"अय्या,सर तुम्ही. बर झाले तुम्ही भेटलात "
बॅकेत गर्दी होती. पैसे मिळायला कमीत कमी अर्धा तास लागणार होता. आता खिंड लढवणे भाग होते.
"पोरीने नशिब काढले हो"
लग्न ठरले का"?
"इश्श, काही तरीच काय. एवढ्यात कुठे लग्न"
ह्या मातेच्या मुलीला मी पंधरा दिवसापुर्वी एका गोरटेल्या मुलाबरोबर अपुर्ण स्काय वॉक वर 'टेकान घेवा' स्थितीत बघितलेले होते. त्यामुळे एक नैसर्गिक प्रश्न होता तो.
"माझ्या वेळी खुपच त्रास झाला होता हो. धड पंखे पण नव्हते"
आता हीच्या पहिल्या डीलिवरी ला मॅटरनिटी होम मधे लेबर रुममधे पंखा नसल्याने जे हाल झाले त्या बद्दल तर बोलत नसावी. पण हे माझ्या कडे का बरे बोलावे ? मी आपला हैराण. काहीतरी बोलुन तोंड घशी पडण्यापेक्षा मी आपला नेहेमीचा उपाय वापरला.
हम्म
"आताच सेंटर ला जाउन आले"
कसले सेंटर?
मला काहीच कळेना.
"अहो सर, असे काय करताय? उद्यापासुन बारावीची परिक्षा सुरु होतेय ना"?
हां हां. तुम्ही नशिबाबद्दल काही तरी म्हणत होतात त्या मुळे मी गोंधळलो.
"माझ्या वेळी तर बाक पण हलत होता. बाकात ढेकुण सुद्ध्हा होते. त्या मुळे माझी मेरीट गेली"
हम्म.
" सेंटर अगदी छान आहे. भरपुर वेंटीलेशन आहे. उजेड आहे. सहा सहा पंखे सुद्धा आहेत."
चालु आहेत ना?
" हो, हो. त्याची पण खात्री करुन घेतली"
खरेच नशिबवान हो तुमचे कन्या रत्न.
"आमच्या ह्यांनी गेले ३ आठवडे ऑफिस ला सुट्टी घेतली आहे."
वा वा वा.
" सांगायचे म्हटले तर ह्यांनी पण खुपच मेहेनत घेतली हो"
म्हणजे?
" ह्यांचे म्हटले तर एकदम 'सायंटीफीक काम' हो.
मी दचकलो. आजुबाजुला कुणी श्रवण कुमार नसल्याची खात्री करुन घेतली.
म्हणजे काय?
"आता तुम्हा डॉक्टर आणि समुपदेशक मंडळी ना आम्ही काय सांगणार"?
मी तुम्ही म्हणता तसा काहीही नाही हो. पण एक पालक म्हणून काय असेल तर सांगा तुमच्या ह्यांच्या सायंटीफिक कामाबद्दल.
"ही तुमची विनम्रता आहे. पण आता विचारताहात तर सांगते. ३ आठवड्या पुर्वी ह्यांनी गजबजलेल्या रस्त्यावरच्या ध्वनी प्रदुषणाचे रेकॉर्डींग केले.
इतर क्लासेस चे पेपर झेरॉक्स केले. एक हलणारा बाक आणला. हे सर्व पेपर त्यानी मुली कडुन बाकावर बसुन सोडवुन घेतले. पार्श्वभुमीवर टेप रेकॉर्ड लावला होता. ए पर्फेक्ट सिम्युलेशन एक्सरसाइज."
काय सांगताय? एकदम चंद्रावरची स्वारी इतकी तयारी म्हणा की.
" हो आपण सर्व प्रकारांना तयार असायला पाहीजे असे ह्यांचे म्हणणे"
हो का? बर बर. एकदा भेटायला पाहिजे बाबाना.(भेटल्यावर ह्याच्या भुमीवर लाथ घालायला मिळाली तर उत्तम)
" शेवटच्या दिवशी अभ्यासाची काही टीप द्या हो."
परिक्षेच्या आयचा घो म्हणत मुलीला शांत झोपु द्या.
इतक्यात टोकन ची बेल वाजली आणि माझी खिंडीतुन सुटका झाली.
वाचने
4513
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप रे
"माझ्या
फारच सुंदर
ह्म्म्म्म
हातवळणे नाव त्यांचं
In reply to ह्म्म्म्म by चतुरंग
बरोबर बरोबर!
In reply to हातवळणे नाव त्यांचं by एक
बापरे!
मास्तर मस्त हं...!
तुमचे
In reply to मास्तर मस्त हं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो सर
In reply to मास्तर मस्त हं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>सीरिअसली
In reply to अहो सर by चतुरंग
अरे बाबा सीरिअसली म्हणजे जेव्हा अभ्यास करेन तेव्हा फक्त अभ्यास
In reply to >>सीरिअसली by Nile
कसेही
मास्तर
त्या मुलांना
३ आठवड्या
हे हे हे!
In reply to ३ आठवड्या by मदनबाण
आणि नंतर
In reply to हे हे हे! by चतुरंग
छान!!!
@ एक