स्त्री - पुरुष यांच्या मूळ लैंगिक प्रेरणांमधे भेद आहे ? ते समजून वाद कसे टाळता येतील ?
काही महिन्यांपूर्वी डिस्कव्हरी वर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती.. त्यामधे दक्षिण भारतातील लंगूर माकड तसेच आफ्रिकेतील चिपांझी इत्यादीच्या नर मादी सहजीवनातील वैशिष्ट्ये दाखविताना तुलना अशी होती की -
१. सामान्यतः कीटकांमधे .. उदा. मधमाशी, मुंगी इ. मधे मादी चे प्राबल्य असून नर मात्र प्रजोत्पादना पुरतेच असतात .. वंश सातत्याची प्रेरणा राखून मादी प्रजोत्पादन व पुढील कार्ये पार पाडते ..
२. दक्षिण भारतातील लंगूर माकड तसेच आफ्रिकेतील चिपांझी तसेच सिंह , हत्ती , गवे इ. मधे एक नर अनेक माद्यांचा सहवास करतो आणी स्वतः चा वंश पुढे चालवतो.... यामु़ळेच कळपातील मु़ख्य नराची जागा जेव्हा दुसरा तरुण घेतो तेव्हा तो पहिल्या नराची लहान मुले मारुन टाकतो (विशेषतः सिंह)... व "मोकळ्या" झालेल्या माद्यांशी सहवास करुन स्वत:ची प्रजोत्पत्ती करवुन घेतो..
यापुढे निवेदकाने मानवांच्या बाबतीत असे भाष्य केले की
जेव्हा एखादी मानव स्त्री योग्य वयात वंशसातत्यासाठी नराची निवड करते तेव्हा तिच्या मूळ प्रेरणा ह्या बाळाला व तिला सुरक्षितता व स्थैर्य कोण देईल अशा मानव पुरुषास निवडण्या कडे असेल तसेच दीर्घ कालीन स्थिर संबंधांची अपेक्षा ती करेल...
या उलट मानवी पुरुषामधे .. (अर्थातच) मर्कटाचे काही अंश असल्याने (Can't Help it !)
पुरुष जास्तीत जास्त ठिकाणी आपले "बीज" कसे पेरले जाईल असा प्रयत्न करेल... (एकोहम बहुस्याम | )
हे पाहिल्या वर साहजिकच पेपर मधील वाचनात येणा-या व समाजात नित्य ऐकायला मिळण्या-या सांसारिक विसंवादाच्या व त्यातून घडणा-या दुर्दैवी घटना.. घटस्फोट .. इत्यादी चे स्मरण झाले....
की वर सांगितलेल्या या स्त्री पुरुषांच्या मूलभूत लैंगिक प्रेरणांच्या भिन्नते मुळे अनेक विसंवाद होत असावेत का ?
आणी जर हे समजून घेतले तर "केवळ शारिरीक संबंधाच्या बाबती मधील हक्काच्या भावने पोटी व त्यास अवास्तव रित्त्या निष्ठा व प्रेम यांच्याशी जोडल्यामुळे विनाकारण वादंग वाढवणे कमी केले तर अनेक संसार सुखी होतील..." असे वाटते ..
अर्थात हे आताच्या आधुनिक काळानुसार . स्त्रियांच्या बाहेर वावरण्यामुळे आता असा समजुतदार पणा पुरुषांनाही दाखवणे भाग पडेल
यावर मिपाकरांची मते जाणण्यास उत्सुक आहे...
वाचने
10212
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
कशालाही
इंग्रजीमध
In reply to इंग्रजीमध by आळश्यांचा राजा
'oversimplification' हा
In reply to 'oversimplification' हा by डावखुरा
हे मूळ
बादरायण
अंशतः
In reply to अंशतः by प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by टारझन
हॅहॅहॅ
छान विचार मांडता तुम्ही.
In reply to छान विचार मांडता तुम्ही. by वेताळ
माणसात व
In reply to छान विचार मांडता तुम्ही. by वेताळ
माणसात व
दूर्दैवाने निसर्गाला समाजाचे नियम समजत नाहीत.
दूर्दैवाने निसर्गाला समाजाचे नियम समजत नाहीत.
आहार निद्रा भय मैथुनं च |
आपल्या कडे
In reply to आपल्या कडे by टारझन
टारझन जी यम -यमी संवाद इन्सेस्ट संबंधाच्या विरोधात आहे...
In reply to टारझन जी यम -यमी संवाद इन्सेस्ट संबंधाच्या विरोधात आहे... by सागरलहरी
त्यामूळे
In reply to त्यामूळे by युयुत्सु
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
In reply to भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास by प्रकाश घाटपांडे
एका
(१) स्त्री
In reply to (१) स्त्री by शुचि
+१
भिन्न लैंगिक प्रेरणा
In reply to भिन्न लैंगिक प्रेरणा by राजेश घासकडवी
फक्त राकट
In reply to फक्त राकट by शुचि
फक्त नाही..
In reply to भिन्न लैंगिक प्रेरणा by राजेश घासकडवी
"त्या
In reply to "त्या by युयुत्सु
सुधारणा
Don't marry & make a woman
वर बौद्धिक