Skip to main content

मराठी ग्रंथालयासाठी सॉफ्टवेअर हवे...

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 26/03/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
बेळगावात नुकतेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने लोकमान्य ग्रंथालय सुरु झाले आहे. येत्या वर्षभरात ११११११ पुस्तके विकत घेतली जाणार आहेत. सध्या पुण्याच्या साहित्य संमेलनात ग्रंथ खरेदी सुरू आहे. पुस्तकांची माहिती, सदस्यांची माहिती, पुस्तकांची देवघेव, वर्गणी, स्मरण पत्रे, पुस्तकांची वा लेखकांची अकारविल्हे यादी हे सर्व मराठीतून करु शकणा-या एखाद्या सॉफ्टवेअरच्या शोधात आहोत. कुणी काही सुचवेल का?

वाचने 1802
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

काही सॉफ्टवेअर शोधली आहेत. फक्त, आंतरजालावरील माहीती वापरुन सॉफ्टवेअर घेतली आहेत. कोणतेही वापरले नाही. तुम्ही जर ह्यातले कोणतेही सॉफ्टवेअर वापरले तर तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा. http://download.cnet.com/Book-Librarian-Plus/3000-2131_4-10007736.html http://download.cnet.com/Book-Library/3000-2130_4-27657.html फुकट http://download.cnet.com/Granthaalok-The-Book-Library-Manager/3000-2067… http://download.cnet.com/Runningman-Book-Database/3000-2131_4-10141061… http://download.cnet.com/Book-Hunter/3000-2131_4-10907034.html http://www.trustmeher.net/freeware/free_office_tools_free_library_manag… http://www.librarysupportstaff.com/4automate.html http://thenetspiders.com/library.htm http://www.shambles.net/pages/staff/libsoft/

'कोहा 'वापरा. www.koha.org फुकट व मुक्तस्रोत आहे. अनेक मोठी ग्रंथालये कोहा वापरत आहेत. ठाणे येथील ' विद्या प्रसारक मंडळ ' तुम्हाला मदत करु शकेल. त्यांनी ठाणे परिसरातील अनेक ग्रंथालये 'कोहा' वापरुन जोडली आहेत.

In reply to by बोका

कोहा ही खुप प्रसिध्द , मुक्तस्रोत आणि मोफत असून खास ग्रंथलायासाठी बनलेली साहित्य व्यवस्थापन प्रणाली (CMS) आहे. तिचा वापर करावा. युनिकोड मराठी चालत असल्यामुळे मराठी लेखन आणि मराठीत टंकून शोधता येईल. :) सोबतच पुढे काही खास बदल करायचे असल्यास ते सुध्दा करायल अडचण येणार नाही. - नीलकांत

विकास, बोका आणि नीलकांत. आपले खूप आभार. कोहाला अजून भेट दिली नाही. पण त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू केल्यानंतर पुन्हा आपल्याला भेटेनच. पुन्हा आभार.