Skip to main content

थोल पक्षी अभयारण्य- निसर्ग चित्रे आणि दुर्मिळ पक्षी.

लेखक Manish Mohile यांनी सोमवार, 22/02/2010 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
अहमदाबादपासून जवळ ४० - ४५ किलोमिटर दूर शिलज नावाचे एक गाव आहे. त्याच्या जवळच थोल पक्षी अभयारण्य आहे. गेली अनेक वर्षे ईथे राहत असूनसुद्धा काही ना काही कारणाने तिथे जाणे जमले नव्हते. पण ओळखीच्या एककडून कळले की या वर्षी थोलला बरेच वेगवेगळे पक्षी दिसले आणि मग आम्ही ठरवले की या वेळी या जागेला भेट द्यायचीच. ठरल्याप्रमाणे ३१ जानेवारीला सकाळी पाच ला ऊठून सगळ आवरून साडे सहाला आम्ही निघालो. वातावरणात सुखद गारवा होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही थोल च्या जवळ पोचलो. सकाळी सकाळी भारद्वाजाने दर्शन देऊन शुभशकुनाची नान्दी केली. पुढच्या १५ मिनिटात आम्ही चेक पोस्ट जवळ पोचलो. तिथे तिकीटे काढली आणि आत शिरून गाडी पार्क केली. सकाळी लवकर ऊठलो असल्यामुळे भुक लागली होती. बरोबर आणलेल्या sandwiches चा ब्रेक्फास्ट केला आणि ताजेतवाने झालो. थोल हे साधारण १६ वर्ग किलोमिटर (16 sq km) तळे आहे. त्याच्या काठाने गोलाकार रस्ता फिरवलेला आहे. आपण गाडी घेवून अथवा पायी आत जाऊ शकतो. रस्त्य्यापासून तळे थोडे आत असल्यामुळे गाडीच्या आवाजाचा फारसा त्रास होत नाही. पण आम्ही मात्र पायीच जाण्याचा निर्णय घेतला. सकाळ्चा सुर्य झाडान्च्या आडून पाण्यावरून किरण परावर्तित करत आपली जादू दाखवत होता. चालता चालता एक सुन्दर गोड छोटा पक्षी दिसला. ह्याचे नाव Black Winged Stilt. हे समुद्र किनारी दिसतात. त्यानन्तर दिसला सुतार पक्ष्याशी साधर्म्य असलेला Hoopoe. पाणथळ जमीन, अधून मधून दिसणारी झाडे, प्रकाश आणि पाणी ह्या सगळ्यान्चा परिपाक म्हणून फार सुरेख द्रुश्य दिसत होती. आणि एवढ्यात एक सुरेख फोटो काढायची सन्धी मिळाली. एक Greater Egret (हा सफेद रन्गाचा असतो) व एक Cormorant (हा काळ्या रन्गाचा असतो) दोघे पाठीला पाठ लावून बसलेले दिसले. मग दिसला Purple Swamp Hen नावाचा एक अतिशय देखणा पक्षी. ईतका सुन्दर निळा जाम्भळा रन्ग होता म्हणून सान्गू. आणि तो बसला होता रामबाण गवतामध्ये. त्या हिरव्यागार गवताच्य्य पार्श्वभूमीवर तो निळा जाम्भळा रन्ग फारच ऊठून दिसत होता. तुम्हाला Darter (Snake Bird) नावाचा पक्षी माहीत आहे? ह्याची मान सापासारखी दिसते. अथवा आपण नेमबाजीच्या खेळात जो dart वापरतो त्या सारखी. आणि मग दिसले सारस पक्षी . हे कायम नर मादी असे जोडीनेच दिसतात. एक सोडून गेला तर दुसरा विरहाने प्राण त्यागतो असे मानले जाते पुराणकाळापासून. ती जोडी दिसली आणि मग त्यातल्या नराने पूर्ण पन्ख पसरून आपले शक्ती प्रदर्शन केले. आणि मग थोडा वेळ आम्हाला फोटो काढायला देवून त्या जोडीने तेथून प्र्स्थान केले. It was an excellent Parting Shot. निसर्गाच्या अगाध लीलेचे कौतुक करत आम्ही परत निघालो. पण पुढच्या रविवारचा कार्यक्रम ठरवून. अजून एक पक्षी अभयारण्याला नल सरोवरला जाणयाचे ठरवून.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12366
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

त्या एका पक्षानी तर मस्त पोझच दिलीये. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

फोटो बाकी छाण आलेत हो ... पण ते मर्सिडिझ च्या विंडशिल्ड वर कावळा पिचकावा तशी ते नावं वारंवार मधे आल्याने त्यांची क्वालिटी किंचित खाली आलिये ! जमल्यास नावं कुठेशी कोपर्‍यात टाकत चला ;) अर्थात .. वैयक्तिक सल्ला ;) - (फोटूप्रेमी) फोटोबा शॉपर

सर्व फोटो सुंदर आहेत्,पण पाण्यात झाडाचे प्रतिबिंब असलेला फोटो सर्वात जास्त आवडला... :) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

सुंदर!!!... पण नाव जरा कोपर्‍यात टाका, नाव मधे आल्यामुळे फोटोंची मजा जरा कमी झाली...

ल ई भारी सग्ळ्या फ्रेम्स सुन्द्र प्र दी प

पुढच्या ट्रीपचे फोटो नक्की टाका.

सुंदर प्रकाशचित्रे. टारु आणि विमुक्ताने दिलेला सल्ला योग्य वाटतोय, बघा जमल तर :)

बध्धा सारो छे, तारो छे. पर टेढो नथी. कदाचित शब्द चुकले असतील पण भावनाको समझो.

फारच छान माहितीने ज्ञानात भर घातली

लै भारी!!! बिपिन कार्यकर्ते