Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Sun, 02/28/2010 - 23:26
  • Log in or register to post comments
  • 8912 views

प्रतिक्रिया

Submitted by पाषाणभेद on Sun, 02/28/2010 - 23:40

Permalink

हे काय

हे काय नविनच बाई. केळीचं शिक्रण र्‍हायलंय की! आम्हाला तर इंटरनेट शिवाय झोपच येत नाही. पक्षी इंटरनेट असेल तर आम्ही झोपतच नाही म्हणा. अन तरीही मिसळपाव सारखे मराठी संस्थळ असेल तर झोप कुणाला येणार? ह्हो की नाही?इतके चांगले स्थळ कोणी सोडेल का? Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 02/28/2010 - 23:42

Permalink

हॅहॅहॅ ..

हॅहॅहॅ .. अणुष्का मॅडम आणि अनुषंगाने येणारी अजुन एक गोष्ट दिसली नाही मालक वरच्या लिष्ट मधे ! असो .. "जिवणाश्यक" नसेल :) आमच्या "जिवनावश्यक" गोष्टी भरपुर आहेत :) असो .. त्यातली मिपावर मनसोक्त दंगे करणे ही एक ;) - (ललनाप्रेमी) टारोबा ##र
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 02/28/2010 - 23:57

In reply to हॅहॅहॅ .. by टारझन

Permalink

हॅहॅहॅ ...

हॅहॅहॅ ... तोतापुरी आंबे .. हे राहिलंच की :) तोतापुरी आंबे आम्हाला जिवनावश्यक जिवनाश्यक वाटतात.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 03/01/2010 - 19:55

Permalink

माझे सप्तरंग

(१) गाणी (२) कविता (३) सुगंध (४) देवपूजा (५) आकर्षण (६) पुस्तकं (७) वीकांत ता. क. - कुटुंब घातलं नाहीये कारण ते फक्त "या" जीवनाची आवश्यक "गोष्ट" नसून, इट इ़ज द व्हेरी फायबर ऑफ माय बीईंग ...... ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 03/01/2010 - 09:21

Permalink

लिष्ट

भारतीय संगीत कुठलाही गोड पदार्थ कविता, साहित्य, मैफिली वर्तमानपत्र टीका करणे समविचारी असतील तर भरभरुन बोलणे अन्यथा मौन हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Mon, 03/01/2010 - 09:55

Permalink

१. मित्र. २.

१. मित्र. २. पुण्यातील घर. ३. आंतरजाल. ४. घरचं जेवण. ५. पुस्तकं. ६. जगजीत सिंग. ७. तिच्या रम्य आठवणी. ८. महिन्यातुन एकदा दारु.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 03/01/2010 - 13:20

In reply to १. मित्र. २. by Dhananjay Borgaonkar

Permalink

७. तिच्या

७. तिच्या रम्य आठवणी.
क्या बात है..!
८. महिन्यातुन एकदा दारु.
हे मस्त! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Mon, 03/01/2010 - 10:11

Permalink

आहार,

आहार, निद्रा, मैथुन तंबोरा, पुस्तकं इंटरनेट युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 03/01/2010 - 10:19

Permalink

अत्यावश्य

अत्यावश्यक गोष्टी - बॅडमिंटन खेळणे. वारंवार डोंगरात भट्कणे.(गेल्या साताठ वर्षांनधली सवय.) नाक्यावर टवाळक्या करणे. मित्र आणि कुटुंब. तोंडी लावण्याकरता पण अत्यावश्यक नाहीत अशा गोष्टी - लिखाण आणि वाचन. मिसळपाव. दारु आणि सिगरेटी. (एक शंका आहे - तात्या पोटापाण्यासाठी काही उद्योग करत नाहीत काय? रोजच्या रोज होमपेज वर गाण्या-बजावण्याबद्दल काय काय लिहीत असतात. फोटो अपलोड करत असतात. पुन्हा प्रतिक्रियांची उडवाउडवी असतेच. नक्की काय प्रकार आहे? मला आधी वाटलं होतं की मिपा व्यावसायिक पद्धतीने चालते. पण कुठे जाहिराती किंवा पॉप्-अप्स पण दिसत नाहीत. )
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 03/01/2010 - 10:34

In reply to अत्यावश्य by अप्पा जोगळेकर

Permalink

तात्या

तात्या पोटापाण्यासाठी काही उद्योग करत नाहीत काय?
तूर्तास अंमळ बेकार आहे. धंदा डाऊन आहे..हळूहळू जोर धरत आहे! :) अजून काही व्यक्तिगत प्रश्न असतील तर tatya7@gmail.com इथे विरोपपत्र पाठवा... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Mon, 03/01/2010 - 13:58

In reply to अत्यावश्य by अप्पा जोगळेकर

Permalink

आप्पा,

आप्पा, डोंबिवलीत रहाता ना? अहो मग डोंगरात जाताना साद घाला की... येवु आम्हीही...
  • Log in or register to post comments

Submitted by भिडू on Mon, 03/01/2010 - 13:38

Permalink

सचिन ची

सचिन ची बॅटिंग
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Mon, 03/01/2010 - 14:03

Permalink

बायको (हा

बायको (हा कल्पवृ़क्ष आहे, अन्न, वस्त्र, व इतर अनेक गरजा येथे पुर्ण होतात.) मुलगा. इंटरनेट व्यायाम, प्रवास, गाडी असणे व ती चालवणे, डोंगरात भटकणे. हे झाल मीनिमम....
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत on Mon, 03/01/2010 - 14:29

Permalink

माझ्या जीवनाश्यक गोष्टी

आई,बायको, मुलगा, फोटोग्राफी, चित्रकला, सह्यादीतली भटकंती, मिसळपाव (पदार्थ आणि साईट), पुस्तके, संगणक, ब्रायन अडम्स, चवीचे खाणे, पुरे करतो . :)
  • Log in or register to post comments

Submitted by गुपचुप on Mon, 03/01/2010 - 15:43

Permalink

जीवनाश्यक गोष्टी..

पुस्तकं,चवीचे खाणे,इंटरनेट,प्रवास,आहार, निद्रा,वर्तमानपत्र, मित्र, कुटुंब,आणि..... ती. "मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..."
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on Mon, 03/01/2010 - 18:30

Permalink

तेरा..

१. आई-बाबांचे प्रेम २. कुलस्वामिनीचा आशिर्वाद ३. आईच्या हातचे जेवण ४. आजी-आजोबांच्या आठवणी ५. कोकणातले मायाळू घर ६. बहिणीची माया ७. पुस्तके ८. आंबा ९. वडापाव १०. सुसाट ड्रायव्हिंग ११. सचिनचा मैदानावरील वावर १२. माझी स्वप्ने.. १३. माझा भूतकाळ ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 03/02/2010 - 03:06

In reply to तेरा.. by आशिष सुर्वे

Permalink

छान लिहीलयत

छान लिहीलयत. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

Submitted by झुळूक on Tue, 03/02/2010 - 12:52

In reply to तेरा.. by आशिष सुर्वे

Permalink

जीवनवश्यक गोष्टी

सुन्दर लिहलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 03/02/2010 - 04:23

Permalink

१) नशा २)

१) नशा २) नीशा अर्धवटराव -रेडि टु थिन्क
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 03/02/2010 - 04:23

Permalink

झकास उपक्रम

बहुतेकांनी वस्तू, उपक्रम दिले आहेत. मला यापेक्षा जरा हातात न पकडता येण्यासारख्या गोष्टी लिहाव्याशा वाटतात माझ्या अत्यावश्यक गोष्टी, मनस्थिती, परिस्थिती १. स्वातंत्र्य - मनाला येईल ते करता येणं. आत्ता हेच कर आणि ते करू नको अशी जबरदस्ती नसणं. २. सुंदर झोप - विशेषत सुट्टीला अंमळ जड जेवण झाल्यावर ३. मोकळी स्वच्छ हवा, हिरवळ, सूर्यप्रकाश - शक्यतो एकत्र ४. भारतातला पाऊस - अर्थात तो स्वातंत्र्याबरोबरच चांगला लागतो ५. गुंगून जाण्याची स्थिती - लेखन वाचन इ. तहानभूक विसरवणारी ६. काहीही न करणं. त्यासाठी काही गोष्टी पुढे ढकलणं. ७. हव्याशा गोष्टीची हुरहूर, वाट पाहाणं ८. लोकांना शिकवणं, समजावून सांगणं, लोकांना आपलं म्हणणं पटणं ९. विविध गोष्टींमधले पॅटर्न शोधणं. १०. लोकांनी कौतुक करणं, लाड करणं ११. थकून आलेलं असताना गरम टब बाथ, मालिश, आणि थंडगार बीअर
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Tue, 03/02/2010 - 23:01

In reply to झकास उपक्रम by राजेश घासकडवी

Permalink

हॅ हॅ हॅ

भाविक घासकडवी शेट, पूजा विसरलात. > मला यापेक्षा जरा हातात न पकडता येण्यासारख्या गोष्टी लिहाव्याशा वाटतात अच्छा, अच्छा.. मग चालू द्या. (घासकडवीचा फ्यान) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by स्मृती on Fri, 03/05/2010 - 15:01

In reply to झकास उपक्रम by राजेश घासकडवी

Permalink

अरे काय

अरे काय परफेक्ट आणि मस्त लिहिलंय घासकडवींनी! फारच आवडलं :)
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Tue, 03/02/2010 - 04:30

Permalink

कुटुंब (आई

कुटुंब (आई वडील, मुले, पत्नी , बहीण ..) इंटरनेट मोबाइल फोन आवडते खाद्य पदार्थ , सुंदर गाढ झोप जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Tue, 03/02/2010 - 23:31

Permalink

ह्या आमच्या.......

कुटुंब एकांत व internet दोन्ही PC आणि Mobile वर गरज असेल त्यापेक्षा जास्त पैसा मित्र (आवडते ).....हो नावडतेही आहेत.त्यांना दुखवायचे नाही म्हणून त्याच्याबरोबर राहतो(कधीतरी) . ...बाकी सर्व अक्कलेने व पैशाने मिळवता येते
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Tue, 03/02/2010 - 23:35

In reply to ह्या आमच्या....... by शानबा५१२

Permalink

internetशिवाय PC

internetशिवाय PC आणि Mobile म्हणजे 'कुपोषण झालेला धष्ट्र्प्रुष्ट,जाडा मुलगा...........'
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशु on Sat, 03/06/2010 - 05:21

Permalink

लोकल ट्रेन...

लोकल ट्रेन... (उपनगरीय रेल्वे गाड्या)...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com