९५ वाचने होऊनही एक देखिल प्रतिसाद नाही? कुमार गंधर्वांना मिसळपावकर ओळखत नाहीत की काय? असो.
कुमार गंधर्वांबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा लेख आवडला. मानसराव आपण इथे त्याचा दुवा दिलात त्याबद्दल मी तुम्हाला दुवा देतो.
कुमारजी माझ्या आवडत्या गायकांपैकी एक आहेत. त्यांनी सहजतेने हाताळलेले विविध गानप्रकार ऐकल्याशिवाय त्यांची खरी महती कळणार नाही. निव्वळ एका फुफ्फुसावर, श्वास,दमसास कसास लावणार्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांनी जी उंची गाठली ती एक असामान्य गोष्ट होती. असा कुमार गंधर्व पुन्हा होणे नाही.
कुमारांना माझी आदरांजली.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
मी लेख कालच वाचला पण काल प्रतिक्रिया देण्यास वेळ झाला नाही.
कुमारजी एक असामान्य कलाकार होते ह्यात शंकाच नाही. दैवदत्त देणगीला मेहेनतीची जोड देऊन आणि फुफ्फुसांच्या विकाराचा दैवाघात समर्थपणे पचवून गाण्यात त्यांनी स्वतःचे असे विश्व उभे केले. निर्गुणी भजने ही केवळ त्यांच्यासाठीच जणू काही निर्माण झालेली असावीत असे वाटावे इतकी ती आणि ते एकरुप आहेत.
'अजुनी रुसूनि आहे' सारखी भावगीते सुध्दा केवळ त्यांनीच अमरत्वाला नेऊन ठेवली.
त्यांच्या स्मृतींना माझे वंदन!
चतुरंग
कुमारजींवर जब्बार पटेल यांनी केलेल्या डॉक्युमेंटरीवर येथे लेख वाचला.
http://marathi.webdunia.com/entertainment/regionalcinema/starprofile/0804/08/1080408038_1.htm
प्रतिक्रिया
थोडक्यात पण महत्वपूर्ण!
आठवण
मानस ह्या दुव्याबद्दल आभार!
धन्यवाद
फारच छान
जब्बार पटेल यांची डॉक्युमेंटरी