केळफुलाचे कबाब (वडे)
गेल्या विकांताला घरा मागच्या आवारात फेरफटका मारत असताना केळीच्या झाडांना लोंगर लागलेले दिसले. तेव्हाच इरादा पक्का केला की या आठवड्यात आईकरते तसे केळफुलाचे कबाब /डाळवडे करुन पहायचे.
काल दुपारी लंच ब्रेक मध्ये घरी गेलो. चण्याची डाळ भिजत घातली. आणि एक बोंड (केळफुल) तोडुन आणल.
संध्याकाळी ऑफिस मधुन आल्यावर केळीच बोंड निसुन घेतल.
बाकिच्याही सामानाची जुळवाजुळव केली.
साहित्यः
१ बाउल चण्याची डाळ ३-४ तास भिजत ठेवलेली.
२/३ हिरव्या मिरच्या.
१ इंच आल.
२ पाकळ्या लसुण (आवडत असल्यास)
फोटोत दाखवल्या प्रमाणे , त्या जांभळ्या पाकळ्यांच्या आड ५-६ फुल असतात.
प्रत्यक फुलाच्या मध्ये ६ केसर (?) असतात त्यातला एकच इतरांहुन वेगळा असतो तो कढुन टाकातचा आणि एक लहान पाकळी असते ती पण काढुन टाकायची.
जस जस जांभळ्या पाकळ्या कमी कमी होत जातात तस तस आतला गाभा पांढरा दिसायला लागतो. तो कोवळा असतो. तो आख्खा घेतला तरी चालतो.
केळफुल साफकरुन आणि बारीक चिरुन.
१ लहान कांदा, उभा आडवा चिरुन.
१ चमचा जीर.
१ चमचा लाल तिखट.
१/२ चमचा धणे पुड.
१/२ चमचा हळद.
मीठ चवीनुसार.
तळण्यासाठी तेल.
कृती:
सर्वप्रथम डाळ + मिरची + आल + लसुण मिक्सरमध्ये भरड वाटुन घ्याव. जर घरी पाटा वरवंटा असेल तर त्यावर वाटलत उत्तमच.

मग एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण आणि बाकीचे मसाले, कांदा सगळे एकत्र करुन घ्या.
लहान लहान गो़ळे करुन वडयांसारखा आकार द्या.
एका कढईत तेल गरम करुन त्यात हे कबाब खरपुस तळुन घ्या.
चटणी सॉस सोबत गरमा गरम सर्व्ह करा.
हा हा म्हणता अर्ध्या/एक तासात मस्त कबाब तयार पण झाले.
(आणि खा खा करता ५-१० मिनिटात फस्त पण झाले.)
वाचने
11970
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
वा !!!!
पाककृती आणि फोटो आवडले
In reply to पाककृती आणि फोटो आवडले by सन्जोप राव
असेच म्हणतो
तू
मस्त ,मस्तच!!
मस्त
भारी
अर्धा-एक तासात!
सह्ही!! मला
ह्म्म्म्म्...
लै भारी!!
सॉलीड...
आजोबांची आणि वडिलांची आठवण आली
मस्त!
गणा भाऊ...
केळफुल
In reply to केळफुल by काजुकतली
केळफुलात
धागा वर
मस्त झाले