एके दिवशी ऑफिसमधून येताना माझा सहकारी मित्र प्रदीप मला म्हणाला "अरे मनिष, मलाव तलाव मध्ये मी कमळे फुललेली बघितली. " हा मलाव तलाव म्हणजे आमच्या घरापासून १ ते १.५ किलोमीटर दूर असलेली एक पाणथळीची जागा. त्याच्या भोवती एक बगिचा बनवलेला. जॉगिन्ग साठी सोय केलेली.
आता इतक्या जवळ असलेल्या जागी फुललेली कमळे बघायची सन्धी मिळते आहे म्हटल्या वर आम्ही ठरवले की रविवारी सकाळी उठून तिकडे जायचे. एरवी रविवार म्हणजे झोप पूर्ण करण्याचा दिवस. पण त्या रविवारी सकाळी साडे सातला आम्ही घराबाहेर पडलो. मलाव तलाव ला पोहोचलो. तिकडच्या रखवालदाराला सान्गितले की आमहाला काही फोटो काढायचे आहेत. त्याची सम्मती मिळवून आम्ही आत शिरलो.
पहिला फोटो काढला पावडर पफ या फुलाचा.
त्यानन्तर लाल्गुलाबी रन्गाची छोटी फुले दिसली. त्यानन्तर दिसली आपली ओळखीची शन्खासुरची फुले.
आणि त्यानन्तर आपले चिराट्याचे (दिवाळीत आपण नरकासूर म्हणून जे फळ फोडतो ते ) फुल. हे आकारानी जेममतेम आठ आण्याच्या नाण्याएवढे असते.
आता काही फुलपाखरे.
आणि शेवटी ज्यासाठी आम्ही आलो होतो, ती कमळे दिसली. बरीचशी पाण्यात बरीच आतमध्ये होती. एकच जरा काठा जवळ होते. आम्ही थोडेसे खाली उतरलो आणि देवाच्या क्रुपेने आम्हाला मनपसन्त फोटो काढता आले.
आत्ता पर्यन्त जवळपास दोन अडीच तास लओटले होते. प्रचन्ड खुश होवून आम्ही परत निघोलो.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6929
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा...काय
अप्रतिम!!!
झगझगीत रंग
प्रिय
In reply to झगझगीत रंग by राजेश घासकडवी
मस्त आलेत
छान
शेवटचे ३