मिसळपाव वर सध्या
राजु परुळेकर: राजकीय पत्रकार? या भडकमकर मास्तरांनी मांडलेल्या काथ्याकूट मधे अनेकांनी चर्चा केल्यात. ३ जानेवारी २०१० ला अंनिस द्विदशकपुर्ती समारंभात पुण्यातील एसेम जोशी सभागृहात प्रसार माध्यम हा विषय परिसंवादासाठी घेतला होता. संजय आवटे हे तरुण पत्रकार सध्या पुढारीचे निवासी संपादक व सकाळ टाईम्स चे श्री आनंद आगाशे हे पत्रकार यानिमित्ताने बोलत होते. प्रसारमाध्यमातील वृत्तपत्रे व दृकश्राव्य माध्यमे यांचे वेगाने बदलत जाणारे स्वरुप हा समाज बदलाशी निगडीत आहे. पत्रकार हे त्यांचे प्रतिनिधि. पोलिस म्हटल्यावर तंबाखु खाउन पचापचा थुंकणारा, ढेरपोट्या,चेहर्यावर ओतप्रोत बुद्धीमांद्य, पैशे खाण्यासाठी सावज हेरणारा असा एक सरकारी माणुस असे नजरेसमोर येते. तसे पत्रकार म्हटल्यावर आपल्याला शबनम झोळी खांद्यावर घेउन चाणाक्ष नजरेने समाजाचे वास्तव टिपणारा एक वृत्तपत्राचा एक प्रतिनिधी असे डोळ्यासमोर येते. आठवा सिंहासन मधला दिगु.
सकाळमधील परुळेकर ते पवार हा बदल पुणेकरांनी कसा पचवला? विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असलेली असलेली पत्रकारिता ही कशी बदलली? हे पहाताना मला संजोपरावांच्या
या निर्बुद्ध 'सकाळ' चे काय करायचे? हा लेख आठवला.
निवडणुकीच्या काळात पेड न्युज प्रकरणामुळे लोकांचा झालेला भावनाकल्लोळ हा तात्कालीन असतो. पत्रकारांनी व न्यायाधिशांनी नि:स्पृह असावे ही समाजाची अपेक्षा असते. पोलिसांनी हप्ते खाण यात एक प्रकारची समाजमान्यता असते. पण पत्रकारांनी हप्ते खाण हे समाजाला पटत नाही. वृत्तपत्र/माध्यमसमूहाचे मालक हे कमोडिटि म्हणुन त्याकडे पहातात तर संपादक पत्रकारांनी त्याकडे विपणक म्हणुन पहावे अशी त्यांची अपेक्षा असते. वर्तमानपत्रात छापुन आलय म्हटल्यावर ती सत्य व काळ्या दगडावरची रेघ अस मानणारा समाज वर्तमानपत्रांकडे किती आदराने पहातो. लोकशाहीचे अस्तित्व टिकवुन ठेवण्यासाठी प्रसारमाध्यमांचा खुपच वाटा आहे. माध्यमांमधील सबसे तेज च्या अंतर्गत स्पर्धा ही विश्वासार्हता खरंच गमावुन बसतात का? मुंबईच्या बॉम्बस्फोट प्रकरणात प्रसारमाध्यमांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे हा मुद्दा अधोरेखीत झाला आहे.वृत्तपत्र. प्रसारमाध्यमांना काही मर्यादा असतात.कोणाकोणाची दखल घ्यायची हा प्रश्न त्यांच्यापुढेही आहेच. प्रसारमाध्यमांना ब्लॉगर्स ची दखल आता घ्यावी लागते. अनेक पत्रकार ब्लॉगर्स आहेतच.मराठी संकेतस्थळावंर लिहिणारे शोध/बोधपत्रकार आहेत. त्यातुन प्रसारमाध्यमांमधील अंतरंग उलगडण्यास मदत होते. मग ते
एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराच्या डायरीच्या निमित्ताने लिहिणारे
पुनेरी असोत वा
राजे लिहिणारे
श्रावण मोडक असोत किंवा
सट्टाबाजार लिहिणारे
दिनेश गुणे असोत. हे समाजातील लोकांचच प्रतिबिंब टिपणारे पत्रकार आहेत. अजुन ही खुप आहेत. कशासाठी लिहितात ही माणसं?
आम्ही कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण तुम्हाला ऐकण्यासाठी केले आहे. पहिल्या भागात संजय आवटे बोलताहेत तर दुसर्या भागात आनंद आगाशे बोलताहेत ऐका
समयोचित आणि संतुलीत धागा....
In reply to समयोचित आणि संतुलीत धागा.... by प्रसन्न केसकर
वृत्तपत्रस्थितीविषयक भावनांशी सहमत!
In reply to वृत्तपत्रस्थितीविषयक भावनांशी सहमत! by Nile
सहमतीबद्दल धन्यवाद!
In reply to सहमतीबद्दल धन्यवाद! by प्रसन्न केसकर
प्रामाणिक शंका...
In reply to सहमतीबद्दल धन्यवाद! by प्रसन्न केसकर
स्पष्टीकरण
In reply to स्पष्टीकरण by Nile
वाचकांच्या 'चवीला' न्याय न देणारे माध्यम बंद पडेल...
परवाच ई
In reply to परवाच ई by दादा कोंडके
जनमानस
In reply to जनमानस by प्रकाश घाटपांडे
दै. सकाळ
In reply to दै. सकाळ by पाषाणभेद
पाषाणभाऊ
In reply to पाषाणभाऊ by समंजस
* याचसाठी
In reply to परवाच ई by दादा कोंडके
हा शाहरुख
वैचारीक लेख
In reply to वैचारीक लेख by शुचि
आग शुचि
आजचा
In reply to आजचा by पाषाणभेद
असं काय करता राव
In reply to आजचा by पाषाणभेद
पवार होराभुषण.
कर्दनकाळ
ध्वनीमुद्रण