Skip to main content

मे. हायकोर्टाचे अभिनंदन

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 18/04/2010 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
४९८ अ च्या खोट्या तक्रारी म्हणजे मानसिक छ्ळ http://www.esakal.com/eSakal/20100418/4861360524180312202.htm सकाळ ने ही बातमी दडपली नाही म्हणून सकाळ्चे पण अभिनंदन.

वाचने 3624
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

श्री युयुत्सु, ही माहीती दिल्याबद्दल धन्यवाद. प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

सौ. माधवी होळकर ह्या मिपावर नसल्या तरी सुदर्शन केळकर मात्र मिपावर आहेत असं वाटतं :) बाकी चर्चा "नेहमीप्रमाणे" उत्तम :) क्रांतिकारकांचा विजय असो. :) - ( अ‍ॅड्व्होकेट )टारझन दांडेकर

केळकर यांनी त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीसाठी तीन लाख रुपये बॅंकेत ठेवावेत, असे आदेशही न्यायालयाने पतीला दिले आहेत. पत्नी माधवी कमावती असून मुलीचा ताबा त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे मुलीला वडिलांकडून कायमस्वरूपी एकरकमी निर्वाहभत्ता देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
म्हणजे शेवटी बायको नाही, मुलीचा ताबा नाही, व वर पैसे पण द्यायचे... तेसुद्धा बायको कमावती असताना... याला निव्वळ नैतिक विजय म्हणावं नाहीतर काय?

In reply to by राजेश घासकडवी

तीन लाख रु हल्लीच्या मानाने कमीच नाहीत का? तिच्या पतीचे किती उत्पन्न आहे ते समजले नाही. कदाचित तीन लाख रु त्या प्रमाणात असावेत. असो. पत्नी गेल्याचे काही दु:ख करायची वेळ त्या माणसावर येईल असे वाटत नाही, जी बाई खोटी तक्रार करते, ती नसलेलीच बरी. असाही त्याचा विचार असावा. प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

In reply to by राजेश घासकडवी

याला निव्वळ नैतिक विजय म्हणावं नाहीतर काय?
या विधानात मला खवचटपणा दिसतो. मुलीचा ताबा ती सज्ञान होई पर्यंत आईकडेच असतो. ३लाख देऊन या गृहस्थांची सूटका झाली हे माझ्या दृष्टीने विशेष आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

यांत कोर्टाने न्याय कसा दिला ते समजले नाही. मुलीच्या खर्चासाठी नवर्‍याने पैसे द्यायचे तेही बायको कमावती असताना ? मग मुलीचा ताबाच वडिलांकडे का नाही दिला ? कोर्टाने बिचार्‍या नवर्‍याला फक्त 'शाब्दिक दिलासा' दिला आहे. खोट्या तक्रारी करणार्‍या बायकोला त्याच खटल्यात शिक्षा देता येते का ? तज्ञांनी मार्गदर्शन करावे.

In reply to by हेरंब

वरील बातमीत बायकोला पोटगी कोर्टाने दिलेली नाही हे महत्त्वाचे. बायकोचे उत्पन्न पुरेसे नसले तरीही पोटगी मिळवता येते. ÿखोट्या तक्रारी करणार्‍या बायकोला दूर्दैवाने कायद्यात काहीही शिक्षा नाही. इतके दिवस खोट्या तक्रारीने नवर्‍याचे काहीही नुकसान होत नाही असा कोर्टाचा सूर असायचा आता तो बदलला आहे. हा बदल खरोखर मोठा आणि दूरगामी आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्र दातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

तुम्ही इतक्या हिरिरीने ही बातमी दिलीत, म्हणून तुमचेही अभिनंदन... अशा बातम्याच बायकांच्या छळाचा बळी होणार्‍याना दिलासा ठरतात.. :) ***************************

In reply to by युयुत्सु

याला निव्वळ नैतिक विजय म्हणावं नाहीतर काय? या विधानात मला खवचटपणा दिसतो.
खवचटपणा लाईज इन द आय ऑफ द बिहोल्डर हे खरं असावं बहुतेक. कारण हेरंब यांनी हेच विधान वेगळ्या शब्दांत केलेलं आहे...

In reply to by राजेश घासकडवी

हा हा हा ... दोन्ही प्रतिसादांशी सहमत आहे. अदिती

तो माणुस त्याच्या माजी बायकोविरोधात मानसिक छळाची तक्रार करु शकतो का? ---- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

माझ्या मते ही केस पुरुषमुक्ति चळ्वळीतील मैलाचा दगड ठरेल युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

>>माझ्या मते ही केस पुरुषमुक्ति चळ्वळीतील मैलाचा दगड ठरेल ह्या चळवळीबद्दल अजुन माहीती करुन घ्यायला आवडेल. ---- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

कायदेशीर बाबी बाजुला ठेवल्या तर लग्नाच्या सुरुवातिपासूनच काहीतरी 'लोचा' दिसतोय ह्या केसमधे. भेंडी P = NP

अगदि बरोबर आहे. साधारण १९९२-१९९३ च्या दिवाळी अंकात याच नावाचा एक सुंदर लेख आला होता. सर्व काही ह मो मराटे असा त्याचा नूर होता. ४९८ अ असेच त्या लेखाचे नाव होते. खरी कथा असूनही तीचा थाट आणि बाज ललित लेखाचा होता.( ह मों ची '' एका उन्हात भर दुपारी '' अशीच अस्वस्थ करणारी कादंबरी.) कितपत सत्य हे कोण समजणार?? पण असा अन्याय होउ शकतो हे मात्र खरे असावे. यात मला तरी कोणताही खवचटपणा दिसत नाही.

मे या शब्दावर आक्षेप! मे म्हणजे मेहरबान. युअर ऑनर या शब्दावर देखील आक्षेप! लोकशाही व्यवस्थेत न्याय ही काही भीक मागितल्यासारखी मागण्याची गोष्ट नाही व कोणी मेहरबानी केल्यासारखे तो देण्याचीही गोष्ट नाही. अनेक राजेशाही पंरपरेतील गोष्टी जशाच्या तशा चालू आहेत. न्याय हा मूलभुत हक्क आहे. हे माझे मत नसुन अ‍ॅड असीम सरोदे यांनी या विषयावर भाष्य करणारा एक लेख सकाळ मध्ये लिहिला होता. त्याची आठवण आली आता मला तो शोधावा लागेल प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुमचा आक्षेप समजू शकतो. पण आम्ही पडलो पुरुष आणी त्यात परत भीडस्त... कोर्टाचा कशामुळे अपमान होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही तो शब्द्प्रयोग कोर्टाचा निर्णय होई पर्यंत तसाच वापरायचा असे ठरवले आहे. बाकी अ‍ॅड सरोदे यांचे लेख मी पण वाचतो. मला ते बर्‍याच वेळा सवंग आणि स्वतः स्वतःची आरती (मी कसा कनवाळु आहे हे जगाला सांगण्यासाठी) करण्यासाठी लिहिलेले वाटतात. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

पाटिल साहेबाना अगोदर ही बातमी कळाली असती तर त्याच्या वर ही वेळ आली नसती. http://www.esakal.com/eSakal/20100419/5744146524579288582.htm पुरुषमुक्ती चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते युयुत्सुचे व न्यायालयाचे अभिनंदन वेताळ

In reply to by वेताळ

>>पाटिल साहेबाना अगोदर ही बातमी कळाली असती तर त्याच्या वर ही वेळ आली नसती. आपल्या कायद्या मध्ये २ लग्न करणे गुन्हा असताना २ लग्ने ? एका पोलीस निरिक्षका कडे पगारातून ७ लाख ५० हजार सेव्ह होऊ शकतात?? त्यामुळे वरील बातमी अतिशय असंबंधित आहे. http://esakal.com/eSakal/20100419/5322652769683401385.htm या किंवा http://esakal.com/eSakal/20100220/5042783571487755028.htm या अशा बातम्यांकडे कधी युयुत्सु काही वक्तव्य करणारे लिखाण करणार नाहीत. येउनजाउन ते पुरूषमुक्ती चे गोडवे आणि स्त्रिया कशा वाईट हेच .. पुरुषमुक्तीच (?) हवी तर स्वतः तरी कशासाठी लग्न केलेत? जय महाराष्ट्र , जय मराठी !

मला आधी वाटलं 'मेसर्स' हायकोर्ट का काय! अदिती

स्वतः तरी कशासाठी लग्न केलेत?
आपण मला वैयक्तिकरित्या भेटलात तर अवश्य उत्तर देईन. मूळ विषयाशी संबंध नसल्यामुळे आपल्या टिपणीवर अधिक काही लिहिण्याची इच्छा नाही. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

मला तशी गरज वाटत नाही. गरजच काय आपल्याला भेटण्याची ही इच्छा नाही. माझे विधान स्वगत समजावे. संपादकांनी वाटल्यास उडवावे. जय महाराष्ट्र , जय मराठी !