आत्ताच अंगारकी निमित्त, बाप्पाच्या नैवेद्यासाठी रस - शेवया केल्या होत्या. एकदम सोपी सुटसुटीत कृती आहे.
साहित्य
१. तांदळाची पिठी
२. ओले खोबरे
३. गूळ
४. स्वादासाठी वेलची पूड
तांदुळाच्या पिठीची उकड काढून घ्यावी. मुटकुळे करुन घ्यावेत.
उकडीचे गरम मुटकुळे किचनप्रेस मध्ये टाकून शेवया करुन घ्याव्यात. (उकडीचे मुटकुळे गरमच असावेत.)
ओल्या खोबर्याचा रस काढून घ्यावा. त्यात बारीक चिरलेला गूळ घालावा. रसात वेलची पूड घालावी.
बाप्पाला नैवेद्य दाखवून नंतर आपणच गरमा गरम शेवया गोड रसा सोबत मनसोक्त खाव्यात.
गणपती त कोकणातल्या घरी हमखास होणारी ही पाककृती बरेच दिवसांनी केली गेली. कोकणात घरी तर एक मोठा लाकडी शेवगा होता. त्यात उकडीचे मोठे गरम गोळे ह्या हातावरुन त्या हातावर करत आजी आई टाकत. मग आम्ही पोरं सोरं शेवग्याचे हँडल फिरवून शेवया पाडण्याची अहमहिका लावायचो.
शेवग्याच्याखाली , शेवया साठवण्यासाठी बांबूची टोपली, केळीची पाने घालून ठेवलेली असे. ती भरेस्तोवर धीर निघायचा नाही. गरम शेवया, टोपलीत पडताक्षणी उचलल्या जायच्या, रसाबरोबर भिजवून चापण्यासाठी !!
वाचने
10699
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
सात्विक आणि सुग्रास
असेच म्हणतो!
In reply to सात्विक आणि सुग्रास by शुचि
मस्त...!
मस्तच!
ह्म्म्म...ह
आपरस असेच
In reply to ह्म्म्म...ह by शाहरुख
आवर्जून द्यावेत..
In reply to आपरस असेच by कपिल काळे
मस्त
In reply to आवर्जून द्यावेत.. by सुनील
वाव !!! खूप सुन्दर !!
श्री गणपा
अविनाश्रा
In reply to श्री गणपा by अविनाशकुलकर्णी
केरळी
हा बघा
In reply to केरळी by बिपिन कार्यकर्ते
या
हा माझा
माझी आ़जी
अतिशय छान
स्वर्गीय !!
मस्त...
सही
वा मान
वा!
जीवघेणी
हा तीन पायाचा मोठा सोर्या आता मिळेल का कुठे ?
मस्त मस्त