Skip to main content

लावणी - खास होळी निमित्त

लेखक sur_nair यांनी रविवार, 28/02/2010 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
गेली संक्रांत आली बाई होळी हो नाही काही तुमचा पता कुणासंग पंचीम रंगाची मी खेळू हो सन भाग्याचा, आहे फार मोठा घरला या धनी, राग आता सोडा तुम्हांसाठी केली, पुरणाची पोळी हो दिस उन्हाळी, सोसवेना उन किती पुसावं, घामाघूम अंग आग लावी राती, चंदनाची चोळी हो तुमच्याविना शेज, सुनी सुनी लागे विझली होळी अन, राख उरं मागे, रोज खुणविते, चंद्रकोर भाळी हो ही लावणी मीराबाईंच्या " केनो संग खेलू होरी, पिया त्यज गये है अकेली" या वरून स्फुरली. चाल स्वरचित पुरिया धनश्री वर आधारित.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1615
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

शाहिर, मस्त हाय ह्ये कवन बरं का. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

छान बरंका जय महाराष्ट्र , जय मराठी !