Skip to main content

बेबी ब्लॅंकेट

लेखक स्वाती२ यांनी मंगळवार, 13/04/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मैत्रिणीचा या विकांताला बेबी शॉवर आहे. तिच्या बाळासाठी विणलेले बेबी ब्लँकेट.
लेखनविषय:

वाचने 4718
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

गोड दिसते आहे. तू विणलेस का? तसे असेल तर तू ग्रेट आहेस!:) त्यात गुलाबी आणि निळा दोन्ही रंग आहेत. मग मुलगा आहे कि मुलगी? हे विणायला किती दिवस लागले? कालच एक आज्जी आपल्या नातीला लोकरीचा फ्रॉक विणताना पाहिली. मलाही माझ्या भाचीसाठी (वय वर्षे २ पण कपडे ४टी घालते;)) तसं काहीतरी विणावेसे वाटते पण प्रॉजेक्ट अर्धवट राहायला नको म्हणून पटकन होणारा टाका/वीण असली म्हणजे बरे पडेल. रेवती

रंगछटा अगदी गोड आहेत :)! बाळाच्या नाजूकपणाला शोभतील अशा! सुंदर!! :) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

धन्यवाद रेवती आणि अरुंधती. @रेवती अग त्यांना मुलगा होणार आहे म्हणून निळी किनार. बाकी ब्लँकेटला Variegated yarn वापरला. multicolor yarn असला की वीण सोपी असली तरी चालते. रोज २-३ तास केले तर हे साधारण १५-२० दिवसात होते. मी माझी पुतणी २ वर्षांची होती तेव्हा तिच्या साठी पोंचो केला होता. तो असाच १५-२० दिवसात झाला होता. तसेच साईजचाही प्रश्न येत नाही स्वेटर सारखा.

>:D O:) >:D चो च्वीट!!!! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

मस्तच दिसतंय ब्लँकेट...मी एकदा माझ्या नवर्‍यासाठी स्वेटर बनवला होता... तो पण L साईझ... तेव्हापासून कानाला खडा लावला की कध्धी स्वेटर बनवणार नाही... :D दिपाली :)

क्लासच!! खूप सुंदर बनवले आहेस. मला हे विणकाम वगैरे काहीही येत नाही. त्यामुळे टाक्यांबद्दल नाही विचारले काही. (तू ऑर्डर्स घेतेस का?) ;) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

कुठली लोकर वापरली? रंग छान अाहेत. तुम्हाला विणकामात रस असल्यास हे संकेतस्थळ तुम्हाला अावडेल... www.ravelry.com विणकाम, क्रोशा वगैरेचे भरमसाठ पॅटर्न्स, लोकरींचे प्रकार, इ...

विणकाम उत्तम येणार्‍या लोकांबद्दल मला थोडीशी असूयाच आहे :) शाळेत विणकाम असायचे पण कधीही "जमले" नाही. पण विणकाम करायला आवडेल मात्र. छानच आहे ब्लँकेट.