बर्याच दिवसानी इकडे चक्कर मारु मारु म्हणत रहातच होत.
एका रविवारी जमवलच आणि निघालो.
घरुन उरकुन जायल १० वाजुन गेले होतेच. उन्हाचा तडाखा भारीच जाणवत होता.
निगडीतुन हे ठिकाण एकदम जवळ आहे. देहुरोड क्रॉस केला की सोमाटणे फाट्याच्या अलिकडेच घोराडेश्वराचा डोंगर आहे. पावसाळ्यात मस्त हिरवेगार डोंगर बघुन मजा वाटत असते पण आता ओकेबोके डोंगर.
तिकडे गेलो. दुचाकी सावली बघुन लावली. (हो नायतर नंतर पोळुन कोण घेणार?? ;) )
पायर्या बसवल्या आहेत आता. पण दुतर्फा झाडी नाहिये. मग काय उन्हाचा तडाखा सहन करत , कॅमेरा सरसावत निघालो. सोबत बायको आणि पोरगं होतच.
जाताजाताच एक कडड्ड्डक्क्क पाटी पाहिली. :)
काहि पायर्या चढुन झाल्या तो वरच चिरंजीवाने बाबा मला वर उचलुन घे चा घोषा लावला.
अरे अजुन थोडं अजुन थोडं अस बोल्लो पण नाही, तो हटुनच बसला होता. मग काय घेतल त्याला कडेवर आणि निघालो. अशावेळी तो बायकोकडे जात नाही. त्याला बाबाच पाहिजेच असतोच...
हे त्याला बायकोने शिकवुन ठेवल असेल काय?? :D
चांगलीच दमछाक झाली वर जाइपर्यंत.
पण वर गेल्यावर मस्त हवा होती. शिवाय शिवलिंग असलेल्या गुहेत मस्त थंडगार वातावरण असतं.
एक साधक तिथे एकाग्र चित्ताने जप करत होता आणि आमच पिल्लु तिथे (कितीही शांत केल तरी ) उड्या मारत दंगा करत होत.
काहि वेळाने तो साधक त्याचा जप पुर्ण झाल्याने तिथुन निघुन गेला.
मग आम्ही जरा निवांतपणे दर्शन घेतल. मुलाला देवबाप्पा नीट दाखवला.
तिथे बसुन ओमकाराचा जप केला आणी बाहेर आलो.
बाहरेच्या पारावार बसुन दमलेली (????) बायको आणि पोरग पाणी आणि कोल्ड्रिन्क पित बसले तोवर मी जरा फोटु काढण्याचा चान्स मारला.
हे बघा पत्थर के फुल :D
बाहेरुन गुहा अशी दिसते
थोडा वेळ थांबुन परत निघालो.
उतरताना मात्र पोराने त्रास न देता माकडउड्या मारत उतरण्याचा आनंद घेतला.
उतरताना निम्म अंतर उतरल्यावर एक दोन फटु काढले आणि घरचा रस्ता धरला.
इन्द्रायणी नदी
अलिकडेच ही गणेशमुर्ती बनवली आहे.
कडाक्याच्या उन्हात फार दुर न जाता , घरच्यानाही कुठेतरी फिरायच समाधान शिवाय फाफलत पायर्या चढल्याने होणारा व्यायाम असा दुहेरी फायदा करुन देणारी ही छोटीशी सहल.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7175
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
सुरेख...!
हा तर संत तुकाराम महाराजांचा भंडारा डोंगर
नाय हो
In reply to हा तर संत तुकाराम महाराजांचा भंडारा डोंगर by स्वप्नयोगी
भटक भुके
वाह !!
मस्त रे..
वा झकासराव
छान वर्णन
नावा
झकास वर्णन
धन्यवाद
In reply to झकास वर्णन by प्रचेतस
झकासराव चे
जायलाच हव..
मस्तच रे!!!
माहिती आणि
धन्यवाद
मस्तच!
छानच झाली
वा वा वा!!!
अय्यपा
In reply to वा वा वा!!! by धमाल मुलगा
छान फोटो
+१
In reply to छान फोटो by स्वाती२
मस्त रे
फोटो एकदम झकास आले आहेत...