मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्लॉग ला मराठी प्रतिशब्द काय असावा?

प्रकाश घाटपांडे · · कौल

वाचने 1625 वाचनखूण प्रतिक्रिया 42

प्रमोद देव 02/02/2010 - 08:51
जालनिशी हाच शब्द वापरतो. :) ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

प्रभो 02/02/2010 - 09:08
पर्याय ३ ला मत दिले आहे. ब्लॉग लिहिणार्‍यांना जसे ब्लॉगर म्हणतो तसे रीलेशन दुसर्‍या कोणत्याही नावात दिसत नाही.(मला माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर पामराच्या माहीतीत भर घालावी.) नामकरण करताना त्या नावाचे दुसर्‍या नावांवर पडणारा परिणाम ध्यानात घावा असे म्हणतो, उगाच शहरांच्या नामकरणासारखे नको. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

पाषाणभेद 02/02/2010 - 09:50
'जालवही' अगदीच मराठीकरण करायचे झाल्यास 'जाळंवही' करा, म्हणतांना 'जाळवही' म्हणता येईल. (लिखीत अन बोलीभाषा थोडी फरकाची असते. उदा. चमचा-चकली येथे च चा उच्चार) कुसूमाग्रजांनी या विषयी बरेच काही चांगले लिहीलेले आहे. त्यांचे लिहीलेले मला ठिक आठवत नाही. पुन्हा वाचन करावे लागेल. आज मी ते वाचून बाकीचा प्रतिसाद देईलच तुर्तास त्यांचे जे काही म्हणने होते ते विस्कळीतपणे खाली देत आहे. मराठीत नवीन नवीन शब्द आले तरच भाषा जिवंत राहील. तोच भाषेचा प्रवाहीपणा असतो. इंग्रजी शब्दाला उगाचच ओढूनताणून जसेच्या तसे मराठीकरण जरी केले तरी ते शब्द व्यवहारात वापरले जात नाही. उदा. रेल्वे ला काहीतरी अग्नीरथगमन... असा शब्द (सावरकरांनी) केलेला होता. एकवेळ गंमत म्हणून हे ठिक आहे. पण सर्रास हा पर्याह होवू शकत नाही. नवीन शब्द करतेवेळी आपण काही वेळा चुकीचेच शब्द तयार करतो. उदा. air hostes ला आपण हवाई सुंदरी हा शब्द केल्याने त्या स्त्री कडे आपली पाहण्याची दृष्टी बदलते. त्या शब्दाला वास्तवीक 'हवाई सेविका' हा शब्द जास्त चफकल बसतो. नवाकाळ या दैनिकाने क्रिकेटसाठी अनेक शब्द देणगी दिलेले आहेत. उदा. फलंदाज, गोलंदाज, चेंडूफळी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षक, झेल आदी सगळे शब्द हे नवाकाळ मधील क्रिडा पत्रकारांची देणगी असल्याने आपण त्यांचे एका अर्थाने ऋणी राहिले पाहिजे. ( आधी हा ऋणी शब्द निट टंकन करता आलेला नव्हता. Nile यांनी तो मला सांगितला. मी त्यांचा ऋणी आहे.) (वरील सगळी वाक्ये जशीच्यातशी कुसूमाग्रजांची नाहीत. माझ्यासारख्या सामान्य माणसाकडून काही चुक होता होता ती लिहील्यागेलेली असल्याने तात्यासाहेब मला माफ करा. माझा प्रयत्न तुमच्या लिखाणाचा गाभा सांगण्याचा होता.) वरील 'जालवही' हा शब्द सोपा आहे. सर्वसामान्यांना समजेल, तोंडात राहील, उगाचच शब्दजंजाळ नसणारा नाही. माझ्यासारख्या सामान्याने तो सांगितलेला आहे म्हणून व कोणताही पुर्वग्रह न ठेवता सर्वांनी असलेच सोपे शब्द वापरायला सुरूवात करायला हरकत नाही. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

In reply to by पाषाणभेद

स्वानन्द 02/02/2010 - 11:52
जालवही हा शब्द जास्त योग्य वाटतो. जालनिशी देखील ठीक आहे. पण तो 'रोजनिशी' या शब्दाशी जास्त साधर्म्य दाखवतो. आणि आपण ब्लॉग काही रोज लिहीत नाही...म्हणजे लिहीतोच असे नाही. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

In reply to by पाषाणभेद

कुसुमाग्रजांनी अनेक अमराठी शब्द कौशल्यपूर्णपणे "जसेच्या तसे" त्यांच्या कवितांमधून वापरले. ते खटकत तर नाहीच. उलट मराठी भाषेला नवे पैलू देतात. उदा. १. "म्यानातुन उसळे तरवारीची पात वेडात मराठी वीर दौडले सात" २. "खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली पथ शोधित आली रानातून अकेली" ३. "तोडुनी आंधी तुफाने चालल्या, ती चालली तीन होत्या दीपमाला, एक होती सावली" आपला, (कुसुमाग्रजांचा चाहता) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्रमोद देव 02/02/2010 - 09:42
नवाकाळ या दैनिकाने क्रिकेटसाठी अनेक शब्द देणगी दिलेले आहेत. उदा. फलंदाज, गोलंदाज, चेंडूफळी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षक, झेल आदी सगळे शब्द हे नवाकाळ मधील क्रिडा पत्रकारांची देणगी असल्याने आपण त्यांचे एका अर्थाने क्रूणी (निट टंकन करता आलेले नाही. माझ्या माहितीप्रमाणे हे शब्द सर्वप्रथम मराठीतून धावतं वर्णन करणारे प्रोफेसर देवधर,बाळ ज. पंडित,वि.वि.करमरकर इत्यादि क्रिकेटच्या समालोचकांनी वापरले आणि समाजमानसात रुळवले. अर्थात ह्या शब्दाचे नेमके जनक कोण आहेत हे सांगणे कठीणच आहे.....बहुदा सावरकरही असू शकतात. कारण मराठीत चपखल प्रतिशब्द बनवण्याचे त्यांचे कसब वादातीत आहे. हा प्रतिसाद मूळ विषयाला सोडून असल्यामुळे तो उडवला गेला तरी माझी काही हरकत नाही. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

ऋषिकेश 02/02/2010 - 10:17
अन्य काहि ला मत दिले आहे. जालनिशी, अनुदिनी, संवादिनी किंवा ब्लॉग हे सारेच योग्य शब्द आहेत. आपण कुठे लिहितो, संदर्भ काय, कोणत्या अर्थाने लिहायचे आहे यावर त्यापैकी एक प्रतिशब्द म्हणून वापरता येईल असे वाटते. हे शब्द 'ब्लॉग' साठी वापरता येत असले तरी त्यांची अर्थछटा वेगळी आहे. तेव्हा शब्दाच्या प्रयोजना नूसार वापर करावा असे वाटते. तसेही इंग्रजी शब्दाला एकच प्रतिशब्द असावा असे थोडेच आहे? प्रसंगानुरुप वेगळे शब्द, प्रसंगी शब्दसमुहांची योजना करणे उचित ठरावे असे मला वाटते. ऋषिकेश ------------------

मला जालनिशी हा शब्द सुंदर व महत्वाचे म्हणजे अर्थवाही वाटतो. दुसरे म्हणजे सहज मुखी बसणारा आहे. ही सहजमुखस्थता व अर्थवाहिता अनुदिनी वा संवादिनी शब्दांत तुलनेने कमी जाणवते. (हे माझे मत) मराठीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही शब्दपाडू प्रतिभा ! उद्या जालनिशीकारांचे अ.भा. संमेलन झालेच तर ब्लॉगसाठी स्वतःचा शब्द असणारी मराठी कदाचित एकमेव भाषा असेल ! प्रतिशब्द देण्याचा अट्टाहास करु नये हे खरे ! यातला अट्टाहास वा दुराग्रह शब्द महत्वाचा. जर शब्द सहजतेने घडत असेल तर त्याचा गळा का दाबावा ? बाय द वे , विकीवरच्या लेखांमध्ये ब्लॉगसाठी स्वतःचा शब्द वापरणारी मराठी ( दुवा ) भारतीय भाषांमध्ये नक्कीच उठून दिसतेय.

In reply to by अभिरत भिरभि-या

अभिरतशी सहमत आहे. सहज सोपे मराठी शब्द टाकून उगाच स्टाईल मारणे या कारणासाठी कोण इंग्रजी शब्द वापरत असेल तर ते नक्की खटकतेच. शक्यतो मराठी शब्द प्रत्येक इंग्रजी गोष्टी साठी निर्माण करावा. जो चांगला सोपा असेल तो वापरावा. अन्यथा तो दारू पिऊन गाडी चालवत होता हे सांगण्यासाठी तो अ‍ॅल्कोहोल कन्झ्यूम करुन गाडी चालवित होता हे सांगण्याने असा काय ग्लोबल टच, आणि प्रवाहीपणा मराठीला येतो काय माहीत. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मी_ओंकार 02/02/2010 - 13:10
अभिरत आणि पुपेंशी सहमत. प्रतिशब्द करण्याचे थांबवता कामा नये. अन्यथा पुपे म्हणतात तसे होईल. बाकी जालावर सध्या बरेच शब्द रुळले आहेत (जसे. दुवा, खरड, विरोप) त्यामध्ये आणखी भर पडत राहो. - ओंकार.

सुधीर काळे 02/02/2010 - 11:38
'रोजनिशी' या शब्दामुळे असेल पण 'जालनिशी' म्हणजे रोज ब्लॉग लिहिण्याची सक्ती वाटली. म्हणून मला संवादिनी हा शब्द जास्त आवडला. ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureaucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!

In reply to by सुधीर काळे

मलाही संवादिनी हा शब्द रुचला. म्हणून त्यालाच मत दिले आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

संवादिनी हा शब्द संगिताचे एक वाद्य या अर्थाने वापरात आहे. त्यामुळे ब्लॉग या अर्थी वापरल्यास या शब्दाची अनन्यता (Exclusivity) लोप पावते व तो संदर्भानुरूप (context-specific) घ्यावा लागतो. मला वाटते, या पर्यायाचा हा फार मोठा दोष आहे.

सुधीर काळे 02/02/2010 - 14:22
मला गूगलवर हा संदर्भ सापडला. पण हार्मोनियम या आद्य शब्दाचा व हार्मनी या शब्दाचा कांहीं संबंध आहे का हे पहावे लागेल. मी स्वतः हार्मोनियम वाजवतो पण आख्ख्या आयुष्यात 'पेटी' किंवा 'बाजाची पेटी' या पलीकडे दुसरा मराठी शब्द मी कधी ऐकला नाहीय्! तेंव्हा या ओढून-ताणून बनविलेल्या शब्दाला विशेष लोकप्रियता प्राप्त झालेली दिसत नाहीं. ब्लॉगद्वारा आपण सुसंवाद साधतो. म्हणून मला तो शब्द आवडला इतकेच. असो. सर्व बाजूंचा विचार करून काय ते ठरवावे. ------------------------------------------------------------ Pt. Manohar Chimote renamed this new instrument initially as Sur-Manohar in early Seventies. However giving his name to this instrument did not appeal to his concious and he was looking out for an appropriate name. In 1972, when he was travelling in the train, still thinking about right name for his beloved instrument, chain of thoughts led him to a beautiful name. He thought 'Harmony' means 'Samvad' in Sanskrit so instrument which is capable of creating harmony must be called 'Samvadini'(Instrument which creates Harmony).Since then this instrument is called Samvadini. ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureaucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!

In reply to by सुधीर काळे

काका, पं. चिमोटे आणि त्यांची संवादिनी या दोन्हीही गोष्टी गेल्या काही दशकांपासून जाणकारांच्या वर्तुळात तरी खूप प्रसिद्ध आहेत. शिवाय, संवादिनी हे हार्मोनियम मधे काही सुधारणा करून तयार केलेले वाद्य आहे. बिपिन कार्यकर्ते

मेघवेडा 02/02/2010 - 15:48
'जालनिशी' शब्द सुंदर आहे. 'संवादिनी' हा शब्दही चुकीचा वाटत नाही, कारण लेखकाला जगाशी संवाद साधण्यास मदत करणारे हे एक साधन आहे, पण जालनिशी जास्त योग्य शब्द वाटतो. वास्तविक, एका वाद्याला 'संवादिनी' म्हणणे खटकतेय! अवांतरः हार्मोनियम या शब्दाचा गूगल शोध घेतल्यावर हा दुवा मिळाला. अन्य ठिकाणी सुद्धा पाहिले असता, उदा. डिक्शनरी.कॉम, एन्सायक्लोपीडिया.कॉम वगैरे, असे कळते की फ्रेंच भाषेतील 'harmonie' किंवा जुना 'armonie' हा शब्द 'harmonium' या शब्दाचे मूळ आहे! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

जालनिशी हा शब्द अनेक जण वापरतात. तो ठेवायला हरकत नाही. माझं वैयक्तिक मत, बियर, रम, स्कॉच या दारूच्या विलायती प्रकारांना मराठी प्रतिशब्द शोधणं महत्त्वाचं नाही, आस्वाद महत्त्वाचा. वेबलॉग म्हणजे इंटरनेटवरील डायरी. त्याचं संक्षिप्त रूप ब्लॉग आहे. हा शब्द इंग्रजी भाषेतून आला असला तरी तो इंग्रजी नाही. तो जसाच्या तसा वापरायला काय हरकत आहे? आणि मराठी पर्याय हवे असल्यास ते केवळ "मराठी"च असू द्या. संस्कृत म्हणजे मराठी नव्हे. गंगा गंगोत्रीतून उगम पावते, गंगोत्रीत विलीन होत नाही. मराठीसुद्धा संस्कृतमध्ये विलीन होऊ देऊ नये. आपला, (अट्टल मराठी) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

In reply to by प्रशांत उदय मनोहर

गंगा गंगोत्रीतून उगम पावते, गंगोत्रीत विलीन होत नाही. मराठीसुद्धा संस्कृतमध्ये विलीन होऊ देऊ नये. बरं बरं. ओ घाटपांडेकाका अजून एक ऑप्शन द्या 'बातचिती'. ओक्के? ;) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इतर नावाच्या पर्यायात खुप मोठा अवकाश आहे. भाषेचा विकास हा सरमिसळ व संक्रमणातुन होतो. आता काही लोक त्याला धेडगुजरी म्हणतात. पेशवाई बुडाली .बातबिती since 1818 पण ||पुण्याचे पेशवे|| टिकुन आहेत .बातटिकी since 1984 ;) प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चालायचंच. जे जे उत्तम असतं ते काळाच्या ओघात टिकतंच -एक जालीय महावाक्य खुलाशाबद्दल धन्यवाद. खुलासा संपला. ;) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by प्रशांत उदय मनोहर

बियर, रम, स्कॉच या दारूच्या विलायती प्रकारांना मराठी प्रतिशब्द शोधणं महत्त्वाचं नाही, आस्वाद महत्त्वाचा.
हॅहॅहॅ आता कसं बराब्बर बोल्ला. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

महेश हतोळकर 03/02/2010 - 16:03
प्रतिशब्द देण्याचा अट्टाहास करु नये. ब्लॉग जसाच्या तसा वापरावा कारण आपण अनेक इंग्रजी शब्द मराठी भाषेत घेतले आहेत. स्कूटर मिक्सर प्रिटंर पेन पेन्सील रबर इलॅस्टीक . . . .

सुधीर काळे 04/02/2010 - 20:06
दु:खाची गोष्ट हीच की मिपाचे हजारांनी सभासद असताना फक्त २१ मतें आली. थोडक्यात या विषयाबाबत कुणाला फारशी आस्था दिसत नाहीं! ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureaucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!

In reply to by II विकास II

शाहरुख 05/02/2010 - 01:59
जो शब्द आवडला त्याला मत न देण्यामागची मनोभुमिका जाणून घ्यायला आवडेल.

देवदत्त 05/02/2010 - 01:11
ह्यात पर्याय निवडु शकत नाही. मी स्वत: अनुदिनी हा शब्द वापरतो. पण इतरत्र वापरत जात होता तसेच दिलीप प्रभावळकरांच्या 'अनुदिनी' ह्या पुस्तकावरून प्रेरित होऊन. जालनिशी हा ही बरोबर वाटतो. इतर कोणते ते नक्की नाही सांगू शकत.

देशीसंत्रा 16/02/2010 - 23:37
अनुदिनी शब्द बरा वाटतो, पण ब्लॉग शब्दालाही हरकत नाही. (मिपा वर नवीन असल्याने एखाद्या विषयाचा जास्त कीस पाडण्याची सवय आम्हाला अजून लागलेली नाही.) ----
आम्ही सध्या `स्वतंत्र विदर्भ राज्या'च्या मुद्यावर आमची स्वतःची भूमिका ठरविण्यात व्यस्त आहोत.

प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द काढायचा अट्टहास का असावा? #o बरेचसे इंग्रजी शब्द मराठीत इतके रुळले आहेत, की ते वेगळे काढताच येत नाहीत. आणि सध्याच्या कॉलेजकुमारांना साधी मराठीही नीट बोलता येत नाही, तिथे असले जड शब्द काय सुधरणार? >:P उदाहरणार्थ, 'सॉरी' ला प्रतिउक्ती म्हणून अनेक जण चक्क म्हणतात: "मी क्षमस्व आहे!" :)) अरेच्च्या! मराठीच बोलण्याच्या नादात मराठी व्याकरणाच्य शतशः चिंधड्या.......... [( सहजपणे येतील, असे शब्द जरूर वापरावेत. उदाहरणार्थ, डायरीला दैनंदिनी, फाईलला धारिणी, इंटरनेटला आंतरजाल, पासवर्डला संकेताक्षर इ. पण सर्वसामान्यांच्या डोक्यावरून जातील, असले शब्द कश्यासाठी? आता उद्या आईस्क्रीमला आपण 'दुग्धशर्करायुक्तशीतघनघोलगट्टू' :W म्हणणार का? ह्या मराठीच्या मा-याने हैराण झालेल्या माझ्या एका मित्राने एक करूण विनोद केला. तो टेबल टेनिस प्लेअर आहे. तो म्हणाला, "उद्यापासून टेबल टेनिसला 'हरितमंचकावर घे ताडताड दे ताडताड' असलं काही म्हणायला सुरुवात नाही केली म्हणजे मिळवली #:S "......... =)) ----------------------------------------------------------------- परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्| धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे||