भरलेले पडवळ
सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.
तसं पाहता पडवळाला नाकं मुरडणारेच जास्त दिसतील पण ही खास माझ्या सासूबाईंची भरलेल्या पडवळाची पाककृती...एकदा तरी करून पाहाच ... आवडणार नाही अस्सं होणारच नाही... सोबतीला सायीचं दही असेल तर काय सांगूच नका.
या पाकृसाठी अगदी लहान लहान नाजूक पडवळ निवडावेत...भारतातले अगदी मस्त असतात...अमेरिकेत बर्याचदा कडू निघाले होते तेव्हा जरा बघून घ्यावेत ...जर लहान पडवळ असतील तर पडवळ उकडून घेतले नाहीत तरी चालेल पण जरा जून किंवा जाड साल असलेल्या पडवळ साफ करून २-२ इंचाचे तुकडे करावे आणि पडवळांना फोर्कने २-३दा टोचून घ्यावे. आता या पडवळांना थोडं मीठ घालून उकडून घ्यावे, नंतर १०-१५ मिनिटे चाळणीत निथळत ठेवावे. अर्धा किलो पडवळ ४-५ लोकांना पुरतं.
यासाठीचं सारण दोन प्रकारे बनतं एक असतं बेसनाचं आणि दुसरं दाण्याच्या कुटाचं...पण आता मी तुम्हाला बेसनाचे सारण भरून केलेल्या पडवळाचे फोटो आणि पाककृती सांगणार आहे. पुढे कधीतरी दाण्याच्या कुटाच्या पडवळाचा फोटो आणि पाककृती टाकेन.
तर या बेसनाचं सारण बनवायचं कसं???
अर्धा किलो पडवळासाठी १ ते दीड वाटी बेसन घ्यावे, त्यात चवीनुसार तिखट (अंदाजे २ चमचे),गरम मसाला (१ चमचा) आणि मीठ घालावे. या मिश्रणात एक लहान चमचा हळद, १ टेबलस्पून धणे-जिरे पावडर आणि २ चमचे तेल घालावे...आवडत असल्यास १ चिमूट ओवा+ १ चिमूट जिरे घालावे... आता हे मिश्रण हाताने सारखे करून घ्यावे आणि याचे अंदाजे पडवळाच्या तुकड्यांएवढे गोळे करून घ्यावेत...बेसनाचे सारण तय्यार आहे.
पडवळाच्या तुकड्यांमध्ये हे बेसनाचे सारण भरून घ्यावे...पण एखाद्-दोन चमचे सारण बाजूला काढून ठेवावे, सगळेच वापरू नये.
आता १ चमचा तेलात जिरे-मोहरी-हिंगाची फोडणी द्यावी आणि त्यात हे सारण भरलेले पडवळ सोडावे आणि छान खरपूस परतून घ्यावे...पडवळ झाल्यानंतर त्यात बाजूला ठेवलेले सारण घालावे आणि ५-७ मिनिटे परतावे...तसा पडवळाला खरपूस होण्यास जरा वेळ लागतो...अंदाजे ३०-३५ मिनिटे...
कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
वाचने
9815
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
दिपाली,
पडवळाला
In reply to पडवळाला by गणपा
गणप्या...
मस्त पाकृ
In reply to मस्त पाकृ by रेवती
शंका:
In reply to शंका: by दिपाली पाटिल
कधी
फोटो
मस्त..
सुरेख
जबरदस्त!! प
फोटोवरून
In reply to फोटोवरून by पक्या
स्नेकगोर्ड
...
स्नेक गोर्ड
अग दिपाली,
In reply to अग दिपाली, by चित्रादेव
अगं चित्रा
मस्तच!!!!!!!!!!!!
पडवळ
मस्त