विचार प्रकटन आवडले,असेच वेगवेगळे अनुभव वाचायला नक्कीच आवडेल... :)
(तात्याने हा धागा अजुन वाचला कसा नाही ? तसा साउथ त्यांचा जिव्हाळ्याचा विषय !!! ;) )
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
तामिळ भाषा/संस्कृती अनुभव मजेशीर.इतर सर्व राज्यांच्या तुलनेत मला तामिळ माणसे वागण्यात्/बोलण्यात जास्त प्रामाणिक वाटतात.अर्थात हे generalization झाले पण बर्याच लोकांचा अनुभव तसा असतो.उत्तरेतले लोक overall चालूच असतात.!!
पण वस्तुस्थिती अशी आहे की हिंदी वगैरे शब्दांची मराठीचे नाते आहे तसे इथल्या कुठल्याच भाषेशी हिंदीचे नाते दुरूनसुद्धा नाही
खरे आहे.उत्तर भारतिय भाषांची जननी संस्कृत आहे.दक्षिण भारतिय भाषांची जननी संस्कृत नाही.
भेंडी
P = NP
बाहेरच्या राज्यांचे/परदेशाचे नेहमी आकर्षण वाटत आलय.
तिथं परप्रातियांचे आक्रमण झालंय का?
तेथली स्थीती काय आहे हे वाचायला आवडेल.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
व्वा! वेगळी व मनोरंजक माहिती दिलीत तुम्ही! हे भाषावैविध्य मजेशीर आहे, त्याचा सार्थ अभिमानही आहे, पण आमचीच भाषा लै भारी, लै श्रेष्ठ अशा काटेरी बाण्याचा कंटाळाही आला आहे. त्या त्या प्रांतात ती ती भाषा श्रेष्ठच...तिथून बाहेर पडलात की कोण विचारतो?!!! इतर भाषांचा आदर ठेवला तर ती भाषा शिकायला सोपी जाते. तुम्ही तो प्रयत्न केलेला दिसतोय म्हणून तुमचं अभिनन्दन!
आणि एक विनंती : कदाचित तुमच्या विचारांच्या वेगापुढे कळफलकाचा वेग कमी पडत असेल....पण जरा शुध्दलेखनाकडे लक्ष द्याल का प्लीज? आमच्या डोळ्यांसाठी हो! :-)
सस्नेह
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
चांगले लेखन,"अगदी वाक्यावाक्याशी सहमत" असे म्हणते.
सौधिंडियनांमध्येही तमिळ लोकांचे स्वभाव इतर सौधिंडियनांपेक्षा जास्त कडक असतात असे वाटते. आमची मित्र फॅमिली दर दोन वर्षांनीच चहाला बोलावते. त्यांना मी एकदा सहज म्हटले कि आपण बरेच दिवसांनी भेटलो. तर स्पष्टपणे म्हणाले कि सारखं भेटून तरी काय करायचय? आणि आपल्यालाही ते नॉर्थ इंडियन म्हणतात्....हा अनुभव पुष्कळवेळा आलाय. वेळ पाळण्याच्या बाबतीत तमिळ हे तेलुगुंपेक्षा बरे असतात. मी एकदा दोनेक मिनिटेच ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त थांबले तर तेवढ्या वेळात मैत्रिण शंभरवेळा तरी ,"जा बरं तू, साडेतीनला निघणार होतीस ना?" असं म्हणत होती तेही अगदी कोरड्या आवाजात. आपली जात वगैरे अगदी सहजपणे विचारतात.
अनेक तेलुगु लोक्स (टार्याकडून शब्द उधार)तर ठरलेल्या वेळेच्या एकेक तास उशीरा येउन चेहरे निर्विकार असतात्.....आपल्यालाच लाज वाटते.
रेवती
वाचनीय लेख.
इंग्लिशमध्ये भारतीय भाषेपरत्वे होणारे बदल पाहणे हे फार मजेशीर आहे.
कन्नडिगाही T आणि Th हा घोळ घालतात.
इलेव्हन ला लेव्हन म्हणतात आणि तुम्ही जर इलेव्हन म्हणायला गेलात तर Its levan not elevan असेही म्हणतात.
H हे अक्षर "ह" साठी वापरत असल्याने एच म्हणण्याऐवजी हेच्च म्हणणे हे बहुदा त्यांचे mnemonics असावे.
स्ट्रेट ला स्ट्रेयैट..
आय.एस.डी ला ऐ.एस.डी
बँक ला ब्यांक..इ.इ.
माझा अनंत नावाचा मराठी सहकारी त्याच्या नावाचे "Ananth" असे बारसे केल्यामुळे जाम खवळला होता.त्याने जेव्हा त्याच्या नावातुन शेवटचा "h" काढायला सांगितले तेव्हा Admin मधला कन्नडिगा म्हणाला की तुझे नाव अनंट आहे का अनंत.?
---------------------------------------------------टार्झनं प्रथमं वंदे तात्यां तदनन्तरं |महादेवस्य दर्शनं पूर्व नंदीं दर्शनं यथा||
एकदा एक पंजाबी सरदारजी तमिळनाडुमधे जातो कामानिमीत्त..त्याला बघुन तमिळी एकदम कुठला प्राणी आलाय चुकुन इकडे अश्या नजरेने त्याच्याकडे बघत असतात. तो ज्याम वैतागलेला असतो.
त्याला घंटा काय वाचता येत नसते..म्हणुन तो कसे बसे दिवस ढकलत असतो.
एकदा एक तमिळी माणुस धीर करुन त्याच्याशी बोलायला येतो. त्यांचा संवाद..
तमिळी: तमिळ्ल तिरीम्मा? (तिरीम्मा - येतं का? या अर्थी)
सरदारजी: (गप्प..फक्त एक लुक..)
तमिळी: तमिळ्ल तिरीम्मा?
सरदारजी: (गप्प..फक्त एक तिरसट लुक..)
तमिळी: तमिळ्ल तिरीम्मा?
सरदारजी: (गप्प..फक्त एक रागिट लुक..)
तमिळी: तमिळ्ल तिरीम्मा?
सरदारजी: ओय...तमिळ तेरी माँ तो पंजाब तेरा बाप !!!!
विजुभाऊ... दक्षिण भारतातील असे काही किस्से असतील जरा आम्हालाही सांगा...जरा करमणुक होईल...माझ्या वैयक्तिक मते..दक्षिण भारतातील एकच जमात मला आवडत नाही (किंवा मी स्वतः लांब रहातो) ती म्हणजे गुलटी....
- वा
ह्म्म, भाषेचा चांगला आढावा घेतलाय.
गुजराथी लोकांचं पण इग्लीश समजून घ्यावं लागत.
आमच्या घराजवळ रहाणारी एक बेन परवा माझ्याशी बोलत असताना म्हणाली "दॅट मेन वोज आस्कींग अबाऊट आवर लोन"
क्षणभर काही संदर्भच लागेना. मग कळले की ती वेड्या वाकड्या वाढलेल्या 'लॉन' बद्दल सांगत होती.
अॅ चा उच्चार ते ए आणि ऑ चा ओ करतात. स्मोल, होल , देन (दॅन ), टोल, मोल, असे कितीतरी.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
श्री विजुभाऊ, लेख वाचनीय झाला आहे पण लेबले लावणे तुम्हीही सोडलेले नाही.
मग आपण आपले ठरवतो अमूक भागातले लोक अमूक प्रकारचे असतात
त्यानंतर मात्र
उत्तरभारतीय पंजाबी माणूस एकदम मोकळाढाकळा वागतो. तो पटकन एखाद्याशी जवळीक साधतो. पटकन कोणाशीही चहा, खाना ,खिलाना वगैरे ची ओळख करून घेतो. थोड्याच वेळात एकदम फार जुनी दोस्ती असल्याप्रमाणे सलगी दाखवायला लागतो
मद्रासी लोक एकदम या विरुद्ध.. पटकन मोकळे होत नाहीत.
कारन एकदा एखाद्या संस्कृतीला लेबल चिकटवून मोकळे झालो की आपण त्याचे पुरावे जमा करायला लागतो आणि ते इतराना पटवून द्यायला लागतो
तुम्ही काही लोकांना पाहून तुमचे मत ठरवून टाकले आणि आता आम्हाला सांगून त्याचा प्रचार सुरू केला आहे. शेवटी तुम्ही लेबले लावण्याच्या वृत्तीस बळी पडलेले दिसत आहात.
लेख आवडला.
अल्टीरीअर मोटीव्ह ला इन्टीरीअर मोटीव्ह म्हटलं चुकून. नशीब फक्त नवर्यापुढे ते झालं. मग नवरा चिडवायचा सारखा [(
मग एके दिवशी नवरोबांची ही अशीच मराठीत चूक झाली. तो फोनवर म्हणाला आज होळी पोर्णिमा आहे उद्या "रंगपंचमी" ....... ही ही ही आम्ही लगेच खदखदून हसून घेतलं आणि वाभाडे काढले.
मग फिट्टमफाट परत नो चिडवाचिडवी B)
दक्षिणेचे मिशीप्रेम यावरही लिहा ना विजुभौ.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
प्रतिक्रिया
विचार
मस्त
बाहेरच्या
लेबलं...
छान
खुप छान
प्रकटन
मस्त
व्वा!
मस्त लेख
चांगले
आवडले
वाचनीय
तमीळ जोक....
ह्म्म,
@
वाचनीय पण विरोधाभास
मस्त!
लेख
दक्षिणेचे