भेंडके / फुंडके खास खानदेशी पदार्थ
भेंडके किंवा फुंडके किंवा वड्या खानदेशात खास प्रिय आहेत...मी मात्र भेंडकेच म्हणणार...पूर्वी घरी जात्यावर तुरींपासून डाळ पाडत असत, तेव्हा जो डाळीचा चूर पडे त्याचा वापर कसा करावा म्हणून हे भेंडके बनवण्यास सुरुवात झाली...तसे भेंडके बर्याच तर्हेतर्हेने बनतात... साधे कांदा घालून, चिवळीची भाजी (जीला स्थानिक भाषेत चिव्वयी किंवा चिव्वि ची भाजी म्हणतात.) आणि घोळीची भाजी...फॉर अ चेंज माझी आई मेथीची भाजी घालूनही बनवायची...आणि हेल्थ कॉन्शस लोकांसाठी हा वाफवलेला प्रकार आहे म्हणजे अब्सोल्युटली नो ऑइल... :)
तर या भेंडक्यांसाठी काय काय लागते...अंदाजे प्रत्येकी ३-४ पुरतील असे ४ लोकांसाठीचे साहित्य...
२ वाट्या तुरीची डाळीत प्रत्येकी पाव-पाव वाटी चण्याची डाळ, उडीद डाळ आणि मुगाची डाळ घ्यावी किंवा नुसतीच तुरीची डाळ घेतली तरी चालेल. या डाळींना ३-४ तास भिजत घालावे. नंतर नीट निथळून घ्यावे आणि भरड वाटून घ्यावे. वाटताना पाणी घालू नये.
मग जी भाजी घालायची असेल ती २ वाट्या बारीक चिरून घ्यावी...घोळीची भाजी घ्यायची असेल तर १ वाटी घ्यावी, ती जरा बुळचट असते म्हणून...
आता या भेंडक्यांना चटकदार बनवण्यासाठी मिक्सरमध्ये ६-७ हिरव्या किंवा हिरवट-लाल ओल्या मिरच्या, तश्या तिखटपणाप्रमाणे घ्या, कमी झाल्यास वरून ठेचून घालता येतील...तसा थोडा तिखटच छान लागतो + ५-६ लसूण पाकळ्या + १ इंच आले वाटून घ्यावे. यालाही पाण्याशिवायच वाटावे.
१ मध्यम कांदा उभा चिरून...
एका भांड्यात हे मसाला वाटण + वाटलेली डाळ + धणे-जिरे पावडर + मीठ + बारीक चिरलेली भाजी + हळद + उभा चिरलेला कांदा नीट मिक्स करून घ्यावे...मिश्रण खालीलप्रमाणे दिसेल...
मग या पिठाचे हलक्या हाताने गोळे बनवून एका ओलसर कापडावर वाफवण्यासाठी ठेवावे, मी खालीलप्रमाणे एका पातेल्यावर चाळण ठेवून वाफवले होते...वरून झाकण ठेवावे..
अंदाजे २०-२५ मिनीटे वाफवल्यावर ताटात काढून घ्यावे.
आणि कढीसोबत सर्व्ह करावे...खाताना भेंडक्यांना थोडे मोडून त्यांवरून तेल घेतल्यास अजून छान लागते...
जर काही भेंडके उरलेच तर त्यांना दुसर्या दिवशी हाताने मोडून घ्यावे आणि मोहरी-हिंगाची फोडणी मारून मस्त कुरकुरीत करून खावे...मस्त म्हणजे मस्तच लागतात.
वाचने
11842
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
वाफवताना
In reply to वाफवताना by भान
अर्रे
मस्त,
मस्त..
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
हो हो
वा वा! जबरा!!
खल्लास.. !
मुठिया क्लोन
जबरदस्त!!! क
वा वा..खतरनाक
मस्त आणि पौष्टिक
In reply to मस्त आणि पौष्टिक by धनंजय
हेच..! मलाही
In reply to हेच..! मलाही by प्राजु
चॉपर घेऊन यावा म्हणतोय
In reply to मस्त आणि पौष्टिक by धनंजय
फूड प्रोसेसर
In reply to मस्त आणि पौष्टिक by धनंजय
सुगरणींना धन्यवाद
मस्तच ग ...
In reply to मस्तच ग ... by वाहीदा
वहिदा..इकडे
In reply to वहिदा..इकडे by दिपाली पाटिल
धन्यू!!
In reply to धन्यू!! by वाहीदा
चव जमेलच
फर्मास हो
मस्त गं
In reply to मस्त गं by अरुंधती
धन्यवाद
माझी याच पाककृतीची मिसळ्पाववरची लिंक.....
In reply to माझी याच पाककृतीची मिसळ्पाववरची लिंक..... by योगिता_ताई
वा - पण चित्र नव्हते
तसा आइट्म
In reply to तसा आइट्म by मिलिन्द झाल्टे
दिपालीला जसा वेळ मिळाला तस्साच ..
भारतात हल्ली अमेरिके मध्ये