Skip to main content

मी मिसळपावचा मालक झालो/झाले तर...

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 15/10/2009 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळपावचा मालक झालो/झाले तर... १) येथे बरेचसे मूलभूत फरक करीन.. (कोणते ते सांगा). आहे ते वातावरण बदलीन आणि मिपा अजून जास्त छान आणि खेळीमेळीचे करीन. (कसे ते सांगा) २) येथे व्याकरण-शुद्धलेखनाचे कडक नियम करीन.. ३) येथील खेळीमेळीचे वातावरण बदलून सभासदांचे चेहेरे सतत बाप मेल्यासारखे कसे राहतील हे पाहीन, ४) येथे सतत मरणाच्या जड आणि दुर्बोध चर्चाच फक्त कश्या होत राहतील हे पाहीन, ५) येईल त्या किंमतीला विकून खाईन.. वगैरे वगैरे वगैरे... नोंदवा आपापली म्हणणी! :) तात्या.

वाचने 32096
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

मी प्रत्येक सभासदाचा फोटो टाकायची सोय करेन. सौरभ

मी मालक झालो तर आधी आहे ते संपादक मंडळ बरखास्त करुन सगळी नवीन भरती करेन. तसेच श्रीकृष्ण काकांना संकेतस्थळ मालक म्हणजे विठोबा आणि संपादक म्हणजे त्याचे बडवे असे सांगणारा लेख लिहून द्यायला लावेन.

१) खरडफळ्यावरील नोंदी (वचन दिल्याप्रमाणे) तीन दिवसात उडवेन. २) इतरांनी लिहिलेले व 'मराठी-अमराठी'मधील दर्जेदार लेखन इथे पोस्ट करण्याची मुभा देईन ३) क्रमशः हा प्रकार बंद करेन. ४) अधिकार्‍यांची निवडणूक घ्यायला प्रोत्साहन देईन. अजूनही एक सूचना लिहायची आहे, पण ती तात्यांना 'व्य.नी.'द्वारा पोचवेन. वरील सर्व विचारले म्हणून सांगत आहे. कारण 'मिपा'वर मी अजून नवाच आहे! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

मिपाचे मालक व्हायचे विचार बी आमच्या ध्यानी मनी नाई. कुनी पानी द्या रं ! लईच तहान लाग्ली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मी जाहीरातींकरता नक्की एक विभाग करेन जो की मिपाचा अर्थिक भार उचलू शकेल. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

In reply to by शुचि

पैसे कोणाच्या खात्यात जमा करायचे ते देखील कळवा.

In reply to by कुंदन

शुची , You can always count on Me !! ;-) पैसे कोणाच्या खात्यात जमा करायचे ते देखील कळवा. @ कुंदन , "आमच्यात पण पैसे मिळवण्यासाठी भाग्यांकाची वाट बघत नाहित." ;-) ~ वाहीदा

नाठाळपणा करुन मिपाचे वातावरण गढुळ करणार्‍यांना, बायांच्या टिंगळटवाळ्या, विनाकारण त्रास देणार्‍या नराधमांना भुंडाडावर लाथ घालुन झिरो मिंटात हाकलुन देइल. भावश्या