२५० ग्राम बोनलेस चिकन बारीक़ बारीक़ तूकडे करून घ्यावे.
त्यात दोन चमचे तान्दुळ पीठ, एक चमचा डाळीचे पीठ, चमचाभर तिखट, चवीपुरते मीठ, कोथिम्बिर, ओवा आणि लिम्बू पिळावा.
कढीपत्याची १५/२० पाने कुरकुरीत तळून घ्यावीत.
ही तळलेली पानं बारीक़ कुस्करून चिकन मधे टाकावीत.
सर्वात शेवटी एक अंडे फेटून टाकावे.
सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून अर्धा तास ठेवा.
कढईत तेल गरम करायला ठेवून चिकनचा एक एक तुकडा हळू हळू तेलात सोडा व मंद आचेवर लालसर तळा.
मंद आचेवर तळल्याने चिकन छान शिजते.
Taxonomy upgrade extras
वाचने
11425
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मि.पा.वर स्वागत..
हेच,
In reply to मि.पा.वर स्वागत.. by स्वाती राजेश
व्हेज ६५
विजुभाऊ खालील लिन्क पाहा..
धन्यवाद...
In reply to विजुभाऊ खालील लिन्क पाहा.. by स्वाती राजेश
हम्म्म्म्म्......