गीता वाचली आहे. पण पाठ नाही. त्यावरून दृष्टान्त देता येतील इतकी आठवतही नाही.
जगण्यात जाणीवपूर्वक तिचा वापर करीत नाही. पण व्यवहार आजही असंख्य असे आहेत की त्यावेळी आपण वागतो ते गीतेप्रमाणे होत असेलच. 'कर्मण्येवाधिकारस्ते...' असे वागतो अनेकदा. तेव्हा काही गीतेत सांगितले आहे म्हणून तसा वागतो असे म्हणता येणार नाही. कारण तितका सभानपणे निर्णय झालेला नसतो. तसे वागायचे हे ठरलेले असते विशिष्ट मुद्यांवर इतकेच. हीच बाब इतर अनेक गोष्टींमध्ये आहे.
सबब, शेवटचा पर्याय निवडला आहे.
>>मी भगवदगीता वाचलेली आहे आणि बर्याचदा जीवनात त्याचा संदर्भ घेतो अथवा लागतो.
आता बरीचशी विसरली पण आहे. ;)
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही
संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
मी ज्ञानेश्वरी मनापासून वाचते. जी की गीतेचे भाषांतर आहे. आणि मी जीवनात हे नीरीक्षण करते अरे खरच - सात्विक, राजसिक,तामसिक गुण प्रत्येक वस्तुत आढळतात वगैरे वगैरे. मी प्रयत्न करते जास्तीत जास्त सात्विकतेत राहाण्याचा जरी कल कधीकधी राजसिक जात असला तरी. माझा कल तामसीक नाही.
पण जीवनात संदर्भ लागतो हे नक्की. भक्तीयोग, राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग यापैकी मला भक्तीयोग खूप शांत आणि सोपा वाटतो.
मला ज्ञानेश्वरी (गीता) चा संदर्भ जीवनात लागतो. कुठेतरी जाणीवेच्या अमूर्त पातळीवर हे संस्कार काम करत राहतात हे नक्की.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
इतर असा पर्याय निवडला आहे. गीता काहीशी डिटेलमध्ये वाचली असल्यामुळे त्याचा जीवनात वागण्यासाठी संदर्भ घेतो असे म्हणवत नाही. (कसे वागावे हे ठरवताना आजच्या संकल्पनांनुसारच निर्णय घेतो. योगायोगाने काही निर्णयांना गीतेत समर्थन मिळतही असेल).
हिंदू धर्म/तत्वज्ञानविषयक वादविवादात संदर्भ म्हणून गीता जरूर वापरतो. म्हणून दुसरा पर्याय निवडला नाही.
नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
गीता (इस्कॉन भाषांतर) थोडीफार (काही श्लोक अधुनमधुन) वाचलेली आहे.
गीतेचा संदर्भ घ्यावा असा विचारही मनात आला नाही. मराठी संकेतस्थळांवर वावरू लागल्यानंतर मात्र एक-दोन वेळा जालावर एखाद्या श्लोकाचा अर्थ पाहीला आहे.
थोडेफार वाचन व अधुनमधून संदर्भ हे पर्याय नसल्याने इतर.
इतर या पर्यायाला मत दिले आहे.
मी गीता वाचलेली नाही पण गीतेचे सार अनेक ज्ञानी लोकांच्या तोंडून ऐकले आहे. त्यावरुन असे म्हणता येईल की मी प्रत्यक्ष जीवनात फारसा उपयोग करत नाही.
मी कुठलेही काम करताना ते पूर्ण व्हावे या तळमळीने करतो. दरवेळेला हिशोबी वृत्तीने फळाची अपेक्षा ठेवत नाही, पण कधीच ठेवत नाही असे सांगता येणार नाही.
मला कामे लोंबकळत ठेवता येत नाहीत. कुठलेही काम झाले नसेल तर माझ्या मनाच्या ग्राफची बेसलाईन सरळ रहात नाही.
नातेवाईकांना मी घाबरत नाही. तत्वासाठी माझी कोणाशीही भांडायची वा वाद घालण्याची तयारी असते.
मूर्तिपूजा मला मान्य नाही. कर्मकांडावरही माझा अजिबात विश्वास नाही. पण तरीही मी नास्तिक असल्याचा दावा करत नाही.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
भगवद्गीता मी पूर्ण वाचलेली नाही. तसेच व्यक्तिगत जीवनात भगवदगीतेचा संदर्भ घेऊन जगतोच असे काही म्हणता येणार नाही. भगवद्गीता अगदी 'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता पासून सुरुवात करुन 'यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः....'' ला संपवलेली नाही. अधलेमधले श्लोक मला परिचित आहेत. कधीतरी भगवद्गीता उघडतो आणि कोणतेही श्लोक आणि त्याचे अर्थ वाचतो. अध्याय पाठ नाहीत. पण भगवद्गीता वेदांचे सार आहे. भगवद्गीतांमधील श्लोकांचा अर्थ खूप खोल आहे आणि त्याचा कितीही अभ्यास केला तरी त्याच्या अर्थांचा शोध घेता येणार नाही. इ.इ. असे माझे काही समज आहेत. आणि भगवद्गीतेतील रचनेवर माझी काहीएक श्रद्धा आहे.
-दिलीप बिरुटे
संपूर्ण भगवद्गीता वाचण्याचा योग गीतापठणाच्या स्पर्धेमुळे आलेला. अर्थात् त्यात जिंकलो कधीच नाही हा भाग निराळा. ;)
गीतेवरील काही टीका वाचल्यात. घरी सार्थ गीता होती त्यामुळे काही संदर्भ लक्षात आहेत. पण जाणिवपूर्वक वापर करतो असे म्हणता येणार नाही हे देखील खरे.
खरे तर त्याचा संबंध आपल्या वृत्तीत होणार्या बदलांशी निगडीत आहे. अन् तो जाणते/अजाणतेपणे होतच असतो.
मला संतांचे सांगणे जास्त सोपे असल्यामुळे भावते. व ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. यश अजून म्हणावे तेवढे आलेले नाही. पण त्यामुळे वृत्तीत, जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात हळूहळू बदल होत जातो हे मात्र खरे.
शेवटच्या पर्यायास मत दिलेले आहे.
राघव
भगवद्गीता - भाषांतरांतून वाचलेली आहे, त्यातल्या काही शिकवणी वापरत नाही. निदान गीतेने शिकवलं आहे म्हणून तरी नाही. काही वेळा मी जो वागतो त्याला त्यातील अर्थ लागू पडत असतील. कर्मण्येवाधिकारस्ते मात्र अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतो, पण जमत नाही.
खरं तर "गीता वाचलेलीच नाहीं" असे मत देणार होतो, पण 'secondary smoking' प्रमाणे इतरांनी दिलेल्या संदर्भातून कांहीं श्लोक कानावरून गेले आहेत. जेवढे कानावरून गेलेले आहेत त्यावरून माझे आणि 'गीते'चे पटेल असे कांहीं मला वाटले नाहीं, म्हणून मग मी तिच्या वाटेला गेलोच नाहीं.
म्हणून सर्वांगाने विचार करून 'इतर'ला मत दिले आहे!
'गीता न वाचलेले' व 'इतर' यांचे मतदान मिळविल्यास 'घटनादुरुस्ती'स पुरेशी (६७ टक्के) मतें मिळाली आहेत असे म्हणायला हरकत नाहीं.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
गीता
In reply to गीता by श्रावण मोडक
हेच आणि
>>मी
इतर
इतर
In reply to इतर by नितिन थत्ते
इतर
In reply to इतर by धनंजय
इतर
इतरला मत दिले आहे
शालेय...
इतर
रोजच्या
भगवद्गीता
संपूर्ण
इतर
'इतर'ला मत दिले आहे
गीता