डिस्क्लेमर्सः
१. कृपया ह. घेणे नाहितर जोडे तयार आहेत.
१.अ. कुणाचे जोडे तयार आहेत हे विचारू नये, अपमान होईल.
२. सदर विडंबन हे विरंगुळा म्हणून लिहीले आहे. वरचे दोन शब्द काही लोकांच्या नजरेआड जाण्याची शक्यता आहे म्हणून हे ही लिहीले आहे.
२.अ. प्रेरणा ... लिहायलाच हवी का? बरं, वाङ्मयचौर्याचा आळ नको, ही घ्या.
३. नीरजाकडून एक कल्पना (न विचारता) उधारीवर आणली आहे, तिचे आभार.
४. सदर विडंबन आम्हाला आव्हान देणार्या श्री.श्री. राजेशबाबा पूजावाले घासकडवी यांना सादर समर्पण!
साल २११०
गणेशचतुर्थी हा जागतिक मिपा दिन म्हणून जगभरात साजरा केला जातोय.
विविध फतव्यांच्या चर्चा होताहेत. प्रस्थापितांविरुद्ध जास्तीत जास्त बोलले म्हणजे मिपा दिन खऱ्या साजरा झाला असे समजले जात आहे. पण, प्रस्थापित हे नव्यांचे कधीच शत्रू नव्हते, नाहीत आणि यापुढेही नसणार आहेत.
नव्यांचे खरे शत्रू नवे(पण)च असते.
नव्यांचे एकमेकांतील नातेसंबंध बघितल्यास असे दिसून येते की, नवे-नवे, नवे-संपादक, नवे-मालक... याप्रकारची नाती सगळ्यात बदनाम नाती आहेत. टोकाच्या शत्रूत्त्वाची नाती आहेत.
धागे लिहून संपादन सांभाळणाऱ्या संपादकाला "समजून न घेणारा" हा नवाच असतो. प्रस्थापित किंवा टारझन नाही.
हा जर प्रस्थापित-नव्या सदस्यांचा वाद मानला, तर मग मालक-प्रस्थापितांचे ही एकमेकांशी का पटत नाही? ते तर एकाच काळातले आहेत.
तसेच प्रस्थापित हे नव्यांकडे टार्गेट म्हणून बघतात अशी ओरड केली जाते. ते खरे नाही. नवेच बऱ्याच अंशी याला जबाबदार आहे. धागा क्षेत्रात लेख लिहीताना नवेपणाच्या आधारे नवे आपले एकोळी धागे पाडून टाकतात, प्रतिसाद पदरी पाडून घेतात. खरडफळ्यावरचे प्रस्थापितसुद्धा लाजतील अशा खरडी नवे एकमेकांना आणि धागे मुख्य पानावर लिहीत असतात.
नवेच स्वत:ला अशा पद्धतीने पेश करत आहेत की प्रस्थापितांचा दृष्टीकोन हा टवाळीचाच राहील!!
प्रतिसाद मिळतात म्हणून नवेच एकोळी धागे टाकतात, निरर्थक खरडी टाकतात. त्यांना नको असेल तर ते असे टवाळखोर धागे नाकारू शकतात. असे टवाळ्खोर प्रतिसाद थांबवायचे असतील तर कोणत्याच नव्या-जुन्याने अशी प्रलोभने/धागे/खरडी नाकारल्या पाहिजेत. नाहितर याला दुटप्पीपणा किंवा दांभिकपणा म्हणावे लागेल. कारण आपल्याला वाटेल तसे स्वैर वागायचे आणि काही झाले की प्रस्थापित आणि कंपूबाजीला दोष देवून मोकळे.
आणि प्रत्येक क्षेत्रात प्रस्थापितांच्या बरोबरीने समानता पाहिजे आणि आरक्षण पाहिजे. समानता पाहिजे असेल तर मग नवे आहेत हे बोलायला कशाला हवे? कारण फतव्यांबाबतही असमानता आहे. सगळे फतवे आवडीच्यांच बाजूने आहेत.
फतव्यांमुळे आजकाल असे झाले आहे की, एखादा कंपूत विचारी आणि टवाळ सगळेच लिहीणारे, तर एखाद्या कंपूबाहेरच्या एखाद्याचे बरेच प्रतिसाद गायब. प्रतिसाद उडवताना संपादकांनी हा विचार जरूर करावा.
मिपादिनानिमित्त नव्यांनी प्रस्थापितांचा विचार करावा आणि प्रस्थापितांवरचा अन्याय दूर करावा.
वाचने
5721
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
count = count +
कीड आणायची नाही ...
लै भारी
In reply to कीड आणायची नाही ... by परिकथेतील राजकुमार
घोळात घोळ!
चांगले विडंबन / विरंगुळा
हाहाहा!!!
___/\___
दोन्ही
In reply to ___/\___ by राजेश घासकडवी
भौतेक
In reply to दोन्ही by मेघवेडा
आली की नाय
In reply to भौतेक by राजेश घासकडवी
असतील
In reply to भौतेक by राजेश घासकडवी
अनुभव हाच मोठा गुरु आहे
In reply to भौतेक by राजेश घासकडवी
चालुद्या
आहे हे असं
टी आर पी चा खेळ?
अरुण मनोहर जी
In reply to टी आर पी चा खेळ? by अरुण मनोहर
हॅहॅहॅ
मस्त मिसळ आहे
अदितीबै,
आहे हे
आपल्याबरो
ते बोलणे
In reply to आपल्याबरो by मंगेशपावसकर
निळ्या !
In reply to ते बोलणे by Nile
मुसुशेठ,
In reply to निळ्या ! by मुक्तसुनीत
सिनिअर
In reply to निळ्या ! by मुक्तसुनीत
मार्गदर्शन
In reply to निळ्या ! by मुक्तसुनीत
नवीन लेख
In reply to मार्गदर्शन by ३_१४ विक्षिप्त अदिती
DNT BE NOW ITS BETTER
In reply to मार्गदर्शन by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा