आम्ही आधी ही स्पर्धा की काय आहे ते अजिबात पाहत नव्हतो...पण गेले पाच सहा भाग आम्ही घरच्या मंडळींच्या आग्रहाखातर पाहिले...
जूरींनी एक वाक्य बोलायचे, महागुरूंनी स्वत:च्या कौतुकाची २० वाक्ये बोलायची आणि बान्देकरांनी निरर्थक १५ वाक्ये बोलायची, मधून मधून डान्स...असा हा कार्यक्रम आहे...
सचिन यांच्या चित्रपटातील अभिनय , दिग्दर्शन कौशल्याचा पूर्ण आदर ठेवून ( 'अशी ही बनवाबनवी'चे आम्ही प्रचंड फ्यान आहोत आणि राहू...)आवर्जून सांगावेसे वाटते की सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून??? )एखाद्या कलेमध्ये आयुष्यभर कष्ट काढले तरी लोक स्वतःच स्वतःला महागुरू म्हणवायला घाबरतील... ( इथे तर काय, सतत महागुरु आले, महागुरू गेले, महागुरु उठले , महागुरु बोलले, महागुरूंनी कौतुक केले...)हा माणूस नृत्यामधला महागुरू ?? बासच...
स्वत:च प्रोड्यूसर आणि स्वत:च डिरेक्टर असताना त्याच शो मध्ये स्वत:चे इतके कौतुक करून घेण्याचे कारण मला कळत नाही.... यांना कोणी मराठी थोर नृत्यदिग्दर्शक किंवा नर्तक मिळाला नाही काय???( आहेत , काही जूरी आहेत...असून नसल्यासारखे ... त्यांच्या कॉमेंट्स एका वाक्यात गुंडाळायला लावतात...)
आणि महागुरु स्वतः मात्र प्रत्येक कॊमेन्ट मध्ये प्रचंड फ़ूटेज खातात, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे बघत एक वाक्य बोलून टाळ्या वाजेपर्यंत थांबणार, मग त्या कस्टमरी टाळ्या वाजणार, मग महागुरू पुन्हा ऐटीत डावीकडे उजवीकडे पाहणार, मग म्हणणार, " ..नाही , म्हणजे मला डीटेल्स कळत नाहीत, पण तू अन्तर्याच्या सुरुवातीला एक स्टेप मिस केलीस आणि विसरलीस , ऎम आय राईट?? " मग पुन्हा डावीकडे मग उजवीकडे लूक.... पुन्हा टाळ्या....
मग ..." मी जेव्हा बाईच्या वेषात डांस केला होता तेव्हा ....." ही ष्टोरी सांगून सम्पली की ..." कारण स्त्री ही देवतेसारखी असते , नारीची पूजा केली जाते तेथे ...." छापाची वाक्ये ..मग पुन्हा टाळ्या....पुढल्या वेळेला त्यांच्या लहानपणाची गोष्ट...टाळ्या टाळ्या....
ज्याची बॅट आणि बॉल असतो तो पोरगा तीन चार वेळा आउट होउनही परत बॅटिंग करतोच, तसं वाटतं हे पाहताना....
बान्देकरांचे एक कौशल्य बाकी मस्तच आहे, ते जोक करायचा प्रचंड प्रयत्न करतात....पन्धरा वीस प्रयत्नांनंतर त्यांना दीड तासांत एखादा जोक जमून जातो...काय चिकाटी आहे...!!! त्यांच्या जोक वरचे हशे एडिटिन्ग मध्ये इन्सर्ट करावे लागत असणार...बर्याचदा वाक्यरचना चुकल्यामुळे आणि टायमिंग चुकल्याने त्यांचे जोक फ़सतात, आणि स्पर्धकाला कसनुसं हसावं लागतं. ( ते तरी काय करणार बिचारे?) त्यांचे फ़सलेले जोक एडिट का करत नाहीत?? इतके जोक फ़सतात की एडिट तरी किती करणार म्हणा...( सचिन ने बान्देकरांचे कॉमेडी टायमिंग बद्दल क्लासेस घ्यावेत)...हा व्यवस्थित स्क्रिप्ट नसल्याचा परिणाम आहे... ( ऐन वेळी होते ती फक्त फजिती... पी .एल.)
पुढल्या वेळी सचिन आणि बान्देकर या दोन मंडळींनाच या स्पर्धेतून हाकलले तर स्पर्धा अधिक प्रेक्षणीय होईल....
कोण स्पर्धक आला आणि कोण गेला, कसा नाचला, यात आम्हाला स्वारस्य नाही परंतु या कार्यक्रमामुळे सचिन यांच्याबद्दलचा आदरभावाला धक्का निश्चित लागला....
वाचने
32156
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकापेक्षा एक
....हा माणूस
In reply to एकापेक्षा एक by इनोबा म्हणे
त्यापेक्ष
बाजार भरवला आहे प्रत्येक गोष्टीचा.
अत्यंत फालतू कार्यक्रम!
अगदी बरोबर
In reply to अत्यंत फालतू कार्यक्रम! by विसोबा खेचर
धन्यवाद
In reply to अत्यंत फालतू कार्यक्रम! by विसोबा खेचर
समाजाचे रंडीकरण
In reply to अत्यंत फालतू कार्यक्रम! by विसोबा खेचर
सचिन
'नवरा माझा
In reply to सचिन by मनस्वी
सचिन..
हल्ली कोठे
सुन्दर
सुप्रिया...
In reply to सुन्दर by नसनखवडी
अरेच्च्या...
In reply to सुप्रिया... by प्रभाकर पेठकर
अवांतर! :))
In reply to सुन्दर by नसनखवडी
जळके बिब्बे
In reply to अवांतर! :)) by विसोबा खेचर
.
खर॑
आम्ही तर
In reply to खर॑ by धमाल मुलगा
मिसळपाव
In reply to आम्ही तर by भडकमकर मास्तर
सहमत....
वर्षानुवर
In reply to सहमत.... by अभिज्ञ
मस्त लेख लिहला आहेस ...
मी एक
In reply to मस्त लेख लिहला आहेस ... by छोटा डॉन
शाल जोडीतले..
सहमत..
In reply to शाल जोडीतले.. by डॉ.प्रसाद दाढे
उपलब्ध
In reply to शाल जोडीतले.. by डॉ.प्रसाद दाढे
तात्या..
तात्या म्हणतात तसे
एक सत्यघटना..
In reply to तात्या म्हणतात तसे by डॉ.प्रसाद दाढे
एक म्हण
In reply to एक सत्यघटना.. by विसोबा खेचर
आजकाल
In reply to तात्या म्हणतात तसे by डॉ.प्रसाद दाढे
मर्दा जिन्कलस!
केर्सी लॉर्ड
तळमळ
एका पेक्षा एक
ठण्ण्ण्ण्
In reply to एका पेक्षा एक by उच्चैश्रवा
खर॑ आहे
सचिन - आदेश
च क्क्क्क र
In reply to सचिन - आदेश by आंबोळी
सगळे आधी
In reply to च क्क्क्क र by मनस्वी
चिमणी....?
In reply to सचिन - आदेश by आंबोळी
चिमणी
In reply to चिमणी....? by मनस्वी
बांदेकर
In reply to चिमणी by आंबोळी
सुरेख महागुरू
सहमत...
In reply to सुरेख महागुरू by भडकमकर मास्तर
नाच कमी रडण जास्त
सचिन - आदेश
परवा कोण
ही सगळी
In reply to परवा कोण by भडकमकर मास्तर
एक सोप्पा उपाय