मराठी माणूस स्मृतीत रमणारा 'रम्य भूतकाल' या वृत्तीचा आणि अव्यवहारिक नोस्टाल्जिक आहे का हा प्रश्न मी पूर्वी विचारला होता. (या मराठी माणसांत मीही आणि विशेषेकरुन मीही आलो!) . 'तसे स्मरणरंजक सगळीकडेच असतात' इथपासून ते 'स्मरणरंजनात वाईट काय?' अशा पिळदार मिशांच्या सवालापर्यंत उत्तरे आली. ही चर्चा उदाहरणार्थ विचारस्वातंत्र्याची तथाकथित मुस्कटदाबी होत असलेल्या संकेतस्थळावर झाली. पण स्वातंत्र्याचे मनमोकाट वारे वहात असलेल्या स्थळांवरही फारसे वेगळे चित्र नाही, असेच दिसते आहे. मिसळपावचे मुखपृष्ठही पुलं, लता, गदिमा, राजाभाऊ आणि हादग्याच्या खिरापतीच्या धर्तीवरचे कसलेकसले आण्णा, कसलेकसले बापू, कसलेकसले दादा आणि अगदी कडेलोट म्हणजे कसलेकसले खांसाहेब यांनाच पट्टराणी करुन राहिले आहे. म्हणूनच पाडगावकरांच्या (बघा, पुन्हा नोस्टाल्जिया!) 'ही रांग कोठे जाते? ' किंवा 'अमक्याला बिर्याणीचे वावडे आहे काय? या धर्तीवर पुन्हा तेच विचारावेसे वाटते. मराठी माणसाची मनमोरी भूतकाळातील स्मरणाने तुंबली आहे काय?
वाचने
4997
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी तरुणाईने
नवीन माहिती
In reply to मराठी तरुणाईने by शुचि
सहमत. ते
In reply to नवीन माहिती by वेताळ
हॅहॅहॅ ...
In reply to सहमत. ते by अमृतांजन
मिसळपावचे
In reply to हॅहॅहॅ ... by टारझन
मराठी
In reply to मराठी तरुणाईने by शुचि
अहो
In reply to मराठी by बंडू बावळट
मी खालील
ह्ममम...
In reply to मी खालील by अमृतांजन
>>ह्ममम...
In reply to ह्ममम... by विंजिनेर
उत्तरे
सहमत आहे
स्मृतीरममाणता
नीरीक्षण
In reply to स्मृतीरममाणता by विकास
साईड इफेक्ट
हाच दिवस पाहायला...
रावसाहेब, एकच प्रश्न विचारतो
मिसळपावचे
बाय द वे,
In reply to मिसळपावचे by विसोबा खेचर
नव्यातलं रमणं...
In reply to मिसळपावचे by विसोबा खेचर
तुमच्या
In reply to नव्यातलं रमणं... by राजेश घासकडवी