>>पहिल्यांदा ऐकतोय
सहमत आहे. शब्द पहिल्यांदाच ऐकतोय.
आपल्याला हवा असलेला शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी 'मराठी शब्दरत्नाकर' उचकून पाहिला. पण शब्दाचा अर्थ काही सापडला नाही राव. क्षमस्व. :(
उद्या नव्याने प्रयत्न करुन पाहीन. फक्त या शब्दावर आपण का अडलात ? कशासाठी त्या शब्दाचा अर्थ शोधत आहात ? का उगाच आम्हाला कामाला लावत आहात, जर खुलासा झाला तर बरं वाटेल. :)
-दिलीप बिरुटे
दातार वाक्य द्या ज्यात हा शब्द वापरला आहे.
असं काही आहे का - तो वितांशक वृतीचा होता.मी म्हणेन ते विध्वंसक च्या जागी चुकून पडलय.
तसं असेल तर टारगटांच्या भाषेत सांगायचं झालं तर "पब्लीक का उगा टिपर्या बडवून राहीलय" ...... सोडा ना राव.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
आमच्या एका फॅमिली फ्रेंडना त्यांच्या मुलाचे थोडे "ऑफबीट" नाव ठेवायचे आहे. त्यासाठी त्यांनी हा शब्द निवडला. पण त्याचा अर्थ काय हे काही केल्या सापडेना. म्हणून मी इथे पोस्ट टाकली.
असो. बघा सापडतोय का काही अर्थ ते! 8>
नावाची निवड मात्र दाद देण्याजोगी आहे राव! हे बरंय .. आधी नाव निवडा मग अर्थ शोधा?? चायला भलता काही अर्थ निघाला झाल्या?? पोराच्या भवितव्याचा प्रश्न आहे!!
कशाला नस्ते उपद्व्याप.. उद्याच्या जमान्यात त्या पोराला तरी त्याचं स्वतःच नाव असं 'ऑफबीट' (खरंतर विचित्र!) असलेलं आवडेल का हो?
-- विध्वंसक.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
नावच "ऑफबीट" असं का नाही ठेवत? :? (ह.घ्या.)
----------------------------
मोल्सवर्थ शब्दकोषात सगळ्यात जवळचा शब्द सापडला तो "वीतशंक" असा आहे.
वीत - ह्या शब्दाचा एक अर्थ 'च्या पासून दूर गेलेला' असा आहे - वीतराग (हे महावीराचं एक नाव आहे - रागापासून दूर गेलेला, रागाव्र विजय मिळवलेला), वीतभय, वीतशोक इ. नावे आढळतात.
त्या अनुषंगाने वीतशंक - म्हणजे जो नि:शंक आहे असा अर्थ असावा. चूभूदेघे.
चतुरंग
आमच्या एका ओळखीतल्यांना पण असेच ऑफबीट (संस्कॄत) नाव ठेवायचे होते मुलाचे. त्यांनी शैवल हे नाव निवडले. नंतर त्यांना समजले की त्याचा अर्थ शेवाळ असा आहे मग दुसरे साधे सरळ नाव शोधले.
आपल्या मित्राचे असे होऊ नये. तसेही वितांशक चा अर्थ काही ही असला तरी (चांगला / वाईट) नाव मात्र कानाला अजिबात गोड वाटत नाहीये. विद्वंसक , विनाशक , विघातक अशा पठडीतला शब्द वाटतोय.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
एकांनी कृतांत नाव ठेवलं. बारशाच्या वेळीच लोकांच्यात दबकत कुजबूज सुरू झाली. ते यमाचं नाव हे आईबापांना नक्की कोणी सांगितलं कळलं नाही. पण सगळ्यांना एकदम फार्मल धन्यवाद पत्रिका गेली व धन्यवाद करणाऱ्यात पोराचं नाव कृतार्थ होतं. (म्हणजे, तुमचीच ऐकण्यात चूक झाली बरंका...)
राजेश
काय आहे , आज काल हमदो हमारा एकच असल्याने आई-बापाकडे असल्या (नाव ठेवायच्या) गोष्टींसांठी भरपुर वेळ असतो. पुर्वी बघा १०/१२ पोर असायची एक जोडप्याला, वेळ असा मिळायचाच नाही फालतु गोष्टींसाठी.. लै बिझी असायची राव कामात
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
वितांशक हे नाव एखाद्या काढ्यासारखे वाटते
वितांशक चुर्ण वितांशक वटी अस काहिसं ...
अर्थ शोधत बसण्या पेक्षा या नावाचा काढाच काढावा .......
म्हणजे नन्तर वितांशक = ( विता (विटामिन चा) अंश वाढ्वणारे ऑषध असा होइल )
चु भु दे घे
प्रतिक्रिया
पहिल्यांद
>>पहिल्यांद
पहिल्यांद
हॅहॅहॅ ..
"वितांशक"
दातार वाक्य द्या
आमच्या एका
नावाची
त्यापेक्षा
किंवा वीतांशक
अग्गोबाई
सहमत
वितांशक हे
नांव
गप गुमान सोप नाव ठेवा म्हनाव...
'वित्या' तरी ठीक आहे
आमच्या एका
कृतांत
आता संन्यास घ्यायला मोकळे
हा हा
शाहरुख भाई
वितांशक
एकाच वेळी
गुड वन
वितांशक हे