेला आणि टोकाने ढोसल्यासारखे केले.
सापाने एकदम डोक वर उचललं . धीर एकवटून मी अजून फोटो काढला.
ते सापाला कळलं की काय कोण जाणे पण जरा पोझ देण्यासाठी त्याने पुढे होऊन मुंडी अजूनच वर उचलली. माझी भितीने गाळण उडाली .
यजमान म्हणाले "नाग आहे वाटतय. फणा काढतोय. जाऊ देऊ त्याला."
"बापरे. येईल की घरात कधी तरी." मी म्हणाले.
"मग जा. काठी आण मोठीशी, मारू त्याला." यजमान म्हणाले.
माझी भूतदया आडवी आली. "नको नको,मारूया नको.मी नाईन वन वन ला बोलावते. ते घेऊन जातील त्याला न मारता."
" नाईन वन वन कशाला? इमर्जन्सी आहे का ? काही नको." यजमानांनी माझा विचार मोडून काढला.
तेवढ्यत यू टर्न घेऊन सापाने वळण घेतलं आणि तो जीभ बाहेर काढून आमच्याच दिशेने पाहू लागला. ते पाहून मी भितीने गार पडले.
सापाच्या जिभेवरून यजमानांना खात्रीलायक वाटू लागले की तो नाग आहे.
"ह्याला मारला तर नागिण येईल." पूर्वी भारतात काम करत असताना फॅक्टरीत शॉप फ्लोअरवर एकदा नाग निघाला होता. तो यजमानांनी मारला होता. आठवड्याभरात दुसरा नाग निघाला होता म्हणे तिथे. तो कामगारांनी मारला आणि ती नागिण होती याची बातमी माझ्या यजमानांना दिली होती. या अनुभवावरून आमच्या घराजवळ दिसलेल्या सापाला ( नाग असो /नसो) न मारण्याचा त्यांचा निर्णय झाला.
तो मरावा अशी इच्छा नव्हती. त्याला रक्ताळलेलं मी पाहू शकले नसतेच. पण तो नजरेआड व्हावा अशी माझी तीव्र इच्छा होती. मी घाबरूनही त्याचे फोटो घ्यायची संधी दवडणार नव्हते.
आमचा विचार विनिमय आणि निरीक्षण सुरूच होतच तेवढ्यात सापाने जिन्याच्या बाजू बाजूने खाली बॅक यार्ड कडे जायला सुरवात केली. साप पुढे, कॅमेरा हातात घेउन मी आणि झाडाची फांदी हातात घेऊन यजमान त्याच्या मागे असे मार्गक्रमण सुरू झाले.
साप बिनधास्त होता असे नाही. पण घाबरून सरसर पळत ही सुटला नव्हता. आमच्या सारख्या दुष्ट मानव प्राण्यापासून बचाव त्यालाही हवा होता हे निश्चित.
तो बॅक यार्डच्या लॉनवरून त्यापुढील खड्ड्यातील झाडात, पालापाचोळ्यात जाईल असे वाटले.
पण त्याने दिशा बदलली आणि तो आमच्या घराच्या डाव्या बाजूच्या चढावाला लागला. हा चढाव पुन्हा घराच्या पुढे येउन संपतो.
तो आमच्या घराच्या उजवीकडून मागे जाऊन डाव्याबाजूने पुन्हा पुढे येणार अशी चिन्ह दिसू लागली. गॅरेज मधे शिरला तर बाहेर काढणं मुश्किल. म्हणून यजमानांनी ते पुढे जाउन बंद पटकन बंद केले.
साप घराच्या बाजूच्या झाडी खालून पालापाचोळ्यावरून जाताना स्पष्ट दिसत होता. मी कमरेत वाकून वाकून पहात होते त्याला. कुठे जातो आहे ते कळणे आवश्यक वाटले तेव्हा.
गेल्या वर्षी आम्ही घराची वास्तूशांत केली. तेव्हा वास्तू पुरूष आग्नेय दिशेला पुरला होता. त्या दिशेला तो साप वळला आणि बाजूच्या एका झुडपामागे दिसेनासा झाला. तिथे लपायला खरतर काही ही जागाच नाही आहे. ना सापटी, ना कपार. ना दाट झाडी.
यजमानांनी झाडात फांदी ढोसून ढोसून त्याला बाहेर हुसकवण्याचा प्रयत्न केला. पण छे!! तो काही बाहेर आला नाही. संध्याकाळ पर्य़ंत आम्ही फ्रंट यार्डमधे साफसफाई व इतर कामं करत होतो. त्या झुडपाकडे माझे बारीक लक्ष होते. पण तो साप काही दिसला नाही.
तो साप दॄष्टीआड व्हावा अशी माझी इच्छा होती पण तो कायमचा दॄष्टीआड व्हावा अशी होती.
ती इच्छा अजूनही आहे. तरीही आता माझी नजर का कुणास ठाऊक सारखी त्यालाच शोधत असते.
आता मनात काही प्रश्न पुन्हा पुन्हा येताहेत.
१] तो कुठल्या प्रकारचा साप? विषारी की बिन विषारी?
२] खऱच नाग तर नसेल?
३] पुन्हा दिसेल का कुठे? घरात/ बाहेर?
४] तो वास्तूपुरूष पुरून ठेवलेल्या जागीच का जावा?
५] तिथून शेवटी गेला तरी कुठे?

प्रतिक्रिया
ईस्टर्न किन्ग स्नेक ??
छान
तुम्हाला
मस्त
धन्यवाद
छान
मस्त
छान...अजगर
बाई
आयला! लै
असेच म्हणतो...
मला वाटलं
किस्सा व
छोटी रोपटी लावताय
+१
अगं, हे
इस्टर्न किंग स्नेक
कोब्रा कोब्रा
हॅ हॅ हॅ. एक
काळ्या
मस्त लेख,
मस्त
छान लिहिलं