आल्मंड बटर
आल्मंड बटर
आजकाल पीनट अॅलर्जी मुळे इथे बर्याच शाळा 'पीनट फ्री' असतात. माझ्या लेकाची शाळाही याला अपवाद नाही. त्यामुळे साहाजिकच पीनट बटर ऐवजी आल्मंड बटर वापरायला सुरुवात केली. पण हे आल्मंड बटर एक तर गावातल्या दुकानात मिळत नाही आणि दर वेळी ५० मैलावरच्या दुकानात तेवढ्यासाठी जायची माझी तयारी नव्हती, तेव्हा घरी प्रयोग केला. दोनदा ट्रायल अॅन्ड एरर केल्यावर लेकाला आवडेल असे आल्मंड बटर जमले.
साहित्य
१/२ कप बदाम
चिमुटभर मीठ
१ टी स्पून वेजिटेबल किंवा कॅनोला तेल
कृती
ओवन २५० F ला तापत ठेवा. ओवन तापला की ट्रे मधे बदाम ठेऊन ओवन मधे २०-२५ मिनिटे भाजुन घ्या.भाजताना शेवटच्या ५ मिनिटात लक्ष ठेवा. बदाम गार झाले की ग्राईंडर मधे तेल सुटेपर्यंत बारीक करुन घ्या. बोलमधे काढून त्यात चिमुटभर मीठ घाला. थोडे थोडे तेल घालत चमच्याने घोटून तुम्हाला हवे त्या कंसिस्टन्सीचे आल्मंड बटर तयार करा. घट्ट झाकणाच्या डब्यात भरून फ्रिज मधे ठेवा.
वाचने
4603
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अगं पण
च्यायला,
बर्याच
In reply to बर्याच by शाहरुख
+१ मीपण
In reply to +१ मीपण by चतुरंग
आणि गूळखोबरं
In reply to +१ मीपण by चतुरंग
दाण्याचे कूट + गूळ + तूप असा लाडू
In reply to दाण्याचे कूट + गूळ + तूप असा लाडू by बेसनलाडू
+१ अरे काय तू याद दिलीस!
भातुकलीत
बाबांनो ....
बदामाची
नवीन
In reply to नवीन by समीर गोखले
(M ने
In reply to नवीन by समीर गोखले
समीर