मालकांनी थालिपीठाच्या निवडणूका घेतल्या. अस्मादिकांची भूक चाळवली गेली.
सो आज बेत होता थालिपीठांचा.
साहित्य :
१.आडीच - तीन कप थालिपीठ भाजणी
२.दोन लहान चमचे तिखट
३.एक लहान चमचा मीठ
४.एक चमचा धणे-जिरे पुड
५.५-६ काड्या चिरलेली कोथिंबीर
६.एक चिरलेली मिरची
७.एक कांदा चिरून
एका भांड्यात वरील सर्व साहित्य घ्या.
पाण्याचा हबका मारा.
हळू हळू पाणी टाकत भाजणीचा गोळा बनवा.
या गोळ्याचे चार ते पाच समान आकाराचे गोळे बनवा.
एका प्लास्टीकच्या कागदाला तेलाचा हात लावा.
त्यावर ह्यातला एक गोळा घेउन बोटाने थापा.
पसरट झाला की त्याला तीन चार छिद्रे पाडा.
आता हे थालिपीठ एका तव्यावर ठेवा.
पाडलेल्या तीन-चार छिद्रांमधे थोडे थोडे तेल ओता.
झाकण ठेवून चार पाच मिनिटे शिजू द्या.
एकदा पलटून मिनीटभर दुसरी बाजू भाजून घ्या.
मस्त दही आणी साजुक तुपासोबत लुफ्त लुटा.
वाचने
9376
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
प्रकाशचित्रे पाहून..
In reply to मस्त by शुचि
अच्छा ..
In reply to प्रकाशचित्रे पाहून.. by प्रभो
प्रकाटाआ
In reply to मस्त by शुचि
मस्त रे
ह्या घ्या
In reply to मस्त रे by रेवती
प्रभो जी,
टारझनजी, पो
In reply to प्रभो जी, by टारझन
मस्त पाकृ
हाण
मस्त
शब्दच
मस्तच रे प्रभ्या!
मस्त..
क्लास!!!!
थाली पीठ...
भाजणी
भारी..
धागा वर