Skip to main content

काय जेवलात?

लेखक मनस्वी यांनी शुक्रवार, 04/04/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी विचित्र विषय वाटतोय ना? तर सांगायचे आहे की आज सकाळी / रात्री तुम्ही काय जेवलात. जेवण कोणी बनविले / कुठे जेवलात हे सांगायचं की नाही ही तुमची मर्जी. त्यायोगे कळेल, मिसळपावकरी पौष्टीक आहार घेतात की नाही. किंवा आपल्यालाही निरनिराळे पर्याय माहित होतील.

वाचने 31270
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by एक

निबंध लिहायला हरकत नाही. नीट जमला तर ठीक आहे नाहीतर गुरूजी द्यायचे अजून एक ............'भोपळा'. आणि छडी घेऊन मागे लागले तर म्हणावे लागेल 'अरे! भोऽऽऽ पळा......'

भेंडीची भाजी, पोळ्या, फ्लॉवर बटाटा, कांदा, सिमला मिरची रस्सा.. उरलेल्या पोळ्या आज डब्यात..रात्री काय करावं प्रश्न पडलाय्...एवढ्या रेसिपी दिसतायत एखादी करेन म्हणते...भाकरी खायचा किती मूड आलाय पण इथलं पीठ इतकं जुनं असतं भाकर्‍या तुटतात्..त्यात कणीक पण घालून पाहीली तर्री तेच.... भाकरी, वा.ग्याची भाजी, डाळि.ब्यांची उसळ, खूप वाट्या ताक.... ह्यावर्षी भारतात गेल्यावर खायच्या गोष्टींची यादी करतेय.....इथे तिथल्यासारखं ताक बनवता येईल का घरी? अवांतरः म्हशीच्या गोठ्यातून आणलेल्या दुधाचं आणि गोकुळच्या दुधाचं ताक वेगळं लागतं त्या गोठ्यातल्या दुधाच्या केलेल्या ताकाची चव अप्रतिम ती कशालाच येत नाही....

मी भारतात गेल्यावर पहिले १० दिवस मस्त पैकी गरम गरम तांदूळाची/ज्वारीची भाकरी आणी घट्ट दही... त्यासोबत लसूण चटणी आणि मस्तपैकी आईच्या हातची भरल्या वांग्याची (हिरव्या)भाजी ... हेच खाणार आहे. नंतरचे काही दिवस.. आमरस आणि पोळी.... पोळी आणि आमरस... सगळ्या परदेशस्थ मिसळपावकरांच्या नावनेही खाईन आमरस. ... आठवण काढत काढ्त. मग कोकणांत जाणार आहे. आणि तिथे आत्याच्या घरच्या डाळींब्यांची उसळ, घरच्या फणसाची .. घरचाच नारळ घालून केलेली भाजी.. घरच्याच कोकमचं सरबत. आणी पुन्हा घरचेच हापूस आंबे...तेव्हाही तुम्हां सगळ्या मंडळींची आठवण काढेन हो...! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

खरं तर.. पुण्यात मी १४ एप्रिल ला पोहोचेन. तेव्हा प्रभाकर पंत तुमची गाठ घेण्याचाही विचार आहे.. बघू कसं काय जमतं ते.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

झासी रस्सा --दुपारचा कमळ काकडिची सुखी भाजी --रतलाम शेव -चविला पराठा .नो भात

आज मस्तपैकी कोंबडीचा रस्सा (थोडा ति़खट) व भात असा मेनू झाला.. आता स्वयंपाक जमायला लागलाय.. प्रशांत.

आम्ही आपले आज कसाबसा टेंपूरा ( पिठीसाखर घातलेली कोलंबीची भजी), सुशी (कच्चा मासा, कुठ्ला होता देव जाणे!) आणि ढिकळं असलेला भात खाल्ला!! नशीब गां* तो क्या करेगा पांडू?:)) -डांबिसकाका

आम्रखंड आणि गुलाबजाम खाल्ले आज.....आता फार झोप येतेय...

केळं घालून शिरा केलेला. आणि शुक्रवारी चिकन शोरबा, चिकन रेशमी कबाब, चिकन ढाबा, मुर्ग मलई. :)

मी आज एक कप नूडल्स आणि रस्त्यावर बनवलेला अंडा पराठा खाल्ला. इथे चीनमधल्या छोट्या गावात ना Mcdonalds ना ऊडूपी!! आणि मा़झी चिनी हाटेलात जायची हिम्मत नाही होत बाबा! आता पुढच्या रविवारी घरी जाऊन (माझ्या) बायकोच्या हातची भाजी भाकरी खाईन.

खास आग्री पेशल काळ्या खेकड्याचा रस्सा आनी मऊ मऊ तांदळाची भाकरी. प्रियाली

In reply to by नसनखवडी

खास आग्री पेशल काळ्या खेकड्याचा रस्सा .... पाककृती द्या कीऽऽ! आग्री पाकसिद्धीबद्दल मनात बरेच कुतुहल आहे. ठाणे - घोडबंदर रस्त्यावर 'आग्री फुड' अशी पाटी जाता-येता दिसते. पण अजून योग आला नाही. असो. पाककृतींच्या प्रतिक्षेत.

झकास ! मिसळ खाल्ली यंदा कोकणात................ ऐका धरगुती समारंभा करीता रत्नागिरीला जाण्याचा योग आला तेव्हा आमचे खवैये काका आम्हाला सकाळी सकाळी मिसळ खायला घेऊन गेले राधाकृष्ण सिनेमा समोर.........गांधीची मिसळ.........दत्त कॅफे, रत्नागिरी....्ई मिसळ सोडू नकाच बाकी जेवायला म्हणाल तर मोदक, बटाट्याची सुकी भाजी, पुरी आणि........वरण भात (माझे आवडते पदार्थ) बाकी बरचं काही होत आणि खाल्लं पण .............यावर ताव मारला खवैया - आर्य